ठाणे जिल्ह्यात हिंदु जनजागृती सतिमीच्या वतीने राबवलेली आदर्श गणेशोत्सव मोहीम

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने समाजाला या मोहिमेच्या माध्यमातून धर्मशास्त्रांतर्गत काय योग्य आणि काय अयोग्य हे सांगितले गेले. श्री गणेशमूर्ती विसर्जनानंतर होणारी देवाची विटंबना रोखण्यासाठी मूर्तीदान करू नका, असे आवाहनदेखील समाजाला करण्यात आले.

हिंदूंना पाश्‍चिमात्त्य संस्कृतीनुसार वाढदिवस साजरा करण्यापासून रोखण्यासाठी श्री. रूपेश शर्मा यांची बर्थडे हवन संकल्पना

सद्यस्थितीला बहुतांश लोक आपला वाढदिवस शास्त्रविसंगत अशी मेणबत्ती फुंकून आणि केक कापून साजरा करतात. वाढदिवस म्हणजे मौजमजा करणे अशी काहीशी समजूत लोकांमध्ये रूढ होत चालली आहे.

सोलापूर येथे अशास्त्रीय पद्धतीने कृत्रिम हौदात गणेशमूर्ती विसर्जन !

येथील शेळगी परिसरातील देशाभिमान मित्र मंडळाने गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी गणेश मंडळाकडे जमा झालेल्या वर्गणीतून २५ सहस्र रुपये व्यय करून कृत्रिम हौद सिद्ध केला.

मुलुंड येथील सार्वजनिक गणेशोत्सवात श्री गणेश या विषयावर प्रवचन

मुलुंड पूर्व येथील साईनाथनगर मित्र मंडळाच्या सार्वजनिक श्री गणेशोत्सवात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री गणेश या विषयावर प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. समितीचे डॉ. लक्ष्मण जठार यांनी श्री गणेशाविषयीचे अध्यात्मशास्त्र सांगितले.

हुपरी (जिल्हा कोल्हापूर) येथे श्री गणेश पूजनाचे अध्यात्मशास्त्र या विषयावरील प्रवचनाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

येथील त्रिमूर्ती गणेश मंडळ येथे श्री गणेश पूजनाचे अध्यात्मशास्त्र या विषयावर प्रवचनाचे आयोजन केले होते. प्रास्ताविक युवा सेना शहरप्रमुख श्री. विक्रम सावंत यांनी केले.

घोटाळा झालेल्या भूमीचा ताबा रेडीरेकनरप्रमाणे शुल्क आकारून देणार – विधी आणि न्याय राज्यमंत्री रणजीत पाटील

देवस्थानची जी भूमी आहे तिचा लेखाजोखा चालू असून गायब झालेली अनुमानेे २६ एकर भूमी असल्याचे निदर्शनास आले आहे. एक विधीमत घेऊन सद्यस्थितीत सदर भूमी ज्यांच्या कह्यात आहे, त्यांच्याकडून ती कसली जाते किंवा त्या भूमीवर त्यांची उपजीविका चालते, अशा वारसदारांना प्राधान्याने रेडीरेकनच्या दराप्रमाणे भूमी देऊन सदर रक्कम देवस्थान समितीला देण्याविषयी शासन प्रयत्नशील आहे

(म्हणे) भारतीय सैन्यदल प्रमुख म्हणजे वाचाळवीर ! – चीन

भारतीय सैन्यदल प्रमुख जनरल बिपिन रावत अतिशय वाचाळ आहेत. त्यांच्या विधानांमुळे बीजिंग आणि नवी देहली यांचे संबंध बिघडू शकतात. भारतीय सैन्यातील मग्रुरीचे दर्शन जनरल रावत यांच्या विधानातून घडले आहे.यासाठीचा आत्मविश्‍वास भारतीय सैन्यात येतो कुठून ?, असा प्रश्‍न चीनचे सरकारी वर्तमानपत्र ग्लोबल टाईम्सने विचारला आहे.

मुसलमान माकप नेत्याने संघाच्या नेत्याचे समर्थन केल्यावर पक्षाकडून नोटीस

रा.स्व. संघाचे विचारवंत राकेश सिन्हा यांच्या समर्थनार्थ एक महिन्यापूर्वी ट्विट केल्यावरून माकपचे नेते अमीर हैदर जेदी यांना पक्षाकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. यात त्यांना विचारण्यात आले आहे की, तुम्ही हिंदुत्वनिष्ठ नेत्याच्या समर्थनार्थ ट्विट केले आहे का ?

जावेद हबीब हेअर अ‍ॅण्ड ब्युटीच्या हिंदुद्रोही विज्ञापनावर विहिंपकडून तक्रार

जावेद हबीब हेअर अ‍ॅण्ड ब्युटी या केशकर्तनालयाच्या विज्ञापनात हिंदु देवतांची हीन चेष्टा करण्यात आली आहे. याविषयी सामाजिक प्रसारमाध्यमांवर चर्चा चालू असल्याचे विहिंपचे अलिबाग तालुका अध्यक्ष चेतनभाई पटेल यांना लक्षात आले.

(म्हणे) गौरी लंकेश यांच्या हत्येचा दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गी यांच्या हत्येशी संबंध आहे का, याची चौकशी करा ! – अविनाश पाटील, कार्याध्यक्ष, अंनिस

दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांचे मारेकरी आणि त्या मागचे सूत्रधार फरार असतांना त्याच पद्धतीने गौरी लंकेश यांची हत्या होणे, हे वेदनादायी आहे. गौरी यांच्या मारेकर्‍यांना तातडीने पकडले जावे, तसेच त्यांच्या हत्येचा पूर्वीच्या ३ हत्यांशी काही संबंध आहे का, याची कसून चौकशी केली जावी, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे.


Multi Language |Offline reading | PDF