श्रीमती अंजली कुलकर्णी यांना देवतांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

‘५.५.२०१८ या दिवशी मला एक स्वप्न पडले, ‘कोल्हापूर येथील नूतनीकरणापूर्वीची जुनी वास्तू आहे. तेथे जुन्या पद्धतीच्या तुळशी वृंदावनामध्ये हिरवी तुळस डोलत आहे. नऊवारी साड्या नेसलेल्या पुष्कळ साधिका आल्या आहेत;

पू. भार्गवराम प्रभु यांच्या प्रत्येक कृतीतून कृष्णतत्त्व प्रक्षेपित होत असल्याची साधकाला आलेली प्रचीती !

१. साधकाच्या मनात आधी पू. भार्गवराम प्रभु यांच्या संदर्भात असलेला मानसिक स्तरावरील विचार पू. भार्गवराम रामनाथी आश्रमात आल्यावर आपोआप नष्ट होऊन त्यांच्याप्रती आध्यात्मिक स्तरावरील आदर निर्माण होणे………

सनातनच्या १०० व्या संत पू. (श्रीमती) सीताबाई जोशी भजने म्हणतांना आणि भजनांच्या तालावर तल्लीन होऊन नाचत असतांना साधकाने अनुभवलेली भावस्थिती !

‘संत तुकाराम महाराज तल्लीन होऊन भजने म्हणायचे आणि त्यावर नृत्य करायचे. त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट पाहतांना ‘ही भावस्थिती अनुभवावी’, असे मला वाटायचे. एकदा एका भावसत्संगात पू. सीताबाई जोशीआजी म्हणत असलेली भजने ऐकण्याची मला संधी लाभली.

ग्रह दोष निवारण विधीशी संबंधित सेवा करत असतांना पितळेच्या ताटल्या अनेकदा घासूनही स्वच्छ होण्यास वेळ लागणे

‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्यावरील शनीची बाधा दूर करण्यासाठी प्रत्येक शनिवारी ‘शनिग्रह दोष निवारण विधी’ करण्यात येतो. २६.१.२०१९ या दिवशी मी त्या विधीसाठी पितळ्याच्या २ ताटल्या घासत होतो.

गुरुमाऊलीने खडतर प्रसंगातून आणि घोर प्रारब्धातून तारून आमूलाग्र पालट केल्याविषयी साधकाने गुरुमाऊलीच्या चरणी अर्पण केलेली कृतज्ञतापुष्पे !

‘आषाढ कृष्ण पक्ष पंचमी (२२.७.२०१९) या दिवशी मी वयाच्या ७६ व्या वर्षात पदार्पण करत आहे. भगवान श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने आणि सत्यनारायणस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे ३१.५.२०१८ या दिवशी कृपाळू गुरुमाऊलीने मला जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त केले.

ठाणे येथील हिंदुत्वनिष्ठ पू. डॉ. शिवकुमार ओझा (वय ८५ वर्षे) हे संतपदी विराजमान झाल्याच्या कार्यक्रमाच्या वेळी रामनाथी आश्रमातील श्री. भूषण कुलकर्णी यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

‘८.७.२०१९ या दिवशी रामनाथी आश्रमात ठाणे येथील हिंदु धर्माचे अभ्यासक आणि हिंदुत्वनिष्ठ डॉ. शिवकुमार ओझा यांना ‘संत’ म्हणून घोषित करण्यात आले. त्या प्रसंगी श्रीकृष्णकृपेने मला डॉ. ओझा यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती येथे देत आहे.

गुरुपौर्णिमा स्मरणिकेविषयी केलेला सूक्ष्मातील प्रयोग आणि त्याविषयी साधकांना आलेल्या अनुभूती

‘संत भक्तराज महाराज यांचा तोंडवळा लालसर वाटला आणि ‘काळाला अनुसरून क्षात्रतेज (शक्ती) प्रक्षेपित होत आहे’, असे वाटले. तळहाताला गरम वाटले.’

सनातनचे विकलांग अवस्थेतील संत पू. सौरभ जोशी यांच्याविषयी सांगली येथील अधिवक्त्या प्रीती पाटील यांना आलेल्या अनुभूती

‘२५.५.२०१९ या दिवशी मी रामनाथी आश्रमात विकलांग अवस्थेतही संतपदी विराजमान झालेले सनातनचे संत पू. सौरभ जोशी (पू. दादा) यांना भेटायला गेले होते. त्या वेळी माझ्या समवेत श्री. सुनील घनवट, श्री. प्रशांत जुवेकर आणि श्री. विश्‍वनाथ कुलकर्णी हे साधक होते.

नामजपाच्या संदर्भात सौ. दीक्षा पेंडभाजे यांना आलेल्या अनुभूती

‘२३.८.२०१७ या दिवशी सकाळी मी सनातनची सात्त्विक श्री गणेशमूर्ती रंगवत होते. त्या वेळी माझ्याकडून ‘जिव्हेवरी बैस रे गोविंद । विठोबा लागो तुझा हा छंद ॥…’ हे भजन मनापासून म्हटले गेले. तेव्हा माझी भावजागृती झाली.


Multi Language |Offline reading | PDF