वाचकांना निवेदन : दैनिक सनातन प्रभातमधील आध्यात्मिक परिभाषांचा अर्थ

संपादकांचा वैज्ञानिक दृष्टीकोन

‘दैनिक सनातन प्रभात’च्या संकेतस्थळावरील कोणतेही लिखाण अथवा अन्य साहित्य वाचकाला ‘राज्यघटनेच्या कलम ५१ अ नुसार वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवण्याला’ बाधा आणण्यासाठी लिहिलेले वा ठेवलेले नाही. राज्यघटनेने कलम २५ नुसार व्यक्तीला धर्मपालनाचा आणि धर्मप्रसाराचा अधिकार दिला आहे. न्यायालयांच्या अनेक निवाड्यांतून स्पष्ट झाले आहे की, धार्मिक भावना वरपांगी कशाही वाटल्या, तरी त्यांत ढवळाढवळ करण्याचा अधिकार शासन अथवा न्यायालय यांना नाही. तसेच ही ढवळाढवळ केवळ सामाजिक शांतता, नैतिकता आणि आरोग्य धोक्यात येत असेल, तरच करता येते. या संकेतस्थळावरील लेख अथवा अन्य साहित्य हे या तिन्ही गोष्टींना धोक्यात आणण्यासाठी लिहिलेले नसून घटनात्मक अधिकाराचा वापर करत अध्यात्माचा अभ्यास करण्यासाठी आणि धर्माचरण सांगण्यासाठी देण्यात आलेले आहेत.

श्रद्धेने धर्माचरण केल्यास धर्मासंबंधी विविध अनुभव येतात, हा आजपर्यंतचा इतिहास आहे. धर्म आणि श्रद्धा या गोष्टी वैयक्तिक असल्याने या संकेतस्थळावर दिलेले अनुभवसुद्धा वैयक्तिकच आहेत. त्यामुळे ते सरसकट लागू होतील अथवा सर्वांनाच ते येतील, असे नाही. समाजात अंधश्रद्धा पसरवण्यासाठी किंवा वैद्यकीय उपचारांना किंवा वैज्ञानिक दृष्टीकोनांना विरोध करण्यासाठीही हे लिखाण नाही. वाचकाने डोळसपणे संकेतस्थळाच्या लेखांचा अभ्यास करणे अपेक्षित आहे, याची कृपया नोंद घ्यावी. – संपादक

Read moreवाचकांना निवेदन : दैनिक सनातन प्रभातमधील आध्यात्मिक परिभाषांचा अर्थ

हिंदुत्वनिष्ठांनो, धार्मिक उत्सवांत देवतांचे विडंबन होऊ देऊ नका ! – परात्पर गुरु डाॅ. आठवले

आजकाल गणेशोत्सव मंडळे श्री गणेशाची अन्य देवता, व्यक्ती आदींच्या रूपात किंवा भाज्या, भांडी, भंगाराचे साहित्य आदींचा उपयोग करून मूर्ती बनवतात. असे करणे, हे अशास्त्रीय, म्हणजेच श्री गणेशाच्या मूर्तीविज्ञानाच्या विरोधात आहे.

३ गणेशोत्सव मंडळांंच्या २९ जणांच्या विरोधात गुन्हे नोंद

गणेशोत्सव मंडळांनी डॉल्बी यंत्रणा लावू नये, असे पोलीस यंत्रणेने वारंवार सांगूनही २५ ऑगस्टला श्री गणेशचतुर्थीच्या दिवशी राजारामपुरी येथे ३ गणेशोत्सव मंडळांनी डॉल्बी यंत्रणा चालू करून मिरवणूक काढली.

श्रद्धेच्या नावाखाली हिंसा खपवून घेणार नाही ! – पंतप्रधान नरेंद मोदी

देशाच्या एखाद्या भागात हिंसाचाराच्या घटना घडल्या, तर प्रचंड वेदना होतात. हा बुद्ध आणि महात्मा गांधी यांचा देश आहे.

पंचकुलामध्ये पोलिसांनी गळा, छाती आणि पोटात गोळ्या झाडल्यानेच ३० अनुयायांचा मृत्यू

बाबा राम रहीम यांना न्यायालयाने लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यात दोषी ठरवल्यानंतर हरियाणाच्या पंचकुला आणि अन्य ठिकाणी त्यांच्या अनुयायांकडून हिंसाचार करण्यात आला.

दैनिक सकाळमध्ये व्यंगचित्राद्वारे श्री गणेशाचे विडंबन

२६ ऑगस्टला प्रसिद्ध झालेल्या कोल्हापूर आवृत्तीच्या दैनिक सकाळमध्ये पान क्रमांक ४ वर टॉकींग हेडलाईन या सदराखालील व्यंगचित्रात श्री गणेशाचे विडंबनात्मक व्यंगचित्र प्रसिद्ध करण्यात आले आहे.

पोलिसांच्या परिपत्रकाच्या विरोधात याचिका प्रविष्ट करणार ! – डॉ. विनोद कोठारी, प्रांत गोरक्षा प्रमुख, बजरंग दल

जनावरांच्या वाहतुकीच्या नावाखाली वाहनातून आतंकवादी घुसल्यास, अमली पदार्थांची तस्करी झाल्यास त्याला उत्तरदायी कोण ?, असा प्रश्‍न उपस्थित करत वाहतूक विभागाचे सहपोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ईदच्या निमित्ताने काढलेल्या ……

शाळांमध्ये पर्यावरणपूरक आणि धार्मिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचा संकल्प !

पर्यावरणपूरक आणि धार्मिकदृष्ट्या आदर्श पद्धतीने कसा साजरा करावा ? या विषयावर श्री कला केंद्राच्या वतीने शहरातील माध्यमिक विद्यालय आणि महाबळ कॉलनी, सुशीला अत्रे प्राथमिक विद्यालयात आदर्श गणेशोत्सव आणि गणपति या विषयी व्याख्यान घेण्यात आले.

डोकलाम पार्श्‍वभूमीवर सैनिकांना कुठल्याही परिस्थितीसाठी सिद्ध रहाण्याची सूचना ! – सैन्यदलप्रमुख जनरल बिपीन रावत

चीन हा राजकीय, आर्थिक आणि सैनिकी माध्यमातून जगभरात स्वतःचा दबदबा वाढवू पहात आहे.


Multi Language |Offline reading | PDF