हिंदुत्वनिष्ठांनो, धार्मिक उत्सवांतील अपप्रकार रोखण्याचा कृतीशील संकल्प करा !

‘आजकाल गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आदी धार्मिक उत्सवांत पुढील प्रकारचे अपप्रकार सर्रास केले जात असल्याचा अनुभव सर्वांना येत असतो.

सनातन प्रभातविषयी आध्यात्मिक स्तरावर आलेल्या अनुभूती प्रकाशित झाल्यावर थयथयाट करून दैनिकावर कारवाई करण्याची भाषा करणारे ‘मॅक्स महाराष्ट्र’ !

‘मॅक्स महाराष्ट्र’ या ब्लॉगवर (http://maxmaharashtra.com/6075 वर) २५ ऑगस्टच्या दैनिक सनातन प्रभातच्या अंकातील पृष्ठ ७ वर ‘दैनिक सनातन प्रभातने देहावरील आवरण काढल्याने झालेले लाभ’ या मथळ्याखालील लेखाच्या संदर्भात टीका करण्यात आली आहे. एवढेच नव्हे, तर दैनिक सनातन प्रभातवर कारवाईची अरेरावीची भाषाही करण्यात आली आहे

धिम्या गतीने खटला चालू असल्यावरून सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारला फटकारले !

पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्या विरोधातील खटला धिम्या गतीने चालू असल्यावरून सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारला फटकारले. आसारामजी बापू गेल्या ४ वर्षांपासून कारागृहात आहेत

बाबा राम रहीम यांना २० वर्षांची शिक्षा

डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा राम रहीम यांना २ बलात्कारांच्या प्रकरणी २८ ऑगस्ट या दिवशी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने २० वर्षांची शिक्षा सुनावली. बाबा राम रहीम यांना रोहतकच्या कारागृहात ठेवण्यात आले असून त्याच ठिकाणी असलेल्या विशेष न्यायालयात ही शिक्षा सुनावण्यात आली.

डोकलाममधून भारत आणि चीन सैन्य मागे घेणार ! – भारताची घोषणा

गेल्या अडीच मासांपासून भारत, चीन आणि भूतान यांच्या सीमेवरील तिठ्यावर असणार्‍या भूतानच्या डोकलाम येथे भारत आणि चीन यांच्यात वाद निर्माण झाला होता. दोन्ही देशांकडून येथे सैनिक तैनात करण्यात आले होते.

सर्वच संत भोंदू नाहीत ! – अभय वर्तक, प्रवक्ता, सनातन संस्था

भोंदू साधूंविरुद्ध कुंभमेळ्याच्या वेळी सनातन संस्थेने मोहीम चालवली होती. या विषयावर ग्रंथही प्रकाशित केले आहेत. सर्वच संत भोंदू असतात, हे सूत्र मांडण्यात येत आहे. त्याला आमचा आक्षेप असून वस्तूस्थिती तशी नाही

म्यानमारमध्ये रोहिंग्या मुसलमान आतंकवाद्यांकडून ६ हिंदूंची हत्या

म्यानमारमध्ये सैन्य आणि रोहिंग्या मुसलमान आतंकवादी यांच्यातील हिंसाचारामध्ये आतापर्यंत ७२ आतंकवादी, १२ सैनिक आणि ६ हिंदू नागरिक ठार झाले आहेत. आतंकवाद्यांनी या हिंदूंची हत्या केल्याचे सांगण्यात आले आहे.

नरसिंहपूर (मध्यप्रदेश) येथे मंदिराच्या छतावर पाकचा राष्ट्रध्वज !

नरसिंहपूर शहरापासून दूर एका गावात पंचमुखी हनुमानाच्या मंदिराच्या छतावर पाकिस्तानचा राष्ट्रध्वज लावण्यात आल्याची घटना समोर आली आहे. याची माहिती मिळाल्यानंतर मंदिर समितीच्या सदस्यांनी हा ध्वज काढून टाकला, तसेच पोलिसांत तक्रार केली.

(म्हणे) ‘भारताने त्याच्या अंतर्गत समस्यांवर लक्ष द्यावे !

भारतातील हिंसाचारावरून लक्ष हटवण्यासाठी डोकलाम विवादाचा वापर केला जाऊन शकतो, तसेच पंचकुला हिंसाचारामुळे भारतातील राजकीय आणि सामाजिक समस्या सर्वांसमोर आली आहे,


Multi Language |Offline reading | PDF