कागल (जिल्हा कोल्हापूर) येथे विसर्जनाचे शास्त्र सांगितल्यानंतर बरेच तरुण मूर्तीदान मोहीम सोडून निघून गेले !

शिवसेना, हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ३१ ऑगस्टला येथील दूधगंगा नदी घाटावर राबवलेल्या ‘आदर्श गणेशोत्सव विसर्जन मोहिमे’ला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

‘येथून पुढे सर्व धार्मिक कृती शास्त्रानुसार करू !’ – गणेशभक्तांचा अभिप्राय

येथील नसरापूर गावामधील ‘स्वप्नलोक टाऊनशिप’ या वसाहतीमध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री. विठ्ठल जाधव यांनी ‘गणेशपूजन अध्यात्मशास्त्र, उत्सवांतील अपप्रकार आणि हिंदु राष्ट्राची आवश्यकता’ या विषयावर ३१ ऑगस्टला प्रवचन घेतले.

जळगाव येथे बकरी ईदला गोर्‍हा (वासरु) कापल्याने उस्मानिया पार्क परिसरात तणाव 

गोवंश हत्या करणार्‍यांवर कायद्याने बंदी असतांनाही कायदा ढाब्यावर बसवून चार वर्षे वयाचा गोर्‍हा कापल्याने परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. 

कसबा सांगाव (जिल्हा कोल्हापूर) येथील मारुति मंदिरात कायमस्वरूपी फलक प्रदर्शनाचे अनावरण !

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी सिद्ध केलेल्या धार्मिक फलकांचे प्रदर्शन येथील मारुति मंदिरात कायमस्वरूपी लावण्यात आले.

रामदेव बाबा हे बाबा कमी, बॉबीच जास्त दिसतात ! – अभिनेता शेखर सुमन

नावाच्या मागे किंवा पुढे राम लावून आरामात हरामाचे काम केले जाते आणि भक्त त्यांना डोक्यावर घेतात, हे दुर्दैव आहे. पहिले आसाराम, मग राम आणि आता रहीम ‘सुपरस्टार’. या सर्वांमुळे रामदेवबाबांनाही ताण आला असेल; परंतु त्यांनी घाबरू नये.

हुपरी (जिल्हा कोल्हापूर) येथे गणेश मंडळांमध्ये ‘श्रीगणेश पूजनाचे अध्यात्मशास्त्र’ या विषयावर प्रवचन !

महावीरनगर येथील स्वाभिमानी गणेश मंडळ आणि कागल वेस येथील श्री शाहू गणेश तरुण मंडळ येथे धर्मप्रेमी श्री. रवींद्र गायकवाड यांच्या पुढाकाराने ‘श्री गणेश पूजनाचे अध्यात्मशास्त्र’ या विषयावर प्रवचनाचे आयोजन केले होते.

पुणे येथील प्रबोधन कक्षाला जिज्ञासूंचा भरभरून प्रतिसाद

बाजीराव रस्त्यावरील महाराणा प्रताप उद्यानासमोर ३० ऑगस्ट ते ३ सप्टेंबर या कालावधीत हिंदु जनजागृती समितीच्या वतीने लावण्यात आलेल्या प्रबोधन कक्षास जिज्ञासूंचा भरभरून प्रतिसाद मिळाला.

महानगरपालिकेने वाहून आलेल्या गणेशमूर्तींचे विधीवत् पूजन करून विसर्जन करावे ! – धुळे येथील हिंदुत्वनिष्ठांचे महापौरांना निवेदन

गणेशोत्सव हा हिंदु धर्मातील आनंदादायी आणि महत्त्वाचा सण आहे. अनंतचतुर्थीला अनेक गणेशभक्त वेगवेगळ्या ठिकाणी मूर्तीविसर्जन करतात.

श्री महालक्ष्मी मंदिराचा राज्य संरक्षित स्मारक सूचीत लवकरच समावेश !

करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मी मंदिर लवकरच राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले जाण्याची शक्यता आहे. राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित झाल्यानंतर त्याचा विकास आराखडाही सिद्ध केला जाईल.

मलकापूर (जिल्हा कोल्हापूर) येथे श्री गणेशमूर्तींचे शंभर टक्के वहात्या पाण्यात विसर्जन !

येथे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या प्रबोधनामुळे सर्व श्री गणेशमूर्तींचे वहात्या पाण्यात विर्सजन करण्यात आले. गेल्या २ वर्षांपासून अशी मोहीम राबवण्यात येत असून याला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.


Multi Language |Offline reading | PDF