अबू सालेम आणि करीमुल्ला खान यांना जन्मठेप, तर अन्य दोघांना फाशीची शिक्षा

सालेम याला बॉम्बस्फोट घडवून आणण्याचे षड्यंत्र रचणे आणि पाकिस्तानातून भारतात आलेला शस्त्रसाठा गुजरातहून मुंबईत पाठवणे या दोन्ही प्रकरणी, तसेच बॉम्बस्फोट घडवून आणण्यासाठी रायगड जिल्ह्यातील दिघी आणि शेखाडी बंदरावर स्फोटके उतरवल्याप्रकरणी करीमुल्ला याला न्यायालयाने दोषी ठरवले आहे.

बंगालमध्ये जिहाद्यांच्या आक्रमणात ‘हिंदु संहति’च्या कार्यकर्त्याची हत्या

बंगालच्या उत्तर दिनाजपूर जिल्ह्यामध्ये सशस्त्र जिहाद्यांनी हिंदु वस्तीवर केलेल्या आक्रमणात ‘हिंदु संहति’चा कार्यकर्ता टोटन दास ठार झाला, तर अन्य एक तरुण कार्यकर्ता गंभीररित्या घायाळ झाला.

(म्हणे) ‘सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या विरोधात थेट उभे रहाण्याची आवश्यकता आहे !’ – लोकमतचे संपादक राजू नायक यांची चिथावणी

बेंगळुरू येथील पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येच्या निषेधार्थ गोवा पत्रकार संघटनेने आझाद मैदानात ६ सप्टेंबर या दिवशी आयोजित केलेल्या निदर्शनांमध्ये ‘दैनिक लोकमत’च्या गोवा आवृत्तीचे संपादक राजू नायक यांनी सनातनच्या विरोधात गरळओक

गौरी लंकेश यांच्या हत्येच्या मागे नक्षलवादीही असण्याची शक्यता ! – इंद्रजित लंकेश यांना संशय

बेंगळुरू येथे हत्या करण्यात आलेल्या पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचे अन्वेेषण प्रत्येक दिशेने झाले पाहिजे, मग ती नक्षलवादी संघटना असो कि हिंदुत्वनिष्ठ, असे त्यांचे भाऊ इंद्रजित लंकेश याने म्हटले आहे

दुबईसारख्या इस्लामी राष्ट्रात गणेशोत्सव शास्त्रानुसार साजरा होतो, भारतात कधी होणार ? – समर्थभक्त पू. सुनील चिंचोलकर

दुबई हे मुसलमान राष्ट्र असूनही तिथे श्री गणेशमूर्तीचे विसर्जन समुद्राच्या खाडीमध्ये केले जाते. प्रदूषण होऊ नये, यासाठी निर्माल्य किंवा फुले पाण्यात टाकू दिली जात नाहीत, तसेच ध्वनीप्रदूषण होऊ नये; म्हणून वाद्ये वाजवू देत नाहीत

थेरगाव (पुणे) येथील पवना नदीत विसर्जित केलेल्या १ सहस्र ५०० श्री गणेशमूर्ती बाहेर काढल्या

‘प्लास्टर ऑफ पॅरिसमुळे जलप्रदूषण होत नाही, असा अहवाल सृष्टी इको रिसर्च संस्थेने दिला आहे; उलट त्यातील जिप्सम या घटकामुळे पाणी शुद्ध होते !

खासदार आणि आमदार झाल्यावर त्यांच्या संपत्तीत वाढ कशी होते ? – सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला प्रश्‍न

खासदार किंवा आमदार झाल्यानंतर नेत्यांच्या संपत्तीमध्ये इतकी वाढ कशी होते ?, अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला करण्यात आली आहे. याविषयी सरकारने अहवाल सादर करावा, असा आदेश न्यायालयाने दिला आहे.

गणेशमूर्ती विसर्जन मोहिमेला मिळालेल्या यशाविषयी श्री गणेशाच्या चरणी कृतज्ञता !

सांगली शहरात हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी अनंत चतुर्दशीच्या दिवशी कृष्णा घाटावर भाविकांनी पुढील वर्षीपासून शाडूची मूर्ती बसवावी आणि श्री गणेशमूर्तीचे विसर्जन वहात्या पाण्यातच करावे यांसाठी प्रबोधन केले.

सातारा येथे श्री गणेशमूर्ती विसर्जन अभियानाच्या निमित्ताने राबवलेल्या विविध उपक्रमांना भाविकांचा प्रतिसाद !

समितीच्या कार्यकर्त्यांनी दिवसभर वाहनांना दिशा दाखवणे, वाहने उभी करणे या वाहतूकव्यवस्थेसाठी पोलिसांना सहकार्य केले. कृष्णातीरी सहस्रो घरगुती अणि मंडळे यांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन होत असूनही समितीच्या कार्यकर्त्यांच्या नियोजनामुळे या वर्षी वाहतूककोंडी झाली नाही

सोलापूर येथे श्री गणेशमूर्तींचे १०० टक्के विसर्जन !

अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि तत्सम धर्मद्रोही संघटना यांच्याकडून राबवण्यात येणार्‍या गणेशमूर्तीदान मोहिमेकडे या वर्षी सोलापूरकरांनी पाठ फिरवली.


Multi Language |Offline reading | PDF