परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘गुरूंचे ऐकायची शिष्याला सवय लागली की, मगच शिष्य देवाचे सांगणे ऐकतो. असे असल्यामुळे अशा शिष्यालाच देव दर्शन देतो; म्हणूनच तो बुद्धीप्रामाण्यवाद्यांना दर्शन देत नाही !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘नोकरी करायची असेल, तर कुणाची तरी करण्यापेक्षा देवाची करा. देव नोकरीबद्दल थोडेसे काहीतरी देण्यापेक्षा सर्वकाही देईल !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले  

आपत्काळात वाचण्यासाठी साधना करा !

भक्ताला, साधना करणार्‍यालाच देव वाचवतो. हे लक्षात घेऊन आतापासून तीव्र साधना करा, तरच देव  आपत्काळात वाचवील.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले            

‘आदर्श समाज’ दाखवा !

‘अधोगतीला गेलेल्या समाजाचे प्रतिबिंब कथा, नाटके, कादंबर्‍या, चित्रपट, दूरदर्शनवरील मालिका इत्यादींत न दाखवता त्यांत समाजाला दिशा देणारा आदर्श समाज दाखवणे सर्वांकडून अपेक्षित आहे.’ –  (परात्पर गुरु) डॉ. आठवले

हिंदूंची विनाशाकडे वाटचाल !

‘कुठे अर्थ आणि काम यांवर आधारित पाश्चात्त्य संस्कृती, तर कुठे धर्म अन् मोक्ष यांवर आधारित हिंदु संस्कृती ! हिंदू पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करत असल्यामुळे त्यांचीही झपाट्याने विनाशाकडे वाटचाल होत आहे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

भारताच्या तथाकथित ‘सुधारणावादा’मुळे आध्यात्मिक क्षेत्रात होणारी हानी !

स्वातंत्र्योत्तर काळात समाजधुरिणांनी समाजाला ‘अध्यात्म आणि साधना’ हे विषय शिकवलेच नाहीत. तथाकथित ‘सुधारणावादा’च्या नावाखाली त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले. लोकशाहीत कायदे सिद्ध करतांनाही याचा विचार केला गेला नाही.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘मायेतील शिक्षण तन-मन-धनाचा वापर करून पैसे मिळवायला शिकवते, तर साधना तन-मन-धनाचा त्याग करून ईश्वरप्राप्ती करायला शिकवते !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘इतर नियतकालिकांत मुलांची वाढदिवसाची छायाचित्रे विज्ञापनाचे पैसे देऊन छापण्यात येतात, तर सनातन प्रभातमध्ये गुणवंत मुलांच्या छायाचित्रांसह त्यांची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्येही छापण्यात येतात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले  

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘ईश्वरप्राप्तीसाठी तन-मन-धनाचा त्याग करायचा असतो. त्यामुळे आयुष्य धन मिळवण्यात फुकट घालवण्यापेक्षा सेवा करून धनाबरोबर तन आणि मन यांचाही त्याग केला, तर ईश्वरप्राप्ती लवकर होते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले  

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘इतर पंथियांचे ध्येय असते ‘दुसर्‍या धर्मियांवर अधिकार गाजवणे’, तर हिंदूंचे ध्येय असते ईश्वरप्राप्ती !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले