उत्तरप्रदेशमध्ये कैफियत एक्सप्रेस डंपरला धडकल्याने ४० प्रवासी घायाळ

उत्तरप्रदेशमध्ये काही दिवसांपूर्वीच खतौली येथे उत्कल एक्सप्रेसला झालेल्या भीषण अपघातानंतर २३ ऑगस्टला पहाटे आणखी एक दुर्घटना घडली. औरेया येथे कैफियत एक्सप्रेस रूळांवरून घसरली. यामध्ये ४० प्रवासी घायाळ झाले आहेत.

लागोपाठ २ अपघातांनंतर रेल्वे महामंडळाच्या अध्यक्षांचे त्यागपत्र

आठवडाभरात लागोपाठ २ रेल्वे अपघात झाल्यानंतर रेल्वे महामंडळाचे अध्यक्ष ए.के. मित्तल यांनी त्यागपत्र दिले आहे. मित्तल यांना केंद्र सरकारने २ वर्षांसाठी मुदतवाढ दिली होती. वर्ष २०१६ मध्येच मित्तल निवृत्त होणार होते.

लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित अखेर कारागृहाबाहेर

वर्ष २००८ मध्ये मालेगावमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी गेली ९ वर्षे कारागृहात असलेले लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित २३ ऑगस्टला कारागृह प्रशासनाच्या सर्व औपचारिकता पूर्ण केल्यानंतर कारागृहाबाहेर आले.

देवस्थान समितीत घोटाळे करणार्‍या दोषींना पाठीशी घातले जाणार नाही ! – महेश जाधव, अध्यक्ष, देवस्थान समिती

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीमध्ये झालेल्या घोटाळ्यांमधील दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, या भूमिकेशी आम्ही ठाम आहोत. या घोटाळ्याच्या प्रकरणातील दोषींना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घातले जाणार नाही.

२०० रुपयांची नोट लवकरच चलनात येणार

५० रुपयांची नवीन नोट चलनात येणार असल्याची घोषणा रिझर्व्ह बँकेने नुकतीच केली आहे. त्यानंतर आता लवकरच २०० रुपयांची नोट चलनात येणार आहे.

इसिसचा भारतातील आतंकवादी अबू युसूफ अल हिंदी सिरीयात ठार

इसिसमध्ये भारतीय मुसलमान युवकांना भरती करणारा मुळचा भारतातील आतंकवादी अबू युसूफ अल हिंदी हा सिरीयामध्ये ठार झाला आहे.

पसार आरोपींचा शोध आव्हान म्हणून करा ! – मुंबई उच्च न्यायालय

डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील पसार असलेले सारंग आकोलकर आणि विनय पवार यांचा शोध आव्हान म्हणून करा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि विशेष अन्वेषण पथक (एस्आयटी) यांना दिला आहे.

शिवशाहीर श्री. बाबासाहेब पुरंदरे हे उत्तुंग व्यक्तीमत्व ! – मोदी यांनी केले ट्वीट

महाराष्ट्र भूषण शिवशाहीर श्री. बाबासाहेब पुरंदरे यांनी २२ ऑगस्टला नवी देहली येथे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या वेळी श्री. पुरंदरे यांनी श्री. मोदी यांना शिवचरित्रावरील प्रदर्शन आणि जाणता राजा हे महानाट्य यांच्या देहली येथील कार्यक्रमांच्या उद्घाटनाचे निमंत्रण दिले.

नीतीहीन धर्मांध शिक्षकाला पाठिशी घालणारे पोलीस !

आसाममधील हेलाकांडी जिल्ह्यात काटलीचेरा गावातील फैजुद्दीन लष्कर या शिक्षकाच्या विरोधात विद्यार्थिनींसमवेत आक्षेपार्ह अवस्थेतील छायाचित्रे काढून ती फेसबूकवर ठेवल्याविषयी तक्रार करण्यात आली

(म्हणे) विमानाने सदेह वैकुंठाला जाणे, भिंत चालवणे, ही अंधश्रद्धेची उदाहरणे ! – सुशिला मुंढे, अंनिस

विमानाने सदेह वैकुंठाला जाणे, भिंत चालवणे, रेड्याच्या मुखातून वेद वदवणे, पाण्याने दिवा पेटवणे अशी अनेक उदाहरणे देता येतील, असे मत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सुशिला मुंढे यांनी व्यक्त केले.


Multi Language |Offline reading | PDF