‘कल्याण’ मटक्याच्या चिठ्ठीवर छत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्र छापून त्यांचा अवमान !

हिंदूंच्या देवता, संत, राष्ट्रपुरुष यांचा वेगवेगळ्या माध्यमातून अवमान करणार्‍यांवर त्वरित कठोर कारवाई करणारा कायदा केंद्र सरकारने देशात लागू करावा, अशी धर्मप्रेमींची मागणी आहे !

केंद्र सरकारच्या विरोधात अण्णा हजारे यांचे ३० जानेवारीपासून शेवटचे उपोषण

आजही शेतकर्‍यांना दूध, भाजीपाला, फळे रस्त्यावर फेकून द्यावी लागतात. हे सहन होत नाही आणि वाईट वाटते- अण्णा हजारे

चंद्रपूर येथील अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी मद्य तस्करी करणारी ६ वाहने स्वतः पकडली !

आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, या कारवाईची माहिती देण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकार्‍यांना दूरभाष केल्यावर त्या अधिकार्‍यांनी त्यांच्यासमवेत अवमानास्पद भाषेत संभाषण केले.

किल्ले सज्जनगड परिसरात मद्यपींचा धिंगाणा !

शहरातील प्रतिदिनच्या धकाधकीच्या जीवनाला कंटाळून निसर्गाच्या सानिध्यात मेजवानी करण्याच्या मानसिकतेमुळे किल्ले सज्जनगड परिसरात (पायरीमार्ग) मद्यपी राजरोसपणे धिंगाणा घालतांना दिसत आहेत.

नागपूर येथील गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव

गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान हे वैविध्यपूर्ण असून त्यामधील सफारीचे काम पूर्ण झाले आहे. ही सफारी २६ जानेवारी या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते जनतेसाठी खुली केली जाणार आहे.

(म्हणे) ‘ईश्‍वराची निर्मिती मासिक पाळीमुळे अशुद्ध ठरत नाही, याचे स्मरण चित्रपट करून देतात !’ – बंगाली अभिनेत्री ऋतांभरी चक्रवर्ती

व्यक्ती केवळ स्त्री किंवा पुरुष असल्याने श्रेष्ठ, कनिष्ठ किंवा सम पातळीवर येत नाही, तर स्वतःच्या कर्माने स्वतःचे स्थान निर्माण करते, हेही न कळणारे अशी वक्तव्ये करतात !

अमेरिकेतील सत्तापरिवर्तन आणि भारत !

अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून जो बायडेन शपथ घेत आहेत. यापुढे जागतिक महासत्तेची सर्व सूत्रे बायडेन यांच्या हाती असतील. त्याचबरोबर मूळ भारतीय वंशाच्या कमला हॅरीस या उपराष्ट्रपती पदावर आरूढ झाल्या आहेत, म्हणजे त्या जागतिक महासत्तेच्या क्रमांक दोनच्या सर्वाधिक शक्तीशाली नेत्या असतील.

रेडी गावात रोजगार निर्मितीच्या मागणीसाठी २६ जानेवारीपासून उपोषण करण्याची ग्रामस्थांची चेतावणी

प्रशासन ग्रामस्थांचे रोजगाराचे प्रश्‍न सोडवत नाही; म्हणून स्थानिकांना अशा मागण्या कराव्या लागतात !

कर्नाटकमधील भाजप सरकार गोरक्षकांवरील गुन्हे मागे घेणार !

कर्नाटकातील भाजप सरकारचा अभिनंदनीय निर्णय ! ‘असा निर्णय प्रत्येक भाजप शासित राज्यांत घेतला गेला पाहिजे’, असेच हिंदूंना वाटते !

महाराष्ट्र्राचे तत्कालीन राज्यपाल पी.सी. अलेक्झांडर यांनी हिंदु धर्माच्या तत्त्वाप्रमाणे जीवनपद्धती आचरण्यास सांगणे

‘हिंदु धर्माच्या तत्त्वाप्रमाणे जीवनपद्धती आचरली, तर चिरंतन स्थैर्य मिळेल’, असाच संदेश राज्यपाल महोदयांच्या भाषणातून व्यक्त झाला.