विज्ञान आणि अध्यात्म यांतील फरक

विज्ञान पृथ्वीतत्त्वाशी संबंधित विषयांशी निगडित आहे, तर अध्यात्म ‘पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश’ ही पंचमहाभूते आणि निर्गुण तत्त्व यांच्याशी संबंधित आहे; म्हणूनच विज्ञान पृथ्वीबाहेरील इतर पृथ्वींचाही अभ्यास करते…

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘ज्यांनी सर्व धर्मांचा अभ्यासच काय; पण वाचनही केले नाही, तेच ‘सर्वधर्मसमभाव’ म्हणतात !’

मनुष्य अन्य प्राण्यांच्या तुलनेत अधिक कृतीशील असल्याने केवळ तोच साधना करू शकतो !

‘मनुष्य वगळता अन्य सर्व प्राणी उपलब्ध अन्न ग्रहण करतात. मनुष्याला मात्र स्वतःसाठी अन्न बनवावे लागत असल्यामुळे मनुष्य अन्य प्राण्यांच्या तुलनेत अधिक कृतीशील झाला. या कृतीशीलतेमुळेच केवळ मनुष्य साधना करू लागला आणि अन्य प्राणी आहे तसेच राहिले.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले

तरुण वयातच साधना करण्याचे महत्त्व !

‘म्हातारपण आल्यावर ‘म्हातारपण म्हणजे काय ?’, हे अनुभवता येते. ते अनुभवल्यावर ‘म्हातारपण देणारा पुनर्जन्म नको’, असे वाटायला लागते; पण तेव्हा साधना करून पुनर्जन्म टाळण्याची वेळ गेलेली असते. असे होऊ नये; म्हणून तरुण वयातच साधना करा.’

साम्यवाद्यांचे हास्यास्पद वर्तन !

‘साम्यवाद्यांना प्रारब्ध इत्यादी शब्दही ज्ञात नसल्याने ते ‘साम्यवाद’ हा शब्द वापरतात आणि हास्यास्पद ठरतात !’

ईश्‍वरप्राप्तीसाठी आयुष्य द्यायला नको का ?

‘नोकरीत थोडासा पगार मिळावा; म्हणून ७ – ८ घंटे नोकरी करावी लागते, तर सर्वज्ञ, सर्वव्यापी आणि सर्व सामर्थ्यवान ईश्वराच्या प्राप्तीसाठी आयुष्य द्यायला नको का ?’

भारताचे महत्त्व !

‘पाश्‍चात्त्य देश मायेत पुढे जायला शिकवतात, तर भारत ईश्‍वरप्राप्तीच्या मार्गाने कसे जायचे ते शिकवतो !’

चिरंतन आनंद प्राप्तीसाठी साधनेला पर्याय नाही !

‘देवावर आणि साधनेवर विश्वास नसला, तरी चिरंतन आनंद प्रत्येकालाच हवा असतो. तो केवळ साधनेने मिळतो. एकदा हे लक्षात आले की, साधनेला पर्याय नसल्याने मानव साधनेकडे वळतो.’

स्वभावदोष आणि अहं निर्मूलन यांचे महत्त्व !

‘ईश्वरात स्वभावदोष आणि अहं नसतो. त्याच्याशी एकरूप व्हायचे असेल, तर आपल्यातही ते नसणे आवश्यक आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले   

बुद्धीप्रामाण्यवाद्यांची पात्रता !

‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी बुद्धीपलीकडील ‘देव नसतो’, असे म्हणणे, हे बालवाडीतील मुलाने ‘वैद्य, अधिवक्ता इत्यादी नसतात’, असे म्हणण्यासारखे आहे !’