ताजमहाल कि तेजोमहालय ? – संस्कृती मंत्रालयाने स्पष्टीकरण देण्याचा केंद्रीय माहिती आयोगाचा आदेश

ताजमहालची निर्मिती मोगल बादशाह शाहजहान याने केली किंवा शिव मंदिर म्हणून राजपूत राजाने तजोमहालय मोगल बादशाहाला भेट दिले.

रामजन्मभूमी प्रकरणी ५ डिसेंबरला सुनावणी होणार

अयोध्येतील रामजन्मभूमी प्रकरणी येत्या ५ डिसेंबरला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

सिक्कीमजवळील गावे रिकामी केल्याचे वृत्त भारतीय सैन्याने फेटाळले

भारत-चीन यांच्यातील तणावाच्या परिस्थितीत सिक्कीमजवळील सीमेवरील कुपुप, नथांग आणि जुलुक यांसहीत अन्य गावे रिकामी करण्यात येत असल्याच्या वृत्ताचे भारतीय सैन्याने खंडण केले आहे.

ब्रेव्ह न्यू लूक आस्थापनाकडून भारतीय राष्ट्रध्वजाचे चित्र असणार्‍या लेगिंग्जची ऑनलाईन विक्री

सॅनफ्रॅन्सिस्को येथील ब्रेव्ह न्यू लूक या आस्थापनाने तिच्या संकेतस्थळावर भारतीय राष्ट्रध्वजाचे चित्र असलेल्या लेगिंग्ज ऑनलाईन विक्रीसाठी ठेवल्या आहेत.

शासनाने कागदी लगद्याच्या श्री गणेशमूर्तींवर बंदी न घातल्यास अवमान याचिका प्रविष्ट करू ! – हिंदु जनजागृती समिती

इको-फ्रेंडली म्हणून विकल्या जाणार्‍या कागदी लगद्याच्या मूर्ती या पर्यावरणाला घातक आहेत, हे मान्य करत शासनाच्या कागदी लगद्याच्या मूर्तींना प्रोत्साहन देण्याच्या निर्णयावर राष्ट्रीय हरित लवादाने स्थगिती आणली आहे.

स्वातंत्र्यदिनी मदरशांत स्वातंत्र्यदिन साजरा करून चित्रीकरण करा ! – उत्तरप्रदेश सरकारचा आदेश

उत्तरप्रदेशच्या मदरशांमध्ये स्वातंत्र्यदिनी राष्ट्रीय ध्वज फडकावून राष्ट्रगीत गाण्याचा आदेश मदरसा शिक्षण परिषदेने दिला आहे.

पंढरपूर-आळंदी आणि पंढरपूर-देहू या पालखी मार्गाचे काम लवकरात लवकर चालू करा !

पंढरपूर येथील लाखो भाविकांच्या मार्गात कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी पंढरपूर-आळंदी आणि पंढरपूर-देहू या पालखी मार्गाचे काम लवकरात लवकर चालू करण्याची मागणी केली.

‘एस्.आर्.ए’चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी विश्‍वास पाटील यांना तूर्तास दिलासा

मालाड येथील एस्आर्ए योजनेतील भूखंड वाटप गैरव्यवहाराच्या प्रकरणी एस्आर्एचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) विश्‍वास पाटील यांच्याविरुद्ध ८ सप्टेंबरपर्यंत प्राथमिक तक्रार (एफ्आयआर्) नोंदवण्यास ९ ऑगस्ट या दिवशी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला प्रतिबंध केला.


Multi Language |Offline reading | PDF