राजस्थानमध्ये महाविद्यालयांना गांधी जयंतीची सुट्टी नसणार

राजस्थानमधील विश्‍वविद्यालये आणि सरकारी महाविद्यालये यांना २ ऑक्टोबरला गांधी जयंतीची सुट्टी या वर्षापासून दिली जाणार नाही. राज्याचे उच्चशिक्षण मंत्री किरण माहेश्‍वरी यांनी ही माहिती दिली.

काश्मीरमध्ये २ सैनिक हुतात्मा, तर ३ आतंकवादी ठार

जिल्ह्यातील अवनीरा गावात आतंकवाद्यांशी झालेल्या चकमकीत २ सैनिक हुतात्मा झाले, तर एका कॅप्टनसह ३ सैनिक घायाळ झाले. या वेळी सैनिकांनी ३ आतंकवाद्यांना ठार केले.

अकार्यक्षम पोलीस !

‘कर्नाटकातून गोव्यात हत्येसाठी वाहतूक करण्यात येत असलेल्या ३ गायी आणि ३ वासरे यांची गोरक्षकांनी ३० जुलै २०१७ या दिवशी सुटका केली.

कुठे आपल्या शहाणपणाच्या मस्तीत आयुष्यभर रमणारे बुद्धीप्रामाण्यवादी, तर कुठे भगवान श्रीकृष्णाची शिकवण समजून घेऊन त्याचे शिष्यत्व स्वीकारून जीवनाचे कल्याण करणारा अर्जुन !

अर्जुनाच्या श्रीकृष्णाचे शिष्यत्व पत्करण्यामुळे तो अजरामर झाला, तर बुद्धीप्रामाण्यवाद्यांना ते जिवंत असतांनाही त्यांच्या अहंभावामुळे फारच थोडे ओळखतात !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले       

(म्हणे) ‘स्वातंत्र्यदिनी मदरशांमध्ये राष्ट्रगीत म्हणणार नाही !’ – मेरठ आणि बरेली येथील काजींची दर्पोक्ती

मदरशांमध्ये स्वातंत्र्यदिन साजरा केला जाईल; मात्र राष्ट्रगीत गायले जाणार नाही, अशी देशद्रोही भूमिका उत्तरप्रदेशातील मेरठ आणि बरेली येथील मदरशांतील काजींनी घेतली आहे.

रामजन्मभूमी खटल्याचा निकाल मुसलमानांच्या बाजूने लागला, तरी हिदूंना राममंदिर बांधू द्या !

रामजन्मभूमी खटल्याचा निकाल मुसलमानांच्या बाजूने लागला नाही, तरीही तो शांतपणे स्वीकारा आणि बाजूने लागला, तरीही हिंदूंनाच तेथे राममंदिर बांधू द्या, असे आवाहन मौलाना कस्बे सादिक यांनी मुसलमानांना केले आहे.

झारखंडमध्ये धर्मांतरविरोधी सरकारी विज्ञापनामध्ये मोहनदास गांधी यांचा वापर केल्याने ख्रिस्त्यांचा थयथयाट !

झारखंड सरकारने स्थानिक दैनिकांमध्ये धर्मांतराच्या विरोधात पानभर विज्ञापन प्रकाशित केले आहे. यात मोहनदास गांधी यांचे छायाचित्र घेण्यात आले आहे. यात गांधी यांचे धर्मांतरविरोधी उद्गारही आहेत.

महाराष्ट्र राज्य परिवहन विभागामध्ये गोंधळ असून राज्यशासनाने खात्यामध्ये शिस्त आणण्यास पुढाकार घ्यावा !

राज्याच्या परिवहन विभागात गोंधळ असून शिस्त आणण्यासाठी राज्यशासनाने विभागाला आदेश द्यावेत, असे ताशेरे भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (कॅग) यांनी ओढले आहेत.

हमीद अन्सारी यांना जेथे सुरक्षित वाटते त्या देशात त्यांनी जावे ! – रा.स्व. संघ

माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांचे वक्तव्य दुर्दैवी आहे. त्यांनी केलेले वक्तव्य मुसलमान समाजातही ऐकणारे कोणी नाही. त्यांच्या वक्तव्याचे समर्थन करणारेही कोणी पुढे आले नाही.


Multi Language |Offline reading | PDF