बेंगळुरूमध्ये नक्षल समर्थक पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या

साम्यवादी विचारांच्या नक्षल समर्थक पत्रकार गौरी लंकेश (वय ५५ वर्षे) यांची ५ सप्टेंबरला रात्री ८ वाजता येथील राजराजेश्‍वरी भागातील त्यांच्या घराबाहेर अज्ञात आक्रमणकर्त्यांनी गोळ्या झाडून हत्या केली

नोटाबंदीमुळे सरकारी मुद्रणालयांची ५७७ कोटी रुपयांची हानी

नोटांची छपाई करणार्‍या सरकारी मुद्रणालयांनी त्यांना नोटाबंदीमुळे सुमारे ५७७ कोटी रुपयांची हानी झाल्याचे म्हटले आहे. या हानीची भरपाई देण्यात यावी, अशी मागणी मुद्रणालयांनी रिझर्व्ह बँकेकडे केली आहे.

म्यानमारमधील कट्टरपंथियांच्या हिंसाचारावर चिंतीत आहोत !  – पंतप्रधान मोदी

ज्या आव्हानांचा तुम्ही सामना करत आहात, त्याची आम्हाला जाणीव आहे. साहजिकच लोकांवर थेट परिणाम होतो. सर्वांनी मिळून यावर तोडगा काढायला हवा. सर्वांसाठी शांतता, न्याय आणि लोकशाही यंत्रणा कायम राहील अशी आम्ही अपेक्षा करतो

डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे हत्या प्रकरण : तपासकर्त्यांनी अद्ययावत तंत्रज्ञान आणि कौशल्य यांचा वापर करावा ! – मुंबई उच्च न्यायालय

अंनिसचे डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येची चौकशी करणारी केंद्रीय अन्वेषण यंत्रणा (सीबीआय) आणि विशेष तपास पथक यांच्या तपासाला गती देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.

पोलिसांचा हिंदूद्वेष !

‘२० ऑगस्ट २०१७ला पुणे, सातारा आणि मुंबई येथे सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी घोटाळेबाज अंनिसच्या विरोधात आंदोलने केली. या ठिकाणी उपस्थित असलेल्या पोलिसांनी संपूर्ण आंदोलनाचे चित्रीकरण केले.’         

कथित गोरक्षकांचा हिंसाचार रोखण्यासाठी सक्षम पोलीस अधिकारी नेमा ! – सर्वोच्च न्यायालयाचा राज्यांना आदेश

कथित गोरक्षकांकडून होणारी आक्रमणे रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक सक्षम पोलीस अधिकारी नेमा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारांना दिला आहे. गोरक्षणाच्या नावाखाली कायदा हातात घेऊन…..

ब्रिटनच्या मुसलमान महिला खासदाराची रोहिंग्या मुसलमानांसाठी वकिली

ब्रिटनच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये (संसदेत) रोहिंग्या मुसलमानांच्या संदर्भात मजूर पक्षाच्या सदस्य यास्मिन कुरेशी यांनी परराष्ट्र मंत्री मार्क फिल्ड यांना ‘म्यानमारमधील वंशविच्छेदाचा तुम्ही निषेध करणार का ?’ असा प्रश्‍न विचारला.

मोदी-जिनपिंग यांच्या भेटीमध्ये सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यावर सहमती

येथील ब्रिक्स परिषदेच्या अंतिम दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली. या बैठकीत दोन्ही देशांच्या सीमेवर शांतता प्रस्थापित करण्याविषयी सहमती झाली.

केरळमध्ये गोमांसावर बंदी घालण्याची भाजपने कधीही मागणी केलेली नाही ! – केंद्रीय पर्यटनमंत्री अल्फोन्स कन्ननथानम्

भाजपने कधीही गोमांस खाऊ नये, असे सांगितलेले नाही. आम्ही लोकांच्या खाण्याच्या पद्धतीवर रोक लावू शकत नाही. जर भाजपचे सरकार असलेल्या गोव्यामध्ये गोमांस खाण्यावर स्वातंत्र्य आहे, तर केरळमध्येही लोकांना याविषयी कोणतीही अडचण होणार नाही


Multi Language |Offline reading | PDF