परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘पाश्‍चात्त्य देश मायेत पुढे जायला शिकवतात, तर भारत ईश्‍वरप्राप्तीच्या मार्गाने कसे जायचे ते शिकवतो !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

चिरंतन आनंद प्राप्तीसाठी साधनेला पर्याय नाही !

‘देवावर आणि साधनेवर विश्‍वास नसला, तरी चिरंतन आनंद प्रत्येकालाच हवा असतो. तो केवळ साधनेने मिळतो. एकदा हे लक्षात आले की, साधनेला पर्याय नसल्याने मानव साधनेकडे वळतो.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘ईश्‍वरात स्वभावदोष आणि अहं नसतो. त्याच्याशी एकरूप व्हायचे असेल, तर आपल्यातही ते नसणे आवश्यक आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी बुद्धीपलीकडील देव नसतो’, असे म्हणणे, हे बालवाडीतील मुलाने वैद्य, अधिवक्ता इत्यादी नसतात’, असे म्हणण्यासारखे आहे !’- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘आधीच्या युगांत प्रजा सात्त्विक असल्याने ऋषींना समष्टी प्रसारकार्य करावे लागायचे नाही. आता कलियुगात बहुतेकजण साधना करत नसल्याने संतांना समष्टी प्रसारकार्य करावे लागते !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

बुद्धीप्रामाण्यवाद्यांचा अध्यात्माविषयी हास्यास्पद अहंकार !

‘बुद्धीप्रामाण्यवादी वैद्यकीय, अभियांत्रिकी इत्यादी बौद्धिक स्तराच्या विषयांवर आधुनिक वैद्य (डॉक्टर), अभियंते इत्यादींशी वाद घालत नाहीत; मात्र बुद्धीच्या पलीकडील आणि स्वतःला शून्य ज्ञान असलेल्या अध्यात्मशास्त्राविषयी स्वतः सर्वज्ञ असल्याप्रमाणे संतांवर टीका करतात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली आपल्या मनाप्रमाणे वागणारे वैद्यकीय, न्यायालयीन इत्यादी एकाही क्षेत्रात आपल्या मनाप्रमाणे वागत नाहीत. केवळ आध्यात्मिक परंपरांसंदर्भात मनाप्रमाणे वागतात !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

पुरोगाम्यांचा बुद्धिप्रामाण्यवाद!

‘पुरोगामी (पुढे जाणारे) पुढे जातात; पण त्यांना आपण अधोगतीच्या दिशेने पुढे जात आहोत, हेच बुद्धीप्रामाण्यवादामुळे लक्षात येत नाही.’

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘हिंदु धर्मात धर्मप्रसारासह धर्माच्या खोलात, सूक्ष्मात जाण्याला अधिक महत्त्व आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘ईश्‍वरी राज्यातील जनता त्या त्या सणाला अनुरूप अशी साधना करील. सुटी मिळाली म्हणून मजा करायला जाणार नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले


Multi Language |Offline reading | PDF