रंगपंचमीचा सण भारी, भक्तीरंगात रंगला श्रीहरि ।

क्षणोक्षणी व्याकुळ होई राधा, जळी स्थळी दिसे तिला कान्हा ।
अकस्मात् तो समोर येता, शुद्ध हरपून पहात राहे त्याला राधा ।।

परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अखंड कृपा अनुभवणार्‍या आणि स्वतःच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या चरणी अनन्यभावे कृतज्ञता व्यक्त करणार्‍या नवी मुंबई येथील श्रीमती ललिता गोडबोले !

गुरुदेवांनी सांगितल्यानुसार ‘या जन्मातील माझी साधना प्रारब्धभोग संपवण्यासाठी, तसेच या आणि पुढच्या जन्मी परम पूज्यांचे चरण घट्ट धरण्यासाठी शक्ती मिळवण्यासाठी आहे’, याची जाणीव होणे

मनुष्‍यजीवन आणि अध्‍यात्‍म !

आद्यशंकराचार्यांकडे एक अनोळखी माणूस ब्रह्मज्ञानाविषयी काही शंका विचारायला आला. आचार्यांनी त्‍याच्‍या शंकेचे योग्‍य समाधान केले. तो दुसर्‍या दिवशी परत आला.

पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी यांच्या खोलीत निवासासाठी राहिल्यामुळे त्यांच्या माध्यमातून चैतन्य मिळून २ साधिकांच्या आध्यात्मिक त्रासाची तीव्रता उणावणे

काही जणांकडे पाहिल्यावर आपल्याला आनंदाची अनुभूती येते; पण पू. आजींकडे पाहिल्यावर अतिशय शांत वाटते.

रेल्वेने प्रवास करत असतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे जन्मस्थान असलेले ‘नागोठणे’ हे नाव वाचल्यानंतर साधिकेच्या विचारप्रक्रियेत झालेले सकारात्मक पालट !

‘पूर्वजन्मीच्या पुण्याईमुळे आपल्याला संतांचा सत्संग मिळतो. पू. (सौ.) अश्विनीताईंनी घेतलेल्या सत्संगामुळे माझे कितीतरी जन्मांचे प्रारब्ध न्यून झाले असेल.’

अंतर्मुखता, निर्मळता आणि इतरांचा विचार करणे हा स्थायीभाव असणार्‍या सनातनच्या ४८ व्या (व्यष्टी) संत पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी (वय ९१ वर्षे) !

‘इतरांचा विचार करणे’ हा पू. आजींचा स्थायीभावच आहे. खोलीत कुणी झोपत असेल आणि पंखा लावायचा असेल, तर इतरांना न सांगता त्या स्वतःच लावतात.

हे श्रीसत्‌शक्ति माते, तुझी प्रत्येक कृती शिकण्यासाठी ।

‘एकदा माझी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्याकडील सेवा पूर्ण झाल्यावर माझ्या मनात आले, ‘त्यांच्या प्रत्येक कृतीतून मला पुष्कळ शिकता येते, त्यांची प्रत्येक कृती ही भगवंताची लीलाच आहे’, या विचारांनी मला पुष्कळ आनंद झाला. तेव्हा देवाने मला पुढील कविता सुचवली.

साधकांनो, तीर्थक्षेत्राप्रमाणे पवित्र आणि चैतन्यमय अशा सनातनच्या आश्रमात राहून चैतन्याचा लाभ करून घ्या अन् आंतरिक समाधानाची अनुभूती घ्या !

साधक घरी नामजप, स्वयंसूचनांचे सत्र आणि आध्यात्मिक उपाय, असे साधनेचे प्रयत्न करत असले, तरी आश्रमातील चैतन्यामुळे त्यांना मनाची स्थिरता अनुभवता येऊन आंतरिक समाधान अन् शांती मिळते.

अयोध्येतील श्री रामलल्लाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या वेळी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे !

‘२२.१.२०२४ या दिवशी अयोध्या येथे झालेल्या श्री रामलल्लाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ अयोध्या येथे आल्या होत्या, तेव्हा मला त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.

सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करतांना रामनाथी (गोवा) आश्रमातील श्रीमती मनीषा विजय केळकर (वय ६८ वर्षे) यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !

२८ मार्च २०२४ या दिवशी ‘श्रीमती मनीषा केळकर यांच्यावर बालपणी झालेले धार्मिक संस्कार, शिक्षण’ इत्यादी पाहिले. आता या भागात ‘त्यांचा सनातन संस्थेशी संपर्क झाल्यावर त्यांनी केलेली साधना, केलेल्या सेवा आणि त्यांना आलेल्या अनुभूती’ पहाणार आहोत. (भाग २)