रुग्णांशी प्रेमाने कसे बोलावे ?, हे न शिकवणारी आधुनिक वैद्यकीय महाविद्यालये !

वैद्यकीय महाविद्यालयांत बौद्धिक स्तराचे सर्व शिक्षण देतात; पण सर्वांत महत्त्वाचे म्हणजे रुग्णांशी प्रेमाने कसे बोलावे ? त्यांना मानसिक आधार कसा द्यावा, हेच शिकवत नाहीत ! त्यामुळे डॉक्टर रुग्णांकडे माणूस म्हणून न पहाता केवळ उत्पन्नाचे एक साधन म्हणून पहातात !- (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

काश्मीरमध्ये लष्कर-ए-तोयबाचा मुख्य कमांडर अबू दुजाना आणि अन्य २ आतंकवादी ठार

काश्मीरच्या पुलवामामधील काकापोरा येथे सुरक्षादलाच्या सैनिकांनी लष्कर-ए-तोयबाचा मुख्य कमांडर अबू दुजाना आणि अन्य २ आतंकवादी यांना ठार केले.

(म्हणे) चिनी सैन्याकडे कोणत्याही घुसखोराला पराजित करण्याची शक्ती !

चीनच्या नागरिकांना शांती हवी आहे. आम्ही कोणावरही आक्रमण करणार नाही आणि स्वतःचा विस्तार करणार नाही; मात्र आमच्या सैन्यात कोणत्याही घुसखोराला रोखण्याची शक्ती आहे, असे विधान चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी भारताचे नाव न घेता केले आहे.

(म्हणे) पीके चित्रपटात आमीर खानने शिवाच्या मूर्तीचा अवमान केला होता, तसा मी केला, तर काय बिघडले ? – मूर्तीभंजकाचा प्रश्‍न

पीके चित्रपटात आमीर खान याने भगवान शिवाच्या मूर्तीचा अवमान केला, तेव्हा कोणी एवढा गोंधळ घातला नव्हता. मग मी मूर्ती तोडली, तर एवढी आरडाओरड का करता ?

गुजरातचे माजी पोलीस अधिकारी वंजारा आणि एम्.एन्. दिनेश आरोपमुक्त

गुजरातमधील बहुचर्चित सोहराबुद्दीन चकमक प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआयच्या) विशेष न्यायालयाने गुजरातचे माजी पोलीस उपमहानिरीक्षक डी.जी. वंजारा आणि आयपीएस् अधिकारी एम्.एन्. दिनेश यांना आरोपांतून मुक्त केले आहे.

(म्हणे) ‘दोन विभागांचे पुरस्कार एकाच नावाने नसावेत; म्हणून नाव पालटले !’ – अल्पसंख्यांक विभागाची सारवासारव

अल्पसंख्यांक आणि सांस्कृतिक कार्य या दोन विभागांचे पुरस्कार एकाच नावाने नसावेत, म्हणून कवी मिर्झा गालिब जीवनगौरव पुरस्कार असे नामकरण केले, असा खुलासा अल्पसंख्यांक खात्याच्या वतीने माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या उपसंचालक (वृत्त) यांनी केला आहे.

एखाद्याने वन्दे मातरम् म्हटले नाही, तर काय बिघडणार आहे ?

दोन समाजांत तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने वन्दे मातरम्चे सूत्र जाणीवपूर्वक काढले जात आहे. वन्दे मातरम् प्रत्येकाने म्हटलेच पाहिजे; पण जर एखाद्याने वन्दे मातरम् म्हटले नाही, तर काय बिघडणार आहे ?

गाझीपूर (उत्तरप्रदेश) मध्ये चोरांच्या आक्रमणात महंतांचा मृत्यू

महंमदाबाद तालुक्यातील माढुपूर येथील मठातील मूर्ती चोरणार्‍या चोरांनी मठाचे महंत विजय राघव दास यांना लाठाकाठ्यांनी गंभीर मारहाण केली होती. या मारहाणीत घायाळ झालेले महंत दास यांनी वाराणसी ट्रॉमा सेंटरमध्ये ५ दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर शेवटचा श्‍वास घेतला.

(म्हणे) वर्षातील ३ दिवस कुर्बानी देण्यास अनुमती द्या ! – आमदार अबू आझमी, समाजवादी पक्ष

गोवंश हत्याबंदी कायद्याच्या नावावर तथाकथित गोरक्षक अल्पसंख्यांकांवर अत्याचार करतात. गोवा, केरळ, कर्नाटक आणि अन्य राज्यांत गोहत्या बंदी नाही. तेथे गोवंश हत्याबंदी का नाही ?

पाच वर्षांत ४०० विदेशी नागरिकांवर गुन्हे दाखल : नायजेरियन नागरिकांचा सर्वाधिक भरणा

राज्यात मागील पाच वर्षांत सुमारे ४०० हून अधिक विदेशी नागरिकांवर विविध गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.


Multi Language |Offline reading | PDF