गोवा विधानसभेत विकासप्रकल्प रहित करण्याचा ठराव २० विरुद्ध ११ मतांनी फेटाळण्यात आला

मोले ते वास्को राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण, कुळे ते वास्को रेल्वेच्या लोहमार्गाचे दुपदरीकरण आणि तम्नार ते गोवा उच्चदाबाची वीजवाहिनी या तिन्ही प्रकल्पांना विधानसभेत सत्ताधारी पक्षातील आमदार एलिना साल्ढाणा यांच्यासह विरोधी सदस्यांनी जोरदार विरोध करूनही सरकार या तिन्ही प्रकल्पांवर ठाम राहिले.

कुणाच्याही भावना दुखवायच्या नव्हत्या; म्हणून कांगारू असलेला केक कापला नाही ! – भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणे

अजिंक्य रहाणे यांची अभिनंदनीय कृती ! सध्या सर्वत्र विविध माध्यमांतून धार्मिक भावना दुखावण्यात येत असतांना किती क्रिकेटपटू, अभिनेते, राजकारणी आदी अन्यांच्या भावनांचा सन्मान करतात ?

अमेरिकेत कृष्णवर्णीयांच्या तुलनेत श्‍वेतवर्णीयांना कोरोनाविरोधी लसीचे अधिक डोस

अमेरिकेत लसीकरणात वर्णद्वेष होत असल्याचे म्हटले जात आहे.

आजपासून करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मीदेवीचा किरणोत्सव !

पहिल्या दिवशी सूर्याची किरणे थेट श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीच्या चरणांवर पडतात.

भारतातील सर्वच क्षेत्रांत बोकाळलेला भ्रष्टाचार !

‘वृत्तपत्र उघडले किंवा दूरचित्रवाहिन्यांवरील बातम्या ऐकल्या, तरी त्यामध्ये ‘भ्रष्टाचार’ या विषयावरील चर्चा सातत्याने बघायला मिळते. यात उच्चपदस्थ अधिकार्‍यांपासून सर्वसामान्य व्यक्ती, सरकारी नोकर यांनी केलेला भ्रष्टाचार आणि त्यांना झालेली अटक यांविषयीच्या बातम्या प्रकर्षाने दिसतात.

मर्यादित वेळेत सर्वसामान्यांना लोकल मुभा देणे म्हणजे शुद्ध धूळफेक ! – लोकल प्रवासी संघटनांचे मत

३ राजकीय पक्षांच्या जात्यात सामान्य प्रवासी भरडला जात असून सुस्पष्ट निर्णय घेतला जात नाही. गेले १० मास सर्वसामान्यांना प्रवास यातना सहन कराव्या लागत आहेत. मर्यादित वेळेत सर्वसामान्यांना लोकलमुभा देणे म्हणजे शुद्ध धूळफेक आहे, असे लोकल प्रवासी संघटनांनी म्हटले आहे.

महापालिका आयुक्तांच्या आदेशाने कुपवाड (सांगली) मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे हटवण्यास प्रारंभ

सूतगिरणी ते कुपवाड औद्योगिक वसाहतीच्या दोन्ही बाजूला अतिक्रमणे असल्याची तक्रार उद्योग मित्र बैठकीत करण्यात आली होती. या तक्रारीची नोंद घेत महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी या मार्गावरील अतिक्रमणे हटवण्याचे आदेश दिले होते.

पिंगुळी येथे आज प.पू. सद्गुरु समर्थ राऊळ महाराजांचा पुण्यतिथी सोहळा

पिंगुळी येथील प.पू. सद्गुरु समर्थ राऊळ महाराज यांचा ३६ वा पुण्यतिथी सोहळा ३१ जानेवारी २०२१ या दिवशी त्यांच्या येथील समाधी मंदिरात साजरा होणार आहे.

पुणे येथील ‘ऑनलाईन’ ‘सेक्स रॅकेट’ उघडकीस; हिंजवडी पोलिसांची कारवाई

‘ऑनलाईन’ माध्यमातून गिर्‍हाईकांचा शोध घेऊन त्याद्वारे वेश्या व्यवसाय चालवणारी टोळी हिंजवडी पोलिसांनी उघडकीस आणली आहे. या कारवाईमध्ये पोलिसांनी १३ तरुणींची सुटका केली आहे. या प्रकरणी अर्जुन प्रेम मल्ला या व्यक्तीला अटक केली आहे.

कुणा एका पक्षापेक्षा आम्ही समाज आणि देश यांना प्राधान्य देतो ! – ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी उपोषणाला बसण्याचा निर्णय घेणार्‍या अण्णा हजारे यांनी उपोषणापूर्वीच माघार घेतली. त्यामागची कारणेही त्यांनी स्पष्ट केली आहेत.