मला बॉम्बस्फोटाच्या गुन्ह्यात अडकवण्यात आले ! – लेफ्टनंट कर्नल पुरोहित

मला बॉम्बस्फोटाच्या गुन्ह्यात अडकवण्यात आले. मी या जामिनाच्या निर्णयावर समाधानी आहे. मला लष्करी सेवेत पुन्हा रुजू व्हायचे आहे. आता मी माझ्या दोन्ही कुटुंबांत परतणार आहे.

तोंडी तलाकवर ६ मासांत संसदेने कायदा करावा ! – सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

तीन वेळा तलाक म्हणत देण्यात येणार्‍या तोंडी तलाकवर सर्वोच्च न्यायालयाने ६ मासांसाठी बंदी घालणारा निर्णय २२ ऑगस्टला झालेल्या सुनावणीच्या वेळी दिला. या ६ मासांमध्ये संसदेत कायदा करण्यात यावा, असा आदेश केंद्र सरकारला दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत राममंदिर उभारणीचा प्रस्ताव मांडावा ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

अयोध्येतील रामजन्मभूमीच्या जागेवर मंदिर होते, असे पुरातत्व खात्याने सर्वेक्षणात म्हटले आहे. याच अहवालाच्या आधारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राममंदिर उभारणीच्या संदर्भात संसदेत प्रस्ताव आणावा, अशी मागणी डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी येथे केली.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या प्रकरणातील २ संशयितांवर प्रत्येकी ५ लक्ष रुपयांचे बक्षीस

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील बेपत्ता असलेले विनय पवार आणि सारंग आकोलकर यांची रेखाचित्र असलेले भित्तीपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.

‘स्टोरी लिमिटेड’ संकेतस्थळावर हिंदुद्वेषी चित्रकार म.फि. हुसेन यांच्या चित्रांचा लिलाव : धर्मनिष्ठ हिंदूंकडून विरोध

हिंदु देवतांची अश्‍लील चित्रे आणि भारतमातेचे नग्न चित्र काढणारे दिवंगत हिंदुद्वेषी चित्रकार म.फि. हुसेन यांच्या चित्रांचा ‘स्टोरी लिमिटेड’ या संकेतस्थळावरून ‘ऑनलाईन’ लिलाव करण्यात येणार आहे.

अयोध्येत राममंदिरच उभारायला हवे ! – वसीम रिझवी, शिया सेंट्रल वक्फ बोर्ड

रामजन्मभूमीवर राममंदिरच उभारायला हवे, तर मशीद अन्यत्र बनवली पाहिजे आणि तिचे नाव ‘मस्जिद-ए-अमन’ ठेवायला हवे, असे प्रतिपादन शिया सेंट्रल वक्फ बोर्डचे अध्यक्ष वसीम रिझवी यांनी येथे पत्रकार परिषदेत केले.

धर्मावरील आघातांच्या विरोधात हिंदूंनी संघटित झाले पाहिजे ! – विश्‍वनाथ कुलकर्णी, हिंदु जनजागृती समिती

श्रावण मासात ७ ठिकाणी भगवान शिवाच्या मूर्ती तोडण्यात आल्या, कावडियांवर आक्रमण करण्यात आले; मात्र हिंदूंचे संघटन आणि जागृती यांच्या अभावी या घटना थांबवण्याचे कोणतेही प्रयत्न झाले नाहीत.

…अन्यथा बंगालमधील हिंदू ममता बॅनर्जी यांचे सरकार उखडून फेकतील !

बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हिंदूंकडे पहाण्याचा दृष्टीकोन पालटला नाही, तर बंगालचे हिंदू संघटित होऊन त्यांचे सरकार उखडून फेकल्याशिवाय रहाणार नाहीत.

पुणे महानगरपालिका श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी १०० टन ‘अमोनियम बायकार्बोनेट’चे वाटप करणार ! – महापौर मुक्ता टिळक

शहरात प्रतिवर्षी अनुमाने ६ लक्ष श्रीगणेशमूर्तींची विक्री केली जाते. त्यातील ५ लक्ष मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनवल्या जातात. त्या मूर्ती पाण्यात व्यवस्थितपणे विरघळत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होते.

संतकृपा प्रतिष्ठानकडून दक्षिण देहली येथे वृक्षारोपण

संतकृपा प्रतिष्ठानकडून दक्षिण देहलीच्या कालकाजी येथील छडपूजा पार्क आणि राजीव गांधी पार्क येथे वृक्षारोपण करण्यात आले.


Multi Language |Offline reading | PDF