केशरी शिधापत्रिका पालटून दारिद्य्ररेषेखालील पिवळ्या रंगाच्या शिधापत्रिका पालटल्या !

कुटुंबाचे आर्थिक निकष ठरवून शिधापत्रिका दिल्या जातात; मात्र श्रीगोंदे येथे केशरी शिधापत्रिका पिवळ्या शिधापत्रिकांमध्ये पालटल्या जात आहेत.

मुंबईच्या देवनार पशूवधगृहात ईदच्या निमित्ताने दीड लक्षहून अधिक बकर्‍यांची आवक

ईदच्या निमित्ताने २ सप्टेंबरला बकर्‍यांचा बळी देण्यासाठी येथील देवनार पशूवधगृहात दीड लक्षाहून अधिक बकर्‍यांची आवक राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात या राज्यांतून झाली आहे.

ब्राह्मणपुरी परिसरात माकडे आणि भटक्या कुत्र्यांच्या टोळ्यांचा उच्छाद : नागरिक त्रस्त !

शहरातील ब्राह्मणपुरी परिसरात सध्या माकडांच्या उच्छादाने नागरिक त्रस्त झाले आहेत. ही माकडे टोळ्यांनी येतात आणि नागरिकांच्या थेट घरात जाऊन वस्तू उचलून नेतात, तसेच वस्तूंचीही हानी करत आहेत.

प्रवचनांच्या माध्यमातून गणेशोत्सवाच्या अध्यात्मशास्त्रीय माहितीचा प्रसार

गणेशोत्सव भक्तीभावाने आणि धर्मशास्त्रानुसार साजरा केला जावा, उत्सवात शिरलेले अपप्रकार दूर होऊन उत्सवाचे पावित्र्य राखण्याच्या दृष्टीने प्रबोधन व्हावे, तसेच भाविकांनाही उत्सवाचा आध्यात्मिक स्तरावर लाभ व्हावा

जालना विद्युत उपकेंद्राला कुलूप ठोकून गावकर्‍यांचे आंदोलन

गौरी-गणपति सणांच्या तोंडावर गावातील आठ विद्युत रोहित्र नादुरुस्त झाल्याने गाव अंधारात आहे. यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत असून त्रासलेल्या गावकर्‍यांंनी येथील ३३ के.व्ही. उपकेेंद्र कुलूप लावून बंद केली.

रक्ताच्या संसर्गामुळे १ सहस्र १३२ रुग्णांना ‘एच्आयव्ही’ची बाधा

एड्स नियंत्रण कार्यक्रमाच्या अंतर्गत राज्यातील ‘एच्आयव्ही’ आजाराचे प्रमाण नियंत्रणात आणण्यात यश आले असले, तरी रक्ताच्या संसर्गामुळे आणि वैद्यकीय उपचारातील निष्काळजीपणामुळे राज्यभरात अनेकांना ‘एच्आयव्ही’ची बाधा होत आहे.

निगडी (पुणे) येथे अज्ञातांकडून ५ चारचाकी गाड्यांची तोडफोड

येथील निगडी भागातील बौद्धनगर झोपडपट्टी परिसरात अज्ञातांनी ५ रस्त्यावर उभ्या असलेल्या चारचाकी गाड्यांची तोडफोड २९ ऑगस्टला मध्यरात्री केली आहे. त्या गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या असून मोठी आर्थिक हानी झाली आहे.

डॉल्बीच्या आवाजामुळे नागरिकाचा मृत्यू झाल्यास सदोष मनुष्यवध ३०२ कलमानुसार गुन्हा प्रविष्ट करणार ! – विश्‍वास नांगरे-पाटील यांची गणेशोत्सव मंडळांना चेतावणी ! 

डॉल्बीच्या आवाजामुळे अथवा डॉल्बीसमोर नाचताना चेंगराचेंगरीत एखाद्याचा मृत्यू झाल्यास संबंधित मंडळावर सदोष मनुष्यवधाचे भारतीय दंड विधान संहिता ३०२ कलमान्वये गुन्हा प्रविष्ट करण्यात येईल.

चीनच्या हुओलोंग हुई प्रांतातील ३०० मशिदींवरील १ सहस्र भोंगे तक्रारीनंतर प्रशासनाने काढले !

चीनच्या हुओलोंग हुई या प्रांतातील लोकांकडून मशिदीमधून भोंग्याद्वारे देण्यात येणार्‍या अजानमुळे होणार्‍या ध्वनीप्रदूषणाची तक्रार प्राप्त झाल्यानंतर शासनाने ३०० हून अधिक मशिदींवरील १ सहस्राहून अधिक भोंगे काढले आहेत.

माता-पित्याच्या चरणी ब्रह्मांड पाहून त्यांना प्रदक्षिणा घालणार्याय श्री गणेशासम आपणही गुरुदेवांना शरण जाऊन साधनामार्गाची परिक्रमा पूर्ण करूया !

आपल्याला गुरुकृपायोग नुसार साधनामार्गाने पुढे नेणार्‍या महान परात्पर गुरुदेवांच्या चरणी शरणागत भावाने नमन करून,

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now