धुळे येथील धर्मजागृती सभेला लोटला २२ सहस्रांहून अधिक हिंदूंचा जनसागर !

२५ डिसेंबरला अपूर्व उत्साहात आणि २२ सहस्रांहून अधिक श्रोत्यांच्या उपस्थितीत हिंदु जनजागृती समितीची हिंदु धर्मजागृती सभा पार पडली. या सभेसाठी जनसामान्यांपासून ते केंद्रीय मंत्र्यांपर्यंत सर्वजण एक हिंदू म्हणून उपस्थित होते.

वादग्रस्त ‘पद्मावती’ चित्रपटाचे नाव पालटणार !

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावती’ या वादग्रस्त चित्रपटाचे नाव पालटून ते ‘पद्मावत’ करावे, अशी सूचना केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाच्या (सेन्सॉर बोर्डाच्या) ६ सदस्यांच्या समितीने निर्मात्यांना केली.

कमला मिल आग प्रकरणी ३ आरोपींच्या विरोधात लूकआऊट नोटीस

कमला मिलमधील ‘मोजोस् बिस्रो’ आणि ‘१ अबव्ह’ या उपाहारगृहांना २८ डिसेंबरच्या रात्री लागलेल्या आगीत होरपळून १४ जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी ३ आरोपींना लूकआऊट नोटीस काढण्यात आली आहे.

कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबियांना अपमानास्पद वागणूक देणार्‍या पाकला कायमचा धडा शिकवा !

पाकच्या कह्यात असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना भेटण्यासाठी गेलेल्या त्यांच्या कुटुंबियांना पाकिस्तानने अत्यंत अपमानास्पद वागणूक देऊन मानवतेला काळीमा फासला आहे.

मालवण जेटी ते सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी होडी वाहतूक १ जानेवारीपर्यंत बंद

सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक वेलफेअर असोशिएशनने बंदर विभागाला प्रलंबित मागण्यांचे निवेदन १ मासापूर्वी दिले होते.

काश्मीरचे तुणतुणे !

२५ डिसेंबरला भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून पाकच्या तीन सैनिकांना मारले. पाकच्या सैन्याने केलेल्या भारतीय सैन्याच्या हानीचा तो प्रतिशोध होता.

संस्कृत भाषेतील जाणकारांनी संस्कृत श्‍लोक, मंत्र आणि सुभाषिते पडताळण्याची सेवा करून ग्रंथसेवेत हातभार लावावा !

१. संस्कृत भाषेचे माहात्म्य आणि सनातन संस्थेने विविध लिखाणांत संस्कृत श्‍लोकांचा अंतर्भाव करण्यामागील कारण
संस्कृत ही देवभाषा असून सर्व भाषांची जननी मानली जाते. ती अतिशय अर्थपूर्ण आणि चैतन्यदायी भाषा आहे.

पाश्‍चात्त्य संस्कृतीनुसार नववर्ष साजरे करणार्‍या व्यक्ती आणि सभोवतालचे वातावरण यांवर होणार्‍या परिणामांची पू. (सौ.) योया वाले यांना जाणवलेली सूक्ष्मातील वैशिष्ट्ये !

पाश्‍चात्त्य संस्कृतीनुसार नवीन वर्ष साजरे करण्याची व्यक्तीमध्ये असलेली उत्सुकता ही मानसिक स्तरावरील असल्याने असे होते.

केरळ येथे हिंदु जनजागृती समितीच्या नववर्ष १ जानेवारीला नव्हे, तर गुढीपाडव्याला साजरे करा, या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राबवण्यात आलेल्या नववर्ष १ जानेवारीला नव्हे, तर युगादीला साजरे करा, या मोहिमेला हिंदूंकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.

साधकांना सूचना प्रारंभ – पौष शुक्ल पक्ष चतुर्दशी (१.१.२०१८) सकाळी ११.४५ वाजता समाप्ती – पौष पौर्णिमा (२.१.२०१८) सकाळी ७.५४ वाजता दोन दिवसांनी पौर्णिमा आहे.


Multi Language |Offline reading | PDF