साधक, जिज्ञासू आणि धर्मप्रेमी यांच्या प्रवास व्यवस्थेसाठी सुस्थितीतील बस अथवा धनरूपात अर्पण करून धर्मकार्यात सहभागी व्हा !

सनातनचे राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांचे कार्य झपाट्याने वाढत आहे. पूर्णवेळ साधना करण्यासाठी आणि राष्ट्र-धर्म यांच्या कार्यात सहभागी होण्यासाठी अनेक जण रामनाथी आश्रमात वास्तव्याला येत आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

पूर्वीच्या काळात सर्व साधना करणारे असल्यामुळे त्यांना इतरांशी कसे बोलावे ? इतरांबरोबर कसे वागावे ?, हे शिकवावे लागत नसे. ते लहानपणापासूनच अंगी मुरलेले असे. आता मात्र ते प्रत्येकाला शिकवावे लागते ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

अल्पसंख्यांक विकास विभागाने उर्दू अकादमीच्या संत ज्ञानेश्‍वर पुरस्काराचे नाव पालटून मिर्झा गालिब जीवन गौरव पुरस्कार केले

अल्पसंख्यांक विकास विभागाच्या उर्दू अकादमीच्या वतीने दिल्या जाणार्‍या संत ज्ञानेश्‍वर पुरस्काराचे नाव पालटून मिर्झा गालिब जीवन गौरव पुरस्कार करण्यात आले आहे. साहित्य क्षेत्रात चांगली कामगिरी बजावणार्‍या साहित्यिकांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो

चीनकडून उत्तराखंडातील चमोली येथे घुसखोरीचा प्रयत्न

भारत आणि चीन यांच्यात डोकलाम तिढ्यावरून तणाव निर्माण झालेला असतांनाच चीनकडून २६ जुलैच्या दिवशी उत्तराखंडातील चमोली येथे घुसखोरीचा प्रयत्न करण्यात आला. चमोली जिल्ह्यातील बाराहोटी येथे चीनचे सैनिक एक किलोमीटर आत घुसले

इटलीमध्ये मुसलमान शरणार्थींना प्रवेश देण्यावर बंदी घाला ! – रोमच्या महापौरांची सरकारकडे मागणी

रोम शहराच्या महापौर व्हर्जिनिया रॅगी यांनी शहरात येणार्‍या विस्थापित मुसलमान शरणार्थींना त्यांच्या देशात प्रवेश देण्यावर तात्काळ बंदी आणण्याची मागणी इटली सरकारकडे केली आहे. रोमवर आक्रमण करण्याचे इसिसचे लक्ष्य आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

जमावाच्या मारहाणीला भाजपची फूस ! – काँग्रेसचा आरोप

देशात जमावाकडून होणार्‍या मारहाणीला विश्‍व हिंदु परिषद, बजरंग दल आणि गोरक्षक हे उत्तरदायी आहेत अन् त्यांना केंद्र सरकारने छुपे प्रोत्साहन दिले आहे. त्यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही, असा आरोप काँग्रेसचे नेते आणि खासदार मल्लिकार्जुन खरगे यांनी लोकसभेत केला

न्यायालयाच्या निकालानुसार राममंदिराची उभारणी ! – अमित शहा

अयोध्येतील राममंदिराची उभारणी ही न्यायालयाच्या निकालानुसार किंवा दोन्ही बाजूंशी चर्चा केल्यानंतरच होईल. याविषयी भाजपच्या भूमिकेत कोणताही पालट झालेला नाही, असे उत्तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी याविषयी विचारण्यात आलेल्या एका प्रश्‍नाला दिले.

(म्हणे) भारताला हिंदु राष्ट्र बनवण्याचा प्रयत्न झाल्यास त्याला प्राणपणाने विरोध करू !

भारत हे संविधानिकदृष्ट्या हिंदु राष्ट्र बनवण्याचा प्रयत्न झाल्यास त्याला प्राणपणाने विरोध केला जाईल. हिंदु राष्ट्राच्या विरोधात निदर्शने आणि आंदोलने केली जातील, असे ऑल इंडिया कॅथलिक युनियनचे माजी अध्यक्ष तथा प्रवक्ता जॉन दयाल पणजी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले

निलंबित पोलीस अधिकारी विश्‍वनाथ घनवट यांच्यासह अन्य पोलिसांना ३ मासांनंतरही अटक नाही

वारणानगर येथील शिक्षक वसाहतीतील ९ कोटी १८ लक्ष रुपयांच्या चोरी प्रकरणात निलंबित केलेले सांगली येथील पोलीस अधिकारी यांच्यासह एकूण ११ जणांवर कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा प्रविष्ट झाला आहे


Multi Language |Offline reading | PDF