मेक्सिकोमध्ये ८.० रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप

मेक्सिकोमध्ये चिआपासच्या समुद्र किनार्‍याजवळ ७ सप्टेंबरच्या रात्री ८.० रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. यामुळे समुद्रात त्सुनामीची चेतावणी देण्यात आली आहे. या भूकंपामध्ये ५ जणांचा मृत्यू झाला.

गौरी लंकेश यांच्या हत्येमागे नक्षलवाद्यांचा हात असल्याच्या शक्यतेच्या दिशेने पोलिसांचे अन्वेषण

नक्षल समर्थक पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येच्या प्रकरणात नक्षलवाद्यांचा हात आहे का ?, या शक्यतेवर पोलिसांकडून अन्वेेषण करण्यात येत आहे. गौरी लंकेश ‘नक्षलवाद्यांनी शरण येण्यासाठी’ प्रयत्न करत होत्या.

छत्तीसगडमध्ये धर्मांधांना मंदिराच्या आवारात दारू पिण्यास रोखल्याने त्यांचे मंदिरावर आक्रमण

राज्याच्या रायगड जिल्ह्यातील खेरपूर क्षेत्रात धर्मांधांच्या एका टोळीने मंदिरावर आक्रमण करून मंदिराची तोडफोड केली. मंदिराच्या आवारात दारू पिण्यास मज्जाव केल्याने चिडलेल्या धर्मांधांनी मंदिरावरच आक्रमण केले, असे वृत्त दैनिक भास्करने प्रसिद्ध केले आहे.

जयपूरमध्ये क्षुल्लक कारणावरून धर्मांधांचा हिंसाचार

रामगंज परिसरात ८ सप्टेंबरच्या दिवशी पोलीस शिपायाकडून रिक्शा हटवण्याच्या वेळी दुचाकीवरून जाणारा साजिद आणि त्याची पत्नी अरसी यांना काठी लागल्याने धर्मांधांच्या जमावाने येथे हिंसाचार केला.

(म्हणे) ‘दाभोलकर, पानसरे यांच्या हत्येमागे सनातनच !’ – भारत पाटणकर

दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गी यांच्या हत्येमागे सनातनच आहे, असे सनातनद्वेषी विधान श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी केले. ते एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

उन्नाव (उत्तरप्रदेश) येथे जावेद हबीब सलूनची तोडफोड

काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध केशरचनाकार जावेद हबीब यांनी त्यांच्या देशभरातील ‘सलून’चे विज्ञापन करतांना त्यात हिंदूंच्या देवतांचा उपयोग केला होता. यावरून टीका झाल्यावर त्यांनी क्षमाही मागितली होती.

रुईघर (जिल्हा सातारा) येथील श्री गणेश मंदिरातील दानपेटीतून १० सहस्र रुपयांची चोरी

येथील श्री गणेश मंदिरात चोरी झाल्याचे ८ सप्टेंबरला उघडकीस आले. चोरांनी मंदिरातील दानपेटी हत्याराने तोडून दानपेटीतील अनुमाने १० सहस्र रुपये चोरले.

पाक आमचा बंधू असून तो आतंकवादाच्या विरोधात लढत आहे ! – चीन

पाकिस्तान एक चांगला बंधू आणि सच्चा मित्र आहे. चीनपेक्षा इतर कोणीही पाकला अधिक चांगल्या प्रकारे ओळखत नाही. तो आतंकवादाच्या विरोधात सर्वशक्तीनिशी लढत आहे, असे चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी …….

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ देशात ७ व्या क्रमांकावर

‘टाइम्स हायर एज्युकेशन वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग’ या प्रतिष्ठेच्या मानांकन करणार्‍या संस्थेने वर्ष २०१८ साठीची विद्यापिठांच्या क्रमवारीची नुकतीच सूची घोषित केली. त्यानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाला देशात संयुक्तरीत्या ७ वा क्रमांक मिळाला आहे.

केरळमध्ये संघ-माकप कार्यकर्त्यांच्या हाणामारीमध्ये संघाच्या कार्यकर्त्यांनी  बॉम्ब फेकल्याचा माकपचा आरोप

राष्ट्रीय स्वयंसेवक ‘संघ आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (माकप) यांच्या कार्यकर्त्यांमध्ये ८ सप्टेंबरच्या दिवशी हाणामारी झाली. संघ कार्यकर्त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांवर बॉम्ब फेकले’


Multi Language |Offline reading | PDF