पाकिस्तान पाकव्याप्त काश्मीरमध्ये चीनच्या साहाय्याने ६ धरणांची निर्मिती करणार

पाकिस्तान पाकव्याप्त काश्मीरमध्ये चीनच्या साहाय्याने सिंधू नदीवर ६ धरणे बांधणार आहे, अशी माहिती केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री व्ही.के. सिंह यांनी राज्यसभेत दिली.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

औषधाने गुण न आल्यास औषधे पालटतात, तशी स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या ७० वर्षांच्या कालावधीत एकाही विषयात जनतेचे काही एक भले न करणारी लोकशाही आता नको, तर हिंदु राष्ट्राची स्थापना करायला हवी ! –  (परात्पर   गुरु) डॉ. आठवले

पाकने वापर करून घेतल्याची आतंकवादी अबू दुजानाला जाणीव ! – सैन्यासमवेतच्या संभाषणातून माहिती उघड

लष्कर-ए-तोयबाचा कमांडर अबू दुजाना याला काही दिवसांपूर्वी सैन्याने ठार केले. तत्पूर्वी सैन्याधिकार्‍यांनी त्याला आत्मसमर्पण करण्याचे आवाहन केले होते. पाकिस्तान तुझा वापर करत आहे, असेही त्याला सांगण्यात आले.

चीनसमवेत युद्ध हा अंतिम पर्याय नाही ! – परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज

युद्ध हा कोणत्याही समस्येवरील उपाय असू शकत नाही. युद्धानंतरही संवाद साधावा लागतो. त्यानंतरच तोडगा काढता येऊ शकतो. डोकलाम प्रकरणात वाटाघाटींच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न आहे.

गृह आधार योजनेचा लाभ घेण्यासाठी बनावट मिळकतीचा दाखला देऊ नका !

गृहआधार योजनेचा लाभ घेण्यासाठी बनावट मिळकतीचा दाखला देऊ नका, असे आवाहन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी ३१ जुलै या दिवशी गोवा विधानसभेत अनुदानित मागण्यांवरील चर्चेला उत्तर देतांना केले.

फरीदाबाद (हरियाणा) येथे रणरागिणी शाखेकडून अभिनेत्री सनी लिओन यांच्या अश्‍लील संकेतस्थळाच्या विरोधात तक्रार

हिंदु जनजागृती समितीची रणरागिणी शाखा आणि अन्य जागृत महिला यांनी येथील सेक्टर २८ मधील पोलीस ठाण्यात अभिनेत्री सनी लिओन यांच्या अश्‍लील संकेतस्थळाच्या विरोधात तक्रार केली. या तक्रारीवर २८ महिलांनी स्वाक्षर्‍या केल्या आहेत.

आयआयटी देहलीला पंचगव्यावर संशोधन करण्यासाठी ५० प्रस्ताव

आयआयटी देहलीला पंचगव्यावर (शेण, गोमूत्र, दूध, दही आणि तूप) संशोधन करण्यासाठी विविध शिक्षण संस्था आणि संशोधन संस्था यांच्याकडून ५० हून अधिक प्रस्ताव मिळाले आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री वाय.एस्. चौधरी यांनी लोकसभेत ही माहिती दिली.

सैन्याचे बंकर्स बनवतांना गायीच्या शेणाचा वापर करावा ! – इंद्रेश कुमार

जगातील ९० टक्के लोकसंख्या गायीच्या दुधावर अवलंबून असल्यामुळे गायीला माणुसकीची माता म्हणावे लागेल. गाय विषारी गोष्टी स्वत:च्या शरीरात ठेवते आणि आपल्याला दूध आणि शेण देते.

गोवा पोलीस दलात ९६६ कर्मचार्‍यांची आवश्यकता ! – मुख्यमंत्री पर्रीकर

गोवा पोलीस दलात पोलीस कर्मचार्‍यांची कमतरता आहे. पोलीस दलात ९६६ कर्मचार्‍यांची आवश्यकता आहे, अशी माहिती गृहमंत्री या नात्याने मुख्यमंत्री पर्रीकर यांनी दिली आहे.

समृद्धी महामार्ग प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक मोपलवार यांना पदावरून हटवले !

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा समृद्धी महामार्ग प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांची १ मासात चौकशी पूर्ण केली जाईल. सभागृहाच्या विरोधी पक्षातील सदस्यांच्या भावना लक्षात घेता मोपलवार यांची चौकशी होईपर्यंत त्यांना पदावर ठेवणार नाही


Multi Language |Offline reading | PDF