(म्हणे) ‘काश्मीर प्रश्‍नात आंतरराष्ट्रीय समुदायाने हस्तक्षेप केलाच पाहिजे !’ – पाकचे नवनिर्वाचित पंतप्रधान शाहीद अब्बासी

काश्मीरच्या वादात आंतरराष्ट्रीय समुदायाने हस्तक्षेप केलाच पाहिजे, असे विधान पाकचे नवनिर्वाचित पंतप्रधान शाहीद अब्बासी यांनी केले आहे.

मुसलमानांना देशभक्तीचा पुरावा देण्याची आवश्यकता नाही ! – देहली अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष डॉ. जफरुल इस्लाम खान

मुसलमानांना त्यांची देशभक्ती सिद्ध करण्याची आवश्यकता नाही; कारण देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात आणि विकासामध्ये त्यांचे प्रमुख योगदान होते, असे विचार देहली अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष डॉ. जफरुल इस्लाम खान यांनी येथे मांडले.

हिंदूंच्या भावना समजून घेण्यात आयोगाला अपयश : निर्णय लोकशाहीविरोधी !

पणजी आणि वाळपई मतदारसंघांसाठीची पोटनिवडणूक २३ ऑगस्ट या दिवशी घेतल्यास त्याचा मतदानावर विपरीत परिणाम होणार आहे.

मशिदीचा मालक अल्ला असल्याने ती कोणालाही देता येणार नाही ! – असदुद्दीन ओवैसी

मशिदींची देखरेख करण्याचे काम शिया, सुन्नी, बरेलवी, सूफी, देवबंदी, सलाफी, बोहरी करू शकतात; पण ते त्याचे मालक होऊ शकत नाहीत.

भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे अडीच लाख रुपयांचे वीजदेयक थकित

भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी महावितरणचे २ लाख ५९ सहस्र १७६ रुपयांचे  देयक थकवले आहे.

कागदी लगद्याच्या श्री गणेशमूर्तींवर बंदी न घातल्यास न्यायालयाचा अवमान केल्याची याचिका प्रविष्ट करणार !

‘राष्ट्रीय हरित लवादा’च्या न्यायालयात कागदी लगद्याच्या मूर्तींना प्रोत्साहन देणारा शासकीय निर्णय चुकीचा असल्याचे सिद्ध होऊन न्यायालयाने शासनाच्या आदेशावर ३० सप्टेंबर २०१६ या दिवशी स्थगिती आणली.

पाकचे कट्टरतावादी नेहमी मंदिरे आणि गुरुद्वारा यांना लक्ष्य करतात ! – पाकमधील पत्रकार राऊफ क्लासरा

पाकमध्ये मंदिरे आणि गुरुद्वारे यांची स्थिती चांगली नाही. पाकमधील कट्टरतावादी नेहमी मंदिरे आणि गुरुद्वारे यांना लक्ष्य करतात. अनेक महत्त्वाची मंदिरे आणि गुरुद्वारे पाडली जातात.

इंडोनेशियामध्ये ६.६ तीव्रतेचा भूकंप

इंडोनेशियाच्या बेंग्कुलू प्रांतामध्ये सकाळी १० वाजता भूकंपाचे धक्के बसले. याची रिश्टर स्केलवर ६.६ इतकी तीव्रता मोजण्यात आली.

अकार्यक्षम पोलीस !

‘उत्तरप्रदेशातील आझमगडमध्ये २६ जुलैच्या रात्री राणी की सराय येथील रुदरी वळणावर ३३ वर्षांपूर्वी स्थापन करण्यात आलेली भगवान शंकराची मूर्ती अज्ञाताकडून तोडण्यात आली.


Multi Language |Offline reading | PDF