डोकलाम येथे रस्ता बांधणीचे काम चीन पुन्हा चालू करणार

सीमेचे रक्षण, जीवनमान उंचावणे यांसाठी रस्ते बांधणी चालू असून चीनने रस्ते बांधणीत फार पूर्वीपासून काम चालू केले आहे, असे विधान चीनच्या परराष्ट्र प्रवक्त्या हुआ चुनयिंग यांनी केलेे. चीन डोकलाममध्ये रस्ते बांधणीचे काम चालू ठेवणार का ?

श्री गणेशाची आरती करणारे ४ मुसलमान इस्लाममधून बहिष्कृत

एकतेचे दर्शन घडवण्यासाठी रमजानपुरा भागात गणरायाची आरती करणार्‍या चौघा मुसलमान तरुणांना २७ ऑगस्टला इस्लाममधून बहिष्कृत करण्यात आलेे. काही मुसलमान धर्मगुरु आणि संघटना यांनी या तरुणांच्या विरोधात फतवा काढला

धार्मिक उत्सवांच्या निमित्त फटाके वाजवून इतरांना त्रास देणार्‍यांवर देव कधीतरी कृपा करील का ?

राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी बांधवांनो, धार्मिक उत्सवांच्या निमित्त हिंदु बांधवांकडून अन् उत्सव मंडळांकडून होणार्‍या वरील चुकीविषयी त्यांचे प्रबोधन करा ! आवश्यक वाटल्यास याविषयी हिंदु जनजागृती समिती तुम्हाला साहाय्य करील ! नियमबाह्य फटाके वाजवण्यात येत असतील, तर त्याविषयी पोलिसांकडे रीतसर गार्‍हाणे मांडा

शासनाने सर्वच क्षेत्रांतील भोंदूगिरीच्या विरोधात कारवाई करायला हवी ! – शंभू गवारे, प्रवक्ता, सनातन संस्था

भोंदूगिरी ही सर्वच क्षेत्रांत असून केवळ अध्यात्मातच आहे, असे नाही. इतर क्षेत्रांतही भोंदूगिरी आहे; म्हणून ते संपूर्ण क्षेत्र कलंकित आहे, असे आपण म्हणत नाही. त्याचप्रमाणे संपूर्ण अध्यात्माला कलंकित म्हणणे चुकीचे आहे.

मुंबई पोलिसांकडून श्री गणेशाचे मानवीकरण करून विडंबन

पोलिसांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर गणेशोत्सवातील ध्वनीप्रदूषणाच्या संदर्भात सूचना देण्यासाठी केलेल्या ट्वीटमध्ये गणपतीची  दोन चित्रे दाखवली आहेत. पहिल्या चित्रात साधा गणपति आहे आणि दुसर्‍या चित्रात त्याच गणपतीने दोन्ही हात कानांवर ठेवले आहेत.

गिरिडीह (झारखंड) येथे श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीवर मशिदींमधून दगडफेक आणि गोळीबार

पचंबा भागामध्ये २६ ऑगस्टच्या रात्री धर्मांधांच्या जमावाने श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक केली आणि गोळीबार केला. यात २ जण घायाळ झाले. विसर्जन मिरवणूक वाद्यांसह येथील मशिदीजवळ आली असता……

शरण येणार्‍या रोहिंग्या मुसलमानांना बांगलादेशने हाकलले !

म्यानमारच्या राखिन प्रांतात गेल्या काही दिवसांपासून रोहिंग्या मुसलमान आतंकवादी आणि म्यानमारचे सैन्य यांच्यात हिंसाचार चालू आहे. यामुळे अनेक रोहिंग्या मुसलमान नागरिक घर सोडून बांगलादेशमध्ये पलायन करत आहेत

(म्हणे) ‘हिटलरविषयी प्रेम असणारे लोक ज्यू लोकांना भेटत आहेत !’

आताच्या शासनातील एकाही मंत्र्याने संविधानावर हात ठेवून शपथ घेतली नाही. सर्वांनी ईश्‍वराला साक्षी मानून शपथ घेतली. गेल्या ५० वर्षांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पोसला गेला आणि आपण लक्ष दिले नाही.

आनंदी जीवनासाठी दोष आणि अहं निर्मूलन करणे आवश्यक ! – सद्गुरु नंदकुमार जाधव

मानवजन्माचे ध्येय आनंदप्राप्ती करणे आहे; पण सुख आणि दु:ख यांच्या पलीकडचा आनंद कसा मिळवायचा, हे ठाऊक नसल्याने जीवनाची दिशा भरकटत जाते.

गणेशोत्सवात वर्गणी गोळा करण्यासाठीच्या पूर्वानुुमतीची पुणे शहरातून केवळ ५५ आवेदने

सर्व गणेशोत्सव मंडळे आणि विश्‍वस्त संस्था यांना चालू वर्षांपासून उत्सवासाठी देणग्या आणि वर्गणी गोळा करण्यासाठी धर्मादाय आयुक्त कार्यालयाची ‘ऑनलाइन’ वा ‘ऑफलाइन’ लेखी पूर्वानुुमती घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.


Multi Language |Offline reading | PDF