परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना ‘तुमचा शब्दांच्या पलीकडचा टप्पा, म्हणजे साधनेतील ‘विश्वकार्याचा’ टप्पा चालू झाला आहे’, असे सांगणे

एका ज्ञानाच्या धारिकेतील काही उत्तरे काढण्यासाठी मला एक धारिका पाठवली होती. त्याविषयी मी परात्पर गुरुदेवांना भ्रमणभाषवर म्हणाले, ‘‘गुरुदेव, अजून मी त्या धारिकेतील प्रश्नाचे उत्तर काढले नाही; परंतु लवकरच मी ती सेवा पूर्ण करते.’’ गुरुदेव मला म्हणाले, ‘‘तुम्ही आता ज्ञान ग्रहण करण्याची सेवा करण्याची आवश्यकता नाही. तुमचा ज्ञानाचा टप्पा संपला आहे. आता तुमचा शब्दांच्या पलीकडचा टप्पा, म्हणजे साधनेतील ‘विश्वकार्याचा’ टप्पा चालू झाला आहे.’’

दैनिक ‘सनातन प्रभात’मधील श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या चरणांचे छायाचित्र पहातांना त्यातून पांढरा प्रकाश येत असल्याचे दिसणे

‘मी २४.५.२०२० या दिवशीचा दैनिक ‘सनातन प्रभात’चा अंक भ्रमणभाषवर वाचत होते. मी ‘देवी आणि महर्षि यांनी वर्णिलेल्या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या दिव्यत्वाची प्रचीती आधुनिक वैज्ञानिक संशोधनातूनही मिळणे’, हे सूत्र वाचत असतांना माझे लक्ष लेखात छापलेल्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताईंच्या चरणांच्या छायाचित्राकडे गेले. मला त्यांच्या चरणांतून पांढरा प्रकाश येत असल्याचे दिसले.

कठीण प्रसंगाला स्थिर राहून सामोरे जाणार्‍या आंजर्ले (जिल्हा रत्नागिरी) येथील श्रीमती शुभांगी गुहागरकर ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त !

आंजर्ले येथील श्रीमती शुभांगी सुरेश गुहागरकरआजींची गुरुदेवांच्या कृपेने ६१ टक्के आध्यात्मिक पातळी झाली आहे, अशी आनंदवार्ता सनातनचे सद्गुरु सत्यवान कदम यांनी ७ ऑक्टोबर २०२१ या दिवशी एका अनौपचारिक कार्यक्रमात भ्रमणभाषद्वारे दिली. या आनंदवार्तेमुळे या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या आणि भ्रमणभाषद्वारे जोडलेल्या साधकांची भावजागृती होऊन त्यांची परात्पर गुरुदेवांच्या चरणी अन् श्री दुर्गादेवीच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.

६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे कै. प्रभाकर पिंगळे यांच्या निधनापूर्वी आणि निधनानंतर त्यांची सून सौ. मधुवंती पिंगळे यांना जाणवलेली सूत्रे

३०.९.२०२१ या दिवशी प्रभाकर पिंगळेआजोबा यांचे निधन झाले. ११.१०.२०२१ या दिवशी त्यांच्या निधनानंतरचा बारावा दिवस आहे. त्या निमित्ताने त्यांची सून आधुनिक वैद्या (डॉ.) सौ. मधुवंती पिंगळे यांना जाणवलेली सूत्रे येथे देत आहोत.

देवद आश्रमातील साधक श्री. अमित हावळ यांना श्री दुर्गादेवीचा नामजप करतांना तिचे अस्तित्व जाणवणे

सभागृहाच्या मध्यभागी श्री दुर्गादेवीचे दर्शन होऊन ‘ती हातातील शस्त्रांनी सूक्ष्म युद्ध करून साधकांचे रक्षण करत आहे’, असे दिसणे आणि ते दृश्य पाहून भाव जागृत होणे.

६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे प्रभाकर पिंगळेआजोबा यांच्या निधनानंतर त्यांचे अंत्यदर्शन घेतांना आणि अंत्यविधीच्या वेळी साधिकेला जाणवलेली सूत्रे !

३०.९.२०२१ या दिवशी प्रभाकर पिंगळेआजोबांचे निधन झाल्यावर त्यांचे अंत्यदर्शन घेतांना आणि दुसर्‍या दिवशी त्यांच्या अंत्यविधीच्या वेळी साधिकेला जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांकडून करवून घेतलेली आदिशक्तीची उपासना !

सनातन संस्थेत ‘कविता करणारे, राष्ट्र आणि धर्म यांवर अभ्यासपूर्ण भाष्य करणारे किंवा साधनेच्या विविध पैलूंवर लिखाण करणारे अनेक साधक असणे; कारण त्यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी श्री सरस्वतीदेवीचा कृपाशीर्वाद मिळवून दिलेला असणे

‘पू. अनंत आठवले यांची वैशिष्ट्ये’ या ग्रंथाचे रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात चैतन्यमय वातावरणात प्रकाशन !

सनातनचे १०१ वे संत पू. अनंत आठवले (पू. भाऊकाका) यांची गुणवैशिष्ट्ये उलगडणार्‍या नूतन मराठी ग्रंथाचे रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात चैतन्यमय वातावरणात प्रकाशन करण्यात आले.

सनातनची अनमोल ग्रंथसंपदा सर्वांपर्यंत पोचवण्यासाठी सनातनचे संत पू. रमानंद गौडा यांनी राबवण्यात आलेले ‘सनातन धर्माचे ज्ञानशक्ती प्रसार अभियान’ !

‘पू. रमानंद गौडा यांना सनातन धर्माचे ज्ञानशक्ती प्रसार अभियानाची संकल्पना कशी सुचली ? त्यांनी तळमळीने आणि परिश्रम घेऊन या अभियानाचे सुनियोजन कसे केले अन् त्यातून आम्हाला कोणती सूत्रे शिकायला मिळाली ?’, हे पुढे दिले आहे.