श्रद्धाहीन आणि बुद्धीवादी समाजाला विज्ञानाच्या आधारेच अध्यात्म पटवून द्यावे लागते !

‘पूर्वीच्या काळी ‘शब्दप्रमाण’ असल्यामुळे सर्वांची ऋषी-मुनी आणि गुरु यांनी सांगितलेल्या ज्ञानावर श्रद्धा असायची. आता त्यांच्यावर श्रद्धा न ठेवता विज्ञानावर ठेवत असल्यामुळे ‘सनातन संस्था’ आणि ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय’ यांना वैज्ञानिक उपकरणांच्या आधारे सहस्रो प्रयोग करून अध्यात्म सिद्ध करावे लागत आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

विज्ञानाच्या तुलनेत अध्यात्माचे अद्वितीयत्व लक्षात घ्या !

‘विज्ञानासारखे बुद्धीगम्य शिक्षण ‘जीवन सुखाने कसे जगायचे’, हे शिकवण्याचा प्रयत्न करते, तर अध्यात्म ‘जीवन आनंदाने कसे जगायचे आणि जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून कसे सुटायचे’, हे शिकवते.’- सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

कुरुक्षेत्रावरील अर्जुनाप्रमाणे स्थिती झालेले बहुसंख्य हिंदू !

. . . ‘हे अर्जुना, तू ज्यांचा शोक करू नये, अशा माणसांसाठी शोक करतोस आणि विद्वानांसारखा युक्तीवाद करतोस.’ अर्जुनाप्रमाणे हल्ली बहुतेक हिंदूंची स्थिती झाली आहे. काही कृती करण्याऐवजी ते मोठमोठे युक्तीवाद करतात आणि त्याला मोठेपणा समजतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

घरच्याला किंमत नसते, ही म्हण सार्थ करणारे भारतातील हिंदू !

‘जगभरचे जिज्ञासू चिरंतन आनंदप्राप्तीसाठी अध्यात्म शिकायला जगातील इतर कोणत्याही देशात न जाता भारतात येतात, तर भारतीय केवळ सुखप्राप्तीसाठी अमेरिका, इंग्लंड इत्यादी देशांत जातात !’- सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदूंनो, राष्ट्र आणि धर्म कार्य करतांना संतांना विचारूनच कार्य करा !

‘आपण वैयक्तिक जीवनात विविध प्रसंगांत योग्य निर्णय कोणता हे कुटुंबीय, नातेवाईक, मित्र, वैद्य, अधिवक्ता, लेखा परीक्षक इत्यादींना विचारून घेतो. तसेच राष्ट्र आणि धर्म यांच्या संदर्भातील निर्णय राष्ट्र आणि धर्म प्रेमी संतांनाच विचारून घेतले पाहिजेत.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदु राष्ट्र आणि अहंभाव निर्मूलन !

‘हिंदु राष्ट्रात अहंभाव जोपासणार्‍या व्यक्तीस्वातंत्र्यावर बंधन असेल आणि समाजस्वास्थ्य अन् राष्ट्ररक्षण जोपासणार्‍या आणि त्याद्वारे अहं नष्ट करून ईश्वरप्राप्ती करून देणार्‍या समष्टी साधनेला प्राधान्य असेल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

आई – वडिलांना अडगळीत टाकणारी हल्लीची पिढी !

‘कुठे आई-वडिलांनाही वृद्धाश्रमात अडगळीप्रमाणे टाकून देणारी पाश्चात्त्य वळणाची हल्लीची पिढी, तर कुठे ‘हे विश्वचि माझे घर’, असे शिकवणार्‍या हिंदु धर्मातील आतापर्यंतच्या पिढ्या !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

रज-तमाचे प्रदूषण हे सर्व प्रदूषणांचे मूळ !

‘ध्वनीप्रदूषण, जलप्रदूषण, वायूप्रदूषण इत्यादींसंदर्भात नेहमी बातम्या येतात; पण त्यांचे मूळ असलेल्या रज-तमाच्या प्रदूषणाकडे मात्र धर्मशिक्षणाच्या अभावी कुणाचेच लक्ष जात नाही !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदु धर्माचे अद्वितीयत्व !

‘अनंत कोटी ब्रह्मांडनायकाचे इतर पंथात असते, तसे एकेका पुस्तकात वर्णन करता येईल का ? म्हणूनच हिंदु धर्मात सहस्रो ग्रंथ आहेत. त्यांतून पूर्ण माहिती मिळते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

साधना न शिकवल्याचा परिणाम !

‘माणुसकी शिकवणारी साधना सोडून इतर सर्व विषय शिकवणार्‍या आधुनिक शिक्षण प्रणालीमुळे मानवाची परमावधीची अधोगती झाली आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले