बुद्धीप्रामाण्यवादी म्हणजे मूर्खपणाची कमाल करणारे धर्मद्रोही !

‘देव बुद्धीच्या पलीकडे असतांना बुद्धिप्रामाण्यवाद्यांनी ‘देव नाही’, असे म्हणणे ही मूर्खपणाची कमाल आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले 

निरर्थक ‘साम्यवाद’ शब्द !

‘सजिवांतील एकही जीव दुसर्‍या जिवासारखा नसतांना, उदा. २ झाडे, २ कुत्रे, तसेच पृथ्वीवरील ७५० कोटी मानवांपैकी कोणतेही २ सारखे दिसत नाहीत. एवढेच नाही, तर त्यांची वैशिष्ट्येही निरनिराळी असतात, तरीही ‘साम्यवाद’ शब्द वापरणार्‍यांची ‘बुद्धी किती क्षुद्र आहे’, हे लक्षात येते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

प्रवचनकार आणि कीर्तनकार यांचे महत्त्व !

‘प्रवचनकार आणि कीर्तनकार समाजाला धर्माची थोडीफार माहिती करून देतात. त्यांच्याशिवाय असे करणारे समाजात कुणी नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदु राष्ट्राची स्थापना होण्यासाठी आपण भक्त बनणे आवश्यक !

‘श्रीराम स्वतः ईश्वराचा अवतार होता. पांडवांच्या वेळी पूर्णावतार श्रीकृष्ण होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळी समर्थ रामदासस्वामी होते. यावरून लक्षात येईल की, ईश्वरी राज्याची स्थापना ईश्वर स्वतः करतो किंवा संतांकडून करवून घेतो. ‘आता हिंदु राष्ट्राची स्थापना ईश्वराने करावी किंवा संतांकडून करवून घ्यावी’, यासाठी आपण त्याचे भक्त बनणे आवश्यक आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची अत्यावश्यकता !

‘भ्रष्टाचार बंद करील, असा एकही राजकीय पक्ष भारतात नाही; म्हणून हिंदु राष्ट्राची स्थापना करा !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले 

सूक्ष्म जग अनुभवण्याची क्षमता नसलेले बुद्धीप्रामाण्यावादी !

‘आंधळा म्हणतो, ‘दृश्य जग असे काही नाही.’ त्याचप्रमाणे बुद्धीप्रमाण्यवादी म्हणतात, ‘सूक्ष्म जग’, भूते इत्यादी काही नाही’; कारण त्यांना सूक्ष्मातील विषय समजून घेण्याची जिज्ञासा नसते आणि त्यांच्यात सूक्ष्म जग अनुभवण्यासाठी जी साधना करावी लागते, ती करण्याची क्षमता नसते !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

भारतात गुन्ह्यांची नोंद अल्प प्रमाणात होण्याचे कारण

‘बहुतेक जण पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवायला जात नाहीत; कारण त्यांना ठाऊक असते की, तेथे वेळ फुकट जाऊन कधीकधी पोलिसांच्या उद्धटपणामुळे अपमान सहन करावा लागेल आणि शेवटी फलनिष्पत्ती काहीच मिळणार नाही !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

म्हणे सर्वधर्मसमभाव !

सर्व जगाची स्थिती अन् व्यवस्था उत्तम रहाणे, प्रत्येक प्राणीमात्राची ऐहिक उन्नती म्हणजे अभ्युदय होणे आणि पारलौकिक उन्नतीही होणे, म्हणजे मोक्ष मिळणे, या तीन गोष्टी साध्य करणार्‍यास ‘धर्म’ असे म्हणतात. असा अर्थ एका तरी धर्मात सांगितलेला आहे का ? तरी अतीशहाणे ‘सर्वधर्मसमभाव’ असे म्हणतात !’- सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सरकारला भ्रष्टाचार रोखता न येण्याचे एकमेव कारण म्हणजे इच्छेचा अभाव !

‘भ्रष्टाचार नाही’, असे एकही क्षेत्र नाही. सदनिका घ्यायची असली, तरी रोख (काळा पैसा) आणि धनादेश यांद्वारे रक्कम द्यावी लागते. सदनिका विकणार्‍या ५-१० जणांचा भ्रष्टाचार उघड झाला आणि त्यांना तात्काळ कठोर शिक्षा झाली की, सर्वच सदनिका-विक्रेते काळ्या पैशांतील व्यवहार तात्काळ थांबवतील ! – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

पोलिसांनी हे लक्षात घ्यावे !

‘पोलिसांना ‘जनता आपली मुले आहेत’, असे वाटले पाहिजे, तरच त्यांच्याकडून नोकरी योग्य तर्‍हेने होईल !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले