कोपरी (नवी मुंबई) येथे अल्पवयीन अल्पसंख्यांक मुलांकडून श्री गणेशमूर्तीवर दगडफेक

कोपरीगाव (वाशी) येथे पाच अल्पवयीन मुलांनी २ सप्टेंबरला पहाटे श्री गणेशमूर्तीवर दगडफेक केल्यामुळे मूर्तीचा हात तुटला आहे. या प्रकरणी  एपीएम्सी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी या मुलांना कह्यात घेऊन कारवाई केली आहे

जळगाव येथील गणेश मंडळातील आरास पहाणार्‍या प्रेक्षकांवर अज्ञातांकडून दगडफेक

शिवाजीनगर भागातील गणेशोत्सव मंडळात रात्री साडेदहा वाजता अज्ञात समाजकटकांकडून आरास पहाणार्‍या गणेशभक्तांवर दगडफेक झाल्याने परिसरात पळापळ झाली.

जोशीमठ (उत्तराखंड) येथे शिखांनी मुसलमानांना ईदच्या दिवशी गुरुद्वारामध्ये नमाजपठण करू दिले !

एक आठवड्यापासून पडणार्‍या मुसळधार पावसामुळे उत्तराखंडच्या चमोलीमधील जोशीमठचा काही भाग जलमय झाला आहे. यामुळे बकरी ईदच्या दिवशी मुसलमानांना मैदान उपलब्ध झाले नाही.

ईदच्या दिवशी म्हशीचा बळी देण्याचा प्रयत्न करणार्‍या रोहिंग्या मुसलमानांना चोपले !

मुंजेडी गावात शरणार्थी म्हणून रहाणार्‍या रोहिंग्या मुसलमानांकडून ईदच्या दिवशी म्हशीचा बळी देण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. त्या वेळी जागृत नागरिकांनी त्यांना रोखले आणि चोप दिला. तसेच म्हशीची सुटका करण्यात आली.

श्रद्धेच्या नावाखाली पशूहत्येला अनुमती देता येणार नाही ! – अलाहाबाद उच्च न्यायालय

अलाहाबाद उच्च न्यायालयात नुकतीच बकरी ईदच्या वेळी ३ दिवस प्राण्यांची हत्या करण्याची अनुमती मागणारी याचिका प्रविष्ट करण्यात आली होती. न्यायालयाने ती फेटाळून लावली.

निर्मला सीतारामन् देशाच्या नव्या संरक्षणमंत्री, तर पियुष गोयल रेल्वेमंत्री

३ सप्टेंबरला केंद्रीय मंत्रीमंडळाचा विस्तार करण्यात आला, तसेच खातेवाटप करण्यात आले. यात अत्यंत महत्त्वपूर्ण असलेले संरक्षणमंत्रीपद निर्मला सीतारामन् यांना देण्यात आले आहे. त्या सरकारमध्ये गेली ३ वर्षे उद्योग आणि वाणिज्य खात्याच्या राज्यमंत्री होत्या.

ही आहे पोलिसांची (अ)कार्यक्षमता !

‘भिवंडी येथे चालकाचे नियंत्रण सुटल्याने गोमांसाची वाहतूक करणारी भरधाव चारचाकी गाडी पंधरा फूट खोल खड्ड्यात पडली. या अपघातात मांसाची वाहतूक करणारे धर्मांध वाहनचालक ……

आम्हाला वाटते तेच बोलू ! – भारताने चीनला ठणकावले

येथे ३ सप्टेंबरपासून ब्रिक्स देशांच्या परिषदेला प्रारंभ झाला. या परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहिले आहेत. यात चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी मोदी यांची भेट होण्याची शक्यता आहे.

अभाविपच्या विरोधात दलित संघटनांना नक्षलवाद्यांचे बळ ! – भाजप खासदार अमर साबळे यांचा आरोप

राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विरोधात दलित संघटनांना नक्षलवादी साहाय्य करत आहेत, असा आरोप भाजपचे खासदार अमर साबळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजप खासदारांच्या बैठकीत केला आहे.


Multi Language |Offline reading | PDF