परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी धारण केलेल्या (पूजेपुरत्या पायांत घातलेल्या) पादुकांचे छायाचित्र असलेले दैनिक ‘सनातन प्रभात’ घरी आल्यावर ‘स्वामी समर्थांच्या पादुका आल्या’ या भावाने ते छायाचित्र देवघरात ठेवणे

‘अकोला येथील महिलांच्या धर्मशिक्षणवर्गात येणार्‍या सौ. रंजना धामणीकर स्वामी समर्थ संप्रदायानुसार साधना करतात. त्यांनी १९.२.२०१९ या दिवशी रामनाथी आश्रमात झालेल्या श्री गुरुपादुका-प्रतिष्ठापना सोहळ्याचे संगणकीय प्रक्षेपण पाहिले.

श्री महालक्ष्मीमाते, आता येई गे, सत्वरी ।

‘ब्रह्मांडातील श्री महालक्ष्मीदेवीचे तत्त्व पृथ्वीवर आकृष्ट होण्यासाठी भृगु महर्षींच्या आज्ञेने रामनाथी आश्रमातील यज्ञकुंडाजवळ कमलपिठाची स्थापना आणि लक्ष्मीदीप प्रज्वलित करण्यात येणार आहे’, अशी आश्रमातील फलकावर लिहिलेली सूचना मी वाचली. तेव्हा माझा भाव जागृत झाला आणि पुढील ओळी लिहिल्या गेल्या.

‘चौलकर्म’ विधीच्या दिवशी पू. भार्गवराम यांना अधिक वेळ कडेवर घेऊनही त्रास न होता त्यांच्या स्पर्शाने वेदना नष्ट झाल्याचे जाणवणे

‘४.७.२०१९ या दिवशी सनातन आश्रम, रामनाथी (गोवा) येथे सनातन संस्थेचे पहिले बालक संत पू. भार्गवराम यांचा ‘चौलकर्म’ हा संस्कार विधी झाला.

सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे अन् त्यांच्या संदर्भात आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती !

सद्गुरु राजेंद्र शिंदे दिवाळीनिमित्त सनातनच्या रामनाथी आश्रमात आले होते. मी सुमारे एक वर्षानंतर सद्गुरु राजेंद्रदादांना भेटले. त्यांनी माझ्या प्रकृतीची चौकशी करून मला सध्या होत असलेल्या त्रासांविषयी विचारले.

बेळगाव येथील पुष्पांजली यांना पू. भार्गवराम प्रभु यांच्यासंदर्भात आलेली वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

‘११.११.२०१८ या दिवशी पू. भार्गवराम प्रभु यांच्या विषयीचे दैनिक सनातन प्रभातमध्ये आलेले लिखाण वाचण्याआधीच त्या पहाटे मला एक स्वप्न पडले. त्यात मला दिसले, ‘मी घराच्या दारात उभी आहे. माझ्या घरासमोर १००-२०० माणसांचा जमाव आहे. माझी वहिनी त्या जमावातून दारात आली.

रामनाथी आश्रमातील सौ. मीनल राजेंद्र  शिंदे यांना कवळे (गोवा) येथील श्री शांतादुर्गादेवीच्या मंदिरात आलेल्या अनुभूती

‘३०.११.२०१८ या दिवशी माझी कन्या कु. वैदेही राजेंद्र शिंदे हिचा तिथीनुसार वाढदिवस होता; म्हणून आम्ही दोघी कवळे येथील श्री शांतादुर्गादेवीच्या देवळात दर्शनासाठी गेलो होतो. तेव्हा देवीवर अभिषेक करण्यात येत होता.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७७ व्या जन्मोत्सव सोहळ्याचे प्रक्षेपण पहातांना सोहळ्याच्या ठिकाणी उपस्थित असलेले श्री. सदाशिव परांजपे आणि सौ. शैलजा परांजपे यांना पाहून ‘हे लवकरच संत होतील’, असा विचार मनात येणे अन् २ दिवसांनी ते संतपदी विराजमान झाल्याचे समजणे

‘११.५.२०१९ या दिवशी रामनाथी आश्रमात होत असलेल्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७७ व्या जन्मोत्सव सोहळ्याचे प्रक्षेपण मी पहात होते.

पू. (श्रीमती) हिरा मळयेआजींना आश्रम दाखवतांना जाणवलेली सूत्रे !

श्रीमती हिरा मळयेआजी यांना आश्रम दाखवतांना ‘आश्रम पूर्वीच पाहिला आहे’, असे त्यांना जाणवणे : ‘काही मासांपूर्वी श्रीमती हिरा मळयेआजी आश्रमात आल्या होत्या.

चि. श्रीरंग दळवी याच्या व्रतबंध (मुंज) संस्काराच्या वेळी त्याची आई सौ. रसिका दळवी यांना आलेल्या अनुभूती

‘माघ शुक्ल पक्ष पंचमी, म्हणजे वसंत पंचमी (१०.२.२०१९) या दिवशी रामनाथी आश्रमात चि. श्रीरंगचा व्रतबंध संस्कार झाला. या सोहळ्याच्या वेळी मंगलाष्टके म्हणणे चालू असतांना माझा भाव जागृत झाला. कार्यस्थळी मला परात्पर गुरु डॉक्टरांचे अस्तित्व जाणवत होते.

पू. भार्गवराम प्रभु यांचे सनातनच्या रामनाथी आश्रमात आगमन झाल्यावर सौ. नेहा प्रभु आणि त्यांचा सुपुत्र कु. मुकुल प्रभु (वय ८ वर्षे) यांना आलेल्या अनुभूती !

‘२.७.२०१९ या दिवशी बालसंत पू. भार्गवराम प्रभु यांचे सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात शुभागमन झाले. त्या वेळी मी भोजनकक्षाच्या बाहेर नुकतीच आले होते. त्यांचे दर्शन पुष्कळच आनंददायी आणि मनोहारी होते.


Multi Language |Offline reading | PDF