Bala Rane In Last Video : पोलिसांच्या आश्वासनानंतर कुडाळ (सिंधुदुर्ग) येथील बाळा राणे यांचे उपोषण स्थगित

‘दावत-ए-इस्लामी’ या पाकिस्तानधार्जिण्या संस्थेच्या हालचाली थांबवण्यासाठी, झोपलेल्या पोलिसांना जागे करण्यासाठी कुडाळ येथील बाळा राणे यांनी २१ नोव्हेंबर या दिवशी आपल्या निवासस्थानी ‘बाळाचे अंत्यदर्शन उपोषण’ चालू केले होते.

Boycott Loksabha Elections : शिरगाव (गोवा) – शाळेची नवीन इमारत बांधा, अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार घालू !

सरकारी प्राथमिक शाळेच्या इमारतीच्या प्रश्नावरून शिरगाव येथील पालक आक्रमक बनले आहेत. पालक-शिक्षक संघाला अशी भूमिका घ्यावी लागणे अपेक्षित नाही !

Goa Bogus Beneficiaries : दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेतील बनावट लाभार्थींना शोधून काढून त्यांना वगळणार

गरिबांसाठीच्या योजनांचा अपलाभ उठवणारे नागरिक पहाता समाजात अप्रामाणिकपणा किती आहे, ते लक्षात येते !

गोवंशियांना हत्येसाठी घेऊन जाणारा ट्रक अडवणारे बजरंग दलाचे वाघेश्वर अडके यांच्यावर गोतस्करांचे आक्रमण !

२० नोव्हेंबरला काही गोतस्कर एका ट्रकमधून ४० म्हशी कत्तलीसाठी घेऊन जात होते. हा ट्रक गोरक्षक वाघेश्वर अडके यांनी अडवला असता २ अज्ञात तस्करांनी अडके यांच्यावर चाकूने आक्रमण केले.

श्री कानिफनाथ देवस्थानवर (जिल्हा अहिल्यानगर) आक्रमण करणार्‍या धर्मांधावर कारवाई करा !

अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील गौह या गावातील श्री कानिफनाथ देवस्थान हे या गावाचे ग्रामदैवत असून मंदिराच्या बाजूला अवैधरित्या दर्गा निर्माण करून मंदिराची ३९ एकर जागा ‘वक्फ बोर्डाच्या घशात घालण्याचा कुटील डाव चालू आहे.

कार्तिकी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा !

कार्तिकी एकादशीच्या निमित्त येथील श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अन् त्यांच्या पत्नी सौ. अमृता फडणवीस यांच्या हस्ते झाली.

सौंदत्ती येथील रेणुकादेवीच्या यात्रेसाठी ‘गोकुळ दूध’च्या वतीने दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची व्यवस्था !

सौंदत्ती येथील रेणुकादेवीची यात्रा २४ ते २६ डिसेंबर या कालावधीत होत आहे. या कालावधीत कोल्हापूर येथून जाणार्‍या भाविकांना, विशेषकरून गाडी चालकांना उत्तम प्रतीचे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ यांची आवश्यकता असते.

हिंदूंना साधना शिकवणे अपरिहार्य !

‘जगातील सर्वश्रेष्ठ हिंदु धर्मात जन्म मिळूनही धर्मासाठी काहीच न करणारे हिंदू मरणाच्याच लायकीचे आहेत किंवा जगण्याच्या लायकीचे नाहीत’, असे काही जणांना वाटते; पण ते योग्य नाही. ‘त्यांना साधना शिकवणे’, हे हिंदूंचे कर्तव्य आहे.’- सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

संगमनेर न्यायालयाकडून इंदोरीकर महाराजांना जामीन संमत !

२४ नोव्हेंबरला इंदोरीकर महाराजांच्या जामीन अर्जावर सुनावणी होती; पण या दिवशी इतर जिल्ह्यात नियोजित कीर्तन असल्यामुळे महाराजांनी न्यायालयाला विनंती केली होती. ही विनंती मान्य करत न्यायालयाने एक दिवस अगोदर जामीन संमत केला.

एस्.टी. बसस्थानकांमध्ये दिव्यांगांसाठी १० टक्के स्टॉल्स राखीव ठेवावेत ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

‘स्वाधार योजने’च्या अंतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी योजना सिद्ध करावी, तसेच राज्यातील एस्.टी.च्या सर्व बसस्थानकांमध्ये दिव्यांगांसाठी १० टक्के स्टॉल्स राखीव ठेवावेत, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासकीय अधिकार्‍यांना दिले.