राजकारणी, बुद्धीप्रामाण्यवादी किंवा वैज्ञानिक यांच्यामुळे विदेशी भारतात येत नाहीत.

राजकारणी, बुद्धीप्रामाण्यवादी किंवा वैज्ञानिक यांच्यामुळे विदेशी भारतात येत नाहीत, तर संतांमुळे, तसेच अध्यात्म आणि साधना शिकण्यासाठी येतात.

रामजन्मभूमीवर राममंदिर बांधा ! – शिया वक्फ बोर्डाचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र

अयोध्येतील राम जन्मभूमीवर राममंदिर बांधले जावे. तसेच तेथून दूर मुसलमानबहुल भागात मशीदही उभारली जावी, असे प्रतिज्ञापत्र शिया वक्फ बोर्डाने सर्वोच्च न्यायालयात सादर केले आहे.

पाकमध्ये हिंदूंची बाजू मांडणार्‍या हिंदु खासदाराला धर्मांधांकडून विरोध : रॉचा हस्तक असल्याचा आरोप

पाकमधील हिंदूंच्या होणार्‍या धर्मांतराचा विरोध करणारे तेथील खासदार लालचंद माल्ही यांना धर्मांधांकडून विरोध होऊ लागला आहे.

काश्मीरमधील मुसलमानेतरांना अल्पसंख्यांक दर्जा देण्याविषयी ३ मासांत निर्णय घ्या !

जम्मू-काश्मीरमधील मुसलमानेतरांना अल्पसंख्यांकांचा दर्जा देण्याविषयी केंद्र सरकारने येत्या ३ मासांत निर्णय घ्यावा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने सरकारला दिला.

शिक्षण विभागाने चालू केलेली १२० पैकी ९७ व्हिडिओ कॉन्फरन्स केंद्र मनुष्यबळाच्या अभावी बंद

राज्यातील शिक्षण विभागातील अधिकार्‍यांशी तातडीने संपर्कात रहाण्यासाठी शिक्षण विभागाने राज्यात १२० व्हिडिओ कॉन्फरन्स केंद्र चालू केली होती.

गायींचे रक्षण करणार ! – नितीशकुमार

गाय दूध देणारी असो वा न देणारी, तिचे रक्षण आम्ही करणार. शेण आणि गोमूत्र यांचा उपयोगही केला जाणार, असे विधान बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केले आहे.

अन्य धर्मियांच्या कार्यक्रमात पोलीस असे कधी करतात का ?

कुडाळ (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील गुरुपौर्णिमा महोत्सवाच्या कार्यक्रमात पोलीस प्रशासनाच्या जिल्हा गोपनीय शाखेचे पोलीस कर्मचारी येऊन बसले होते.

राहुल गांधी स्वतःच त्यांच्यावरील आक्रमणासाठी उत्तरदायी ! – केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह

गुजरातमध्ये राहुल गांधी यांच्या गाडीवर झालेल्या आक्रमणाला ते स्वत:च उत्तरदायी आहेत. त्यांनी सुरक्षेचे नियम पाळले नाहीत, असा आरोप केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत केला.

काश्मीरमध्ये ५ आतंकवादी ठार

काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील माछिल सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न करणार्‍या ५ आतंकवाद्यांना सुरक्षादलांनी ठार केले.

शाळांमध्ये योगासनांचे शिक्षण बंधनकारक करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

प्राथिमक शाळांमध्ये पहिली ते ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी योगासनांचे शिक्षण बंधनकारक करण्यात यावे, यासाठी सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट करण्यात आलेली याचिका न्यायालयाने फेटाळून लावली.


Multi Language |Offline reading | PDF