लडाखमध्ये चीनकडून झालेला घुसखोरीचा प्रयत्न भारतीय सैन्याने उधळला !

डोकलाम येथे गेले २ महिने तणाव असतांना आता चीनने अचानक लडाख प्रदेशातील पँगाँग सरोवर परिसरात १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून भारतीय सीमेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला.

काश्मिरींना गळाभेटी देण्यासाठी ३७० कलम हटवा ! – उद्धव ठाकरे यांचा घणाघात

ना गोली से, ना गाली से, समस्या का हल होगा कश्मिरी लोगों को गले लगाने से ! खरेच हा महान विचार आतापर्यंत कुणाला कसा सुचला नाही, याचेच आश्‍चर्य वाटते. आता हा विचार अमलात आणण्यासाठी एकच करा.

केरळमधील लव्ह जिहाद प्रकरणाचे एनआयए अन्वेषण करणार

सर्वोच्च न्यायालयाने केरळमधील हिंदु तरुणीच्या धर्मांतराच्या प्रकरणाची चौकशी करण्याचा आणि त्याचा अहवाल लवकरात लवकर देण्याचा आदेश राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेला (एन्आयएला) दिला आहे.

संगदरी (तालुका दक्षिण सोलापूर) येथील एकाही विक्रेत्याने प्लास्टिकचा किंवा कागदी राष्ट्रध्वज विकला नाही !

येथे हिंदु जनजागृती समितीच्या प्रबोधनामुळे १५ ऑगस्ट या दिवशी गावात कोणीही प्लास्टिकचा किंवा कागदी राष्ट्रध्वज विकला नाही.

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींप्रमाणेच कागदी लगद्याच्या गणेशमूर्तींवरही गोवा शासनाने बंदी घालावी !

वर्ष २०११ मध्ये महाराष्ट्र शासनाने कागदी लगद्याच्या मूर्तींना प्रोत्साहन देणारा निर्णय घेतला. याविरोधात हिंदु जनजागृती समितीने राष्ट्रीय हरित लवादाकडे (National Green Tribunal) याचिका दाखल केली.

अवैध मद्याच्या व्यवसायात पोलीस कर्मचार्‍याचा सहभाग

सावंतवाडी (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील माडखोल गावात एका माजी पोलीस हवालदाराच्या कुटुंबियांकडून अवैधपणे मद्याचा व्यवसाय केला जात असून यामध्ये सावंतवाडी पोलीस ठाण्याचा एक कर्मचारीही सहभागी आहे.

१५ ऑगस्टला हिंदु जनजागृती समितीला प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रण !

येथील हडस हायस्कूलमध्ये १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात विद्यार्थी आणि पालक यांच्या प्रबोधनासाठी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.

कोल्हापूर येथे गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रवचने !

शिरोळ येथील गणेश मंदिरात सनातन संस्थेच्या सौ. सुप्रिया घाटगे यांनी ‘श्री गणेश चतुर्थी व्रत’ यावर मार्गदर्शन केले.

बिहारमध्ये पुरामुळे ५६ जणांचा मृत्यू

बिहारमध्ये ७० लाख लोक पूरग्रस्त झाले आहेत. तसेच या पुरामध्ये आतापर्यंत ५६ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील १३ जिल्ह्यांत पूर आला आहे. सरकारने पूरग्रस्तांसाठी ३४३ साहाय्यता केंद्रे स्थापन केली आहेत.

श्रीनगरमध्ये स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्या उपस्थितीत राष्ट्रगीताचा अवमान

येथे मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्या उपस्थितीत राष्ट्रगीताचा अवमान करण्यात आला. स्वातंत्र्यदिनानिमित्त येथील बक्षी स्टेडियममध्ये आयोजित कार्यक्रमात राष्ट्रगीत चालू असतांना अनेक जण उभेच राहिले नाहीत.


Multi Language |Offline reading | PDF