विचारवंत ग.प्र. प्रधान यांची महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ट्रस्टमध्ये विलीन केलेली मालमत्ता कुठे आहे ? – अभय वर्तक, राष्ट्रीय प्रवक्ता, सनातन संस्था

अंनिसवाल्यांनी नेहमी धर्माची चिकित्सा करण्याचा आग्रह धरला; मग त्यांच्या न्यासाची चिकित्सा करायची मागणी केल्यावर ती ते का नाकारत आहेत ? त्यांच्या न्यासामधील माहिती मागितल्यावर ‘माहिती मागण्याचा काय अधिकार आहे ?’

केरळमध्ये लव्ह जिहादची प्रकरणे दिसतात ! – किरेन रिजिजू

केरळमध्ये लव्ह जिहादची प्रकरणे चालू असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. या प्रकरणाविषयी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालू असल्याने मी यावर अधिक काही बोलू शकत नाही, असे विधान केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी येथे केले.

गरब्यामधील प्रवेशासाठी आधारकार्ड बंधनकारक करा !

नवरात्रोत्सवातील गरब्यामध्ये केवळ हिंदूंनाच प्रवेश देण्यात यावा. त्यासाठी आधारकार्ड बंधनकारक करण्यात यावे, अशी मागणी हिंदु उत्सव समितीने येथे केली आहे.

शिंगणापूर (जिल्हा कोल्हापूर) येथे फेसबूकवरून श्री गणेशाचे विडंबन केल्यामुळे ग्रामस्थ संतप्त !

फेसबूक या सामाजिक संकेतस्थळावरून हिंदूंचे आराध्य दैवत श्री गणेशाचे सिगारेट ओढतांनाचे आणि अन्य अश्‍लील चित्रे ‘पोस्ट’ (प्रसारित) करून विडंबन केले होते, तसेच मराठा समाजाने काढलेल्या मोर्च्याविषयी जातीय तेढ निर्माण करणारा संदेश पसरवला होता.

(म्हणे) ‘मुसलमान असल्यामुळे भारत मला लक्ष्य करत आहे !’ – डॉ. झाकीर नाईक यांचा कांगावा

मी जिहादचे समर्थन करत नाही. मी मुसलमान असल्यामुळे मला भारताच्या अन्वेषण यंत्रणा लक्ष्य करत आहेत, असा आरोप भारताने फरार घोषित केलेले डॉ. झाकीर नाईक यांनी केला आहे.

गोव्यातील पाचवीच्या विद्यार्थ्यांना साधा भागाकारही येत नसल्याचा मुख्यमंत्री पर्रीकर यांनी घेतला अनुभव !

राज्यातील प्राथमिक शिक्षणाची स्थिती चिंताजनक आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी शासन प्राथमिक शिक्षणाचा दर्जा सुधारण्यावर भर देणार आहे.

गणेशमूर्तींचे विसर्जन वहात्या पाण्यातच करणे योग्य ! – श्री. विलास मडिगेरी, नगरसेवक, भाजप

गणेशमूर्तींचे विसर्जन वहात्या पाण्यातच करणे योग्य असून ती आपली परंपरा आहे. आंदोलनातील या मागणीला माझा संपूर्ण पाठिंबा आहे.

हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने ठाणे जिल्ह्यात प्रवचने आणि संपूर्ण वन्दे मातरमचे आयोजन

स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे होऊनही पाश्‍चात्त्य संस्कृतीकडे झुकणारी पिढी, राष्ट्रप्रेमी राज्यकर्त्यांचा अभाव, वन्दे मातरमला विरोध करणारे धर्मांध ही स्थिती पालटण्यासाठी सर्वांनी संघटित होणे आवश्यक आहे.

कागदी लगद्याच्या श्री गणेशमूर्तींवर बंदी न घातल्यास न्यायालयाचा अवमान केल्याची याचिका प्रविष्ट करणार !

‘राष्ट्रीय हरित लवादा’च्या न्यायालयात कागदी लगद्याच्या मूर्तींना प्रोत्साहन देणारा शासकीय निर्णय चुकीचा असल्याचे सिद्ध होऊन न्यायालयाने शासनाच्या आदेशावर ३० सप्टेंबर २०१६ या दिवशी स्थगिती आणली आहे.

गोतस्करांना सोडून गोरक्षकांवरच गुन्हा दाखल करण्याचा गोवा पोलिसांचा प्रयत्न

‘उसगाव, फोंडा (गोवा) येथून पहाटे ४ वाजता गोवंश बेळगाव येथे नेण्यात येत होता. त्या वेळी येथील गोप्रेमींनी गोवंशाची वाहतूक करणारे हे वाहन अडवून पोलिसांकडे १०० क्रमांकावर तक्रार केली.


Multi Language |Offline reading | PDF