यज्ञाचे महत्त्व !

‘शरिरात जंतू असले, तर ते शरिरात घेतलेल्या औषधामुळे मरतात. त्याचप्रमाणे वातावरणातील नकारात्मक रज-तम हे यज्ञातील स्थूल आणि सूक्ष्म धुरामुळे नष्ट होतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

विज्ञान हे कधी समजून घेणार ? 

‘गणित आणि भूगोल हे निराळे विषय आहेत. एकाच्या भाषेत दुसरा विषय सांगता येत नाही. त्याचप्रमाणे ‘विज्ञान आणि अध्यात्म हे निराळे विषय आहेत’, हे विज्ञानाने समजून घेणे आवश्यक आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

अध्यात्माची ओळख करून देणारे ‘सनातन प्रभात’ !

‘सनातन प्रभात’मधील ३० टक्के लिखाण साधनेच्या संदर्भातील असल्यामुळे वाचकांना अध्यात्माची ओळख होते आणि काही जण साधना करण्यास आरंभ करून जीवनाचे सार्थक करतात. याउलट बहुतेक नियतकालिकांत १ टक्का लिखाणही साधनेच्या संदर्भात नसल्याने वाचकांना त्यांचा खर्‍या अर्थाने लाभ होत नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

विज्ञानाची मर्यादा !

‘विज्ञानाने अध्यात्मातील सिद्धांतांविषयी काही सांगणे, म्हणजे बालकाने मोठ्यांविषयी काही सांगणे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदूंनो, ‘हिंदु राष्ट्र’ स्थापनेसाठी उपास्यदेवतेचा किंवा ‘श्रीराम जय राम जय जय राम’ हा नामजप प्रतिदिन अधिकाधिक करा !

‘हिंदूंनो, अनेक पिढ्यांच्या संघर्षानंतर श्रीरामाच्या कृपेमुळे आपल्या पिढीला श्रीराम त्याच्या जन्मभूमीत विराजमान झालेला बघायला मिळत आहे. इतक्यावर आनंद मानणे योग्य रहाणार नाही. ‘हिंदु राष्ट्र’ हेच हिंदूंच्या सर्व समस्यांवरील उपाय आहे. यासाठी आध्यात्मिक स्तरावरही प्रयत्न होणे आवश्यक आहेत – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

विज्ञानाची निरर्थकता !

मानवाला माणुसकी न शिकवणार्‍या, उलट विध्वंसक अस्त्रे, शस्त्रे देणार्‍या विज्ञानाचे मूल्य शून्य आहे ! – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

अध्यात्मातील संशोधनाचे महत्त्व !

‘विज्ञानाला बहुतेक काहीच ज्ञात नसल्याने एखादा सिद्धांत सिद्ध करण्यासाठी सारखे संशोधन करावे लागते. याउलट अध्यात्मात सर्वच ज्ञात असल्याने तसे करावे लागत नाही. अध्यात्मातील संशोधन हे विज्ञानयुगातील सध्याच्या पिढीचा अध्यात्मावर विश्‍वास बसून ती अध्यात्माकडे वळण्यासाठी करावे लागते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

क्षात्रतेजापेक्षा साधनेचे ब्राह्मतेज महत्त्वाचे !

‘एखाद्या सात्त्विक राजाचे चरित्र वाचून थोडा वेळ उत्साह वाटतो; पण ऋषिमुनींचे चरित्र आणि शिकवण वाचून अधिक काळ उत्साह वाटतो अन् साधनेला दिशा मिळते !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

आता रामराज्यासाठी प्रयत्न करूया !

‘हिंदूंनो, अयोध्येत प्रभु श्रीरामाचे भव्य मंदिर बनले आहे. आता भारतात रामराज्य आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करूया !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदूंनो, हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी उपास्यदेवतेचा किंवा ‘श्रीराम जय राम जय जय राम’ हा नामजप प्रतिदिन अधिकाधिक करा !

हिंदु राष्ट्र हेच हिंदूंच्या सर्व समस्यांवरील उपाय आहे. यासाठी आध्यात्मिक स्तरावरही प्रयत्न होणे आवश्यक आहेत; म्हणून आजपासून स्वतःच्या साधनेच्या जोडीला प्रतिदिन शक्य तितका वेळ किंवा कमीतकमी २ घंटे आपल्या उपास्यदेवतेचा किंवा ‘श्रीराम जय राम जय जय राम’ हा नामजप करावा. – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले