परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

भारतातील हिंदूंमध्ये हिंदु धर्म सोडला, तर भाषा, सण, उत्सव, कपडे  इत्यादी  विविध राज्यांमध्ये निरनिराळे आहेत. त्यामुळे हिंदूंना केवळ धर्मच एकत्र आणू शकतो.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे बोधप्रद मार्गदर्शन

‘बहुतेक आजारांतून माणूस बरा होतो; पण ‘म्हातारपण’ या आजारातून कुणीही बरे होत नाही !’

हिंदूंच्या दुःस्थितिमागील कारण !

‘मशिदी आणि चर्च यांमध्ये त्या धर्मानुसार साधना शिकवतात अन् करून घेतात. हिंदूंच्या एकाही देवळात असे करत नसल्यामुळे हिंदूंची स्थिती केविलवाणी झाली आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘कुठे पृथ्वीवर राज्य करण्याचे ध्येय असणारे इतर पंथ, तर कुठे ‘प्रत्येकाला ईश्वरप्राप्ती व्हावी’, हे ध्येय असणारा हिंदु धर्म !’

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘कुठे पुढील काही वर्षांत काय होणार, याचा अंदाज बुद्धीचा वापर करून सांगणारे पाश्चात्त्य, तर कुठे युगायुगांच्या संदर्भात सांगणारे ज्योतिषशास्त्र !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले  

हिंदु धर्माची अद्वितीय शिकवण !

‘देव सर्वत्र आहे, प्रत्येकात आहे’, ही हिंदु धर्माची शिकवण असल्यामुळे हिंदूंना इतर पंथियांचा द्वेष करायला शिकवले जात नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले  

भक्तीयोगाचे महत्त्व

‘कर्मयोग, ज्ञानयोग, हठयोग इत्यादी योगांत देवाचा विचार नसल्याने देवाकडे काही मागता येत नाही; पण भक्तीयोगातील साधक देवाकडे मागू शकतो. असे असले, तरी इतर योगांतील साधकांची देवाने सोय केली आहे. गुरु असल्यास ते गुरूंकडे सर्वकाही मागू शकतात.’

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘सत्ययुगात नियतकालिक, दूरचित्रवाहिन्या, संकेतस्थळे इत्यादींची आवश्यकताच नव्हती; कारण वाईट बातम्या नसायच्या आणि सर्वजण भगवंताच्या अनुसंधानात असल्याने आनंदी होते.’

राष्ट्र-धर्मासाठी आध्यात्मिक स्तरावरही कार्य करणे अत्यावश्यक !

‘शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक स्तरांवर राष्ट्र-धर्मासाठी कार्य करून काही साध्य होत नाही, हे गेल्या ७४ वर्षांत अनेकदा सिद्ध झाले आहे. ‘आता त्यांच्या जोडीला आध्यात्मिक स्तरावरही कार्य करणे अत्यावश्यक आहे’, हे सर्वांनी लक्षात घेणे आवश्यक आहे.’

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘माणुसकी शिकवणारी साधना सोडून इतर सर्व विषय शिकवणाऱ्या आधुनिक शिक्षण प्रणालीमुळे राष्ट्राची परमावधीची अधोगती झाली आहे.’- (परात्पर गुरु) डॉ. आठवले