अनुभूती विकत घेता येत नाही, तर त्यासाठी पात्र व्हावे लागते !

परात्पर गुरु डॉक्टरांचे साधनेविषयक मार्गदर्शन !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘तत्त्वशून्य राजकीय पक्ष जनतेला खूश करून निवडून येण्यासाठी काहीही करतात, तर साधक केवळ ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी कठोर प्रयत्न करायला सिद्ध असतात !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘बरेच जण लाच घेऊन काम करतात, तसे बर्‍याच मतदारांचे झाले आहे. ते पैसे देणार्‍याला मत देतात. मतदारांना लाच देणारे निवडून येऊन राज्य करतात. त्यामुळे तथाकथित लोकशाहीत देशाची दशा केविलवाणी झाली आहे.

लोकांच्या प्रारब्धानुरूप समस्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना, म्हणजे त्यांना साधना न शिकवता केवळ वरवरची उपाययोजना काढणारे संत !

परात्पर गुरु डॉक्टरांचे साधनेविषयक मार्गदर्शन !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना स्वार्थासाठी त्यांच्या पक्षाचे सरकार हवे असते, तर साधकांना ‘सर्वांचे चांगले व्हावे’, यासाठी ईश्वरी (धर्म) राज्य हवे असते.’

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते कोणीही पैसे किंवा पद दिले, तर दुसर्‍या पक्षात जातात. याउलट भक्त देवाचा पक्ष सोडून, देवाच्या चरणांशी असलेली जागा सोडून दुसरीकडे कुठेही जात नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

विचार स्वातंत्र्य आणि राजकीय पक्षांची अनभिज्ञता !

‘विचारस्वातंत्र्य म्हणजे ‘दुसर्‍याला दुखवायचे’ किंवा ‘धर्माच्या विरुद्ध बोलायचे स्वातंत्र्य नाही’, हेही स्वातंत्र्यापासून गेली ७४ वर्षे भारतावर राज्य करणार्‍या एकाही राजकीय पक्षाच्या लक्षात आले नाही !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

निवडणुकीसाठी उभे रहाणार्‍या उमेदवारांनो, हे लक्षात घ्या !

‘राष्ट्रप्रेम आणि धर्मप्रेम नसलेल्या उमेदवाराकडून पैसे घेऊन त्याला मते देणार्‍या जनतेचे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येण्यापेक्षा ‘ईश्वराने भक्त म्हणून निवडणे अनंत पटींनी महत्त्वाचे आहे’, हे लक्षात घ्या ! ’

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘राष्ट्र आणि धर्म यांसाठी काहीतरी करता यावे; म्हणून कोणी निवडणुकीला उभा रहात नाही, तर स्वतःला मान आणि पैसे मिळावे, यासाठी बहुतेक जण उभे रहातात !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

साधना करण्याचे महत्व !

‘जे आध्यात्मिक क्षमता नसल्याने संतांचे ‘संतत्व’ ओळखू शकत नाहीत, त्यांनी संतांना ‘ते संत नाहीत’ असे म्हणणे, हे वैद्यकीय शिक्षण नसणार्‍याने एखाद्या वैद्यांना ‘ते वैद्य नाहीत’, असे म्हणण्यासारखे हास्यास्पद आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (८.१.२०२२)