परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘माणुसकी शिकवणारी साधना सोडून इतर सर्व विषय शिकवणार्‍या आधुनिक शिक्षण प्रणालीमुळे राष्ट्राची परमावधीची अधोगती झाली आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘कुठे यंत्रांद्वारे संशोधन करून पालटते निष्कर्ष सांगणारे वैज्ञानिक, तर कुठे लाखो वर्षांपूर्वी यंत्रांविना आणि संशोधनाविना अंतिम सत्य सांगणारे ऋषी !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले    

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘पाश्‍चात्त्य संस्कृती शरीर, मन आणि बुद्धी यांना सुख देण्यासाठी धडपडते, तर हिंदु संस्कृती ईश्‍वरप्राप्तीचा मार्ग दाखवते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘स्वार्थासाठी राजकीय पक्ष पालटणारे सहस्रो असतात; पण स्वार्थत्यागी सांप्रदायिकांच्या मनाला संप्रदाय पालटण्याचा विचार एकदाही शिवत नाही !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले  

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘स्वातंत्र्यापासून आतापर्यंत भारतात राज्य करणार्‍या एकाही राजकीय पक्षाने जनतेला साधना शिकवून सात्त्विक न केल्याने भारतात प्रतिदिन अनेक तर्‍हेचे सहस्रो गुन्हे होत आहेत !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांना जिज्ञासा नसल्याने ते स्वतःला आहे तेवढ्या छोट्याशा ज्ञानात (अज्ञानात) रहातात. त्यांना पुढचे पुढचे काहीच कळत नाही.’- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘सहस्रो वर्षांपूर्वी ऋषीमुनींना सृष्टीची उत्पत्ती, विश्‍वाची रचना, सप्तलोक, सप्तपाताळ, मंत्रशास्त्र, ज्योतिषशास्त्र इत्यादींच्या संदर्भात कळले, ते आधुनिक वैज्ञानिकांना अजूनही कणभरही कळत नाही !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले   

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘शारीरिक आणि मानसिक बळांपेक्षा आध्यात्मिक बळ श्रेष्ठ असूनही हिंदू साधना विसरल्यामुळे चिमूटभर धर्मांध आणि इंग्रज यांनी काही वर्षांतच संपूर्ण भारतावर राज्य केले ! आता तसे पुन्हा होऊ नये; म्हणून हिंदूंनी साधना करणे अतिशय आवश्यक आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

प्रत्येक पिढीचे कर्तव्य !

‘प्रत्येक पिढी पुढील पिढीकडे समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या संदर्भात अपेक्षेने पाहते. याऐवजी प्रत्येक पिढीने ‘आम्हाला काय करता येईल ?’, असा विचार करून असे कार्य केले पाहिजे की, पुढच्या पिढीला त्यांसंदर्भात काही करण्याची आवश्यकता न उरल्याने ती सर्व वेळ साधनेला देऊ शकेल !’  – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘हिंदु धर्मात सांगितले आहे तितके सखोल ज्ञान इतर एकातरी पंथात आहे का ? विज्ञानाला तरी ज्ञात आहे का ?’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले