राज्यातील पर्यटनवृद्धीसाठी महाराष्ट्र विधानमंडळही जनतेसाठी खुले करणार !

सुरक्षेच्या दृष्टीने हे कितपत योग्य आहे ?

कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेच्या उद्दिष्टपूर्तीसाठी नाशिक येथे ५ घंट्यात ४१ शस्त्रक्रिया आटोपल्या; रुग्णांची हेळसांड !

स्वतःच्या उद्दिष्टपूर्तीसाठी अशा रुग्णांच्या जिवाशी खेळणार्‍या पाट्याटाकू अधिकार्‍यांवर कडक कारवाई केली, तर पुढे असा हलगर्जीपणा करण्यास कोणी धजावणार नाही !

सामान्य माणसाला दिलासा, तसेच सदस्य, अधिकारी-कर्मचारी यांना प्रेरणा ! – शरद पवार, खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस

जिल्हा परिषद प्रांगणामध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने प्रदान केलेल्या स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याचे अनावरण २२ जानेवारीला करण्यात आले.

उद्या मलाही वाटेल मुख्यमंत्री व्हावे ! – शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एका मुलाखतीत मलाही मुख्यमंत्री व्हावे, असे वाटत आहे, असे मत व्यक्त केले होते. त्यावर शरद पवार बोलत होते.

कंत्राटी बालरोग तज्ञासह २ परिचारिका बडतर्फ, तर जिल्हा शल्यचिकित्सकासह ४ जण निलंबित ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

उशिरा जागे होणारे प्रशासन ! रुग्णालयांतील प्रशासनाचा निष्काळजीपणा आणि शासनाचे रुग्णालयांकडे असणारे दुर्लक्ष यांमुळे अशा घटना घडतात !

कराड तालुक्यात दंड न भरलेल्यांच्या भूमी होणार सरकार जमा

अवैध वाळू, मुरुम, माती यांसह गौणखनीज उत्खनन प्रकरणी कराड तालुक्यातील दंड न भरणार्‍यांच्या भूमी सरकार जमा करण्याविषयी नोटीसा पाठवल्या, अशी माहिती कराडचे तहसीलदार यांनी दिली.

सातारा येथे प्रजासत्ताकदिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण !

२६ जानेवारी या दिवशी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल,अशी माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली आहे.

सातारा येथील ऐतिहासिक चार भिंत परिसरात मद्यपींचा वावर !

जे सर्वसामान्य शिवभक्तांना दिसते ते पोलिसांना का दिसत नाही ? अशी मागणी का करावी लागते ? पोलीस स्वतःहून लक्ष का देत नाहीत ?

पुण्यातील सीरम इन्स्टिट्युटमधील कोविड लस प्रकल्प पूर्णपणे सुरक्षित ! – उपमुख्यमंत्री अजित पवार

कोविड प्रतिबंधक लसनिर्मिती आणि लस साठ्यांचा आग लागलेल्या इमारतीशी कोणताही संबंध नाही. कोविड लस प्रकल्प पूर्णपणे सुरक्षित आहे.अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.

नांदेड जिल्ह्यातील नायगाव धरण गावातील इयत्ता चौथीतील विद्यार्थी प्रतीदिन मद्य पिऊन धिंगाणा घालतात !  

स्वातंत्र्यानंतर आतापर्यंतच्या शासनकर्त्यांनी जनतेला धर्मशिक्षण न दिल्याचा परिणाम ! लहान मुले आणि पुरुष यांनी मद्य पिऊन घरातील महिलांना त्रास देणे असे गंभीर चित्र गावात निर्माण होणे, हे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्या दृष्टीने लज्जास्पद !