हिंदु राष्ट्र आणि अहंभाव निर्मूलन !

‘हिंदु राष्ट्रात अहंभाव जोपासणार्‍या व्यक्तीस्वातंत्र्यावर बंधन असेल आणि समाजस्वास्थ्य अन् राष्ट्ररक्षण जोपासणार्‍या आणि त्याद्वारे अहं नष्ट करून ईश्वरप्राप्ती करून देणार्‍या समष्टी साधनेला प्राधान्य असेल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

आई – वडिलांना अडगळीत टाकणारी हल्लीची पिढी !

‘कुठे आई-वडिलांनाही वृद्धाश्रमात अडगळीप्रमाणे टाकून देणारी पाश्चात्त्य वळणाची हल्लीची पिढी, तर कुठे ‘हे विश्वचि माझे घर’, असे शिकवणार्‍या हिंदु धर्मातील आतापर्यंतच्या पिढ्या !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

रज-तमाचे प्रदूषण हे सर्व प्रदूषणांचे मूळ !

‘ध्वनीप्रदूषण, जलप्रदूषण, वायूप्रदूषण इत्यादींसंदर्भात नेहमी बातम्या येतात; पण त्यांचे मूळ असलेल्या रज-तमाच्या प्रदूषणाकडे मात्र धर्मशिक्षणाच्या अभावी कुणाचेच लक्ष जात नाही !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदु धर्माचे अद्वितीयत्व !

‘अनंत कोटी ब्रह्मांडनायकाचे इतर पंथात असते, तसे एकेका पुस्तकात वर्णन करता येईल का ? म्हणूनच हिंदु धर्मात सहस्रो ग्रंथ आहेत. त्यांतून पूर्ण माहिती मिळते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

साधना न शिकवल्याचा परिणाम !

‘माणुसकी शिकवणारी साधना सोडून इतर सर्व विषय शिकवणार्‍या आधुनिक शिक्षण प्रणालीमुळे मानवाची परमावधीची अधोगती झाली आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘साधनेसाठी तन, मन आणि धन अर्पण करा’, असे शिकवणारी एकमेव सनातन संस्था !

. . . केवळ ‘सनातन संस्थे’मध्ये प्रारंभीच्या सत्संगापासूनच त्यागाचे बीज रोवले जाते. याच कारणास्तव अन्य संप्रदायांच्या तुलनेत सनातनच्या साधकांची जलद गतीने आध्यात्मिक उन्नती होत आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, संस्थापक, सनातन संस्था

‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे हे आहे वेगळेपण !

‘बहुतेक वर्तमानपत्रे केवळ बातम्या देण्यापेक्षा अधिक काय करतात ? याउलट ‘सनातन प्रभात’ राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य करण्यासाठी प्रोत्साहन देते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

आध्यात्मिक लिखाणाचे महत्त्व !

‘राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांचे विषय मायेतील असल्यामुळे त्यांचे लिखाण अधिक काळ टिकत नाही. याउलट आध्यात्मिक क्षेत्रातील लिखाण बराच काळ किंवा युगानुयुगेही टिकते, उदा. वेद, उपनिषदे, पुराणे इत्यादी.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

घोर अज्ञानी !

‘जे हिंदु धर्मावर टीका करतात, त्यांच्यासारखे अज्ञानी या जगात कुणी नाही !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

देव आणि मानव !

‘देव जमीन, पाणी, हवा इत्यादी सर्व फुकट देतो. मानव मात्र प्रत्येक गोष्ट विकत देतो !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले