भारत पुन्हा ‘विश्‍वगुरु’ होण्यासाठी कशाची आवश्यकता ?

‘भारतात इतर काही आयात करण्यापेक्षा राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी नेते आयात करा. मग इतर काहीच आयात करावे लागणार नाही. भारत पुन्हा विश्‍वगुरु होईल आणि गतवैभव प्राप्त करील !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

आक्रमणकर्त्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी विहिंपचे ठाणे पोलीस आयुक्तांना निवेदन !

मुंब्रा येथील बजरंग दल ठाणे विभाग संयोजक श्री. सूरज तिवारी यांच्यावर १ जुलै या दिवशी दुपारी ३ वाजता कौसा भागात २ जणांनी सशस्त्र आक्रमण केले. त्यात तिवारी हे गंभीररित्या घायाळ झाले आहेत.

शेतीमालांवर ५ टक्के वस्तू आणि सेवा कर लावल्याने किंमती वाढणार !

केंद्र सरकारने पॅकिंग (बांधणी) केलेल्या आणि लेबल (नाव) लावलेल्या सर्व खाद्यपदार्थांवर, तसेच शेतीमालावर ५ टक्के जी.एस्.टी. (वस्तू आणि सेवा कर) लावण्याचा निर्णय घेतल्यामुळे महागाई वाढणार आहे. त्याचा परिणाम सामान्य ग्राहकांवर होणार आहे, असे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

नागपूर येथे आजपासून २ दिवसांचे चर्चासत्र चालू !

गोविज्ञान अनुसंधान केंद्राद्वारे ‘पंचगव्यद्वारे कर्करोगावर प्रभावी उपचार’ या विषयावर देवलापार येथील सेवाधाममध्ये ८ आणि ९ जुलै या दिवशी सकाळी ९ वाजता राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती केंद्राचे अध्यक्ष डॉ. हेमंत जांभेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कन्हैयालाल आणि उमेश कोल्हे यांच्या हत्या करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी !

कन्हैयालाल आणि उमेश कोल्हे यांच्या हत्या करणाऱ्यांना फाशी द्यावी, तसेच त्यांना साहाय्य करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी येथील हिंदुत्वनिष्ठांनी निवेदनाद्वारे ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

सांगली जिल्हाधिकाऱ्यांच्या स्थानांतरणास उपमुख्यमंत्र्यांकडून स्थगिती !

सांगलीच्या जिल्हाधिकारीपदी श्रीमती दीपा मुधोळ-मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली होती. या नियुक्तीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली आहे.

कोल्हापूर येथील पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी ३२.४ फुटांवर !

गेल्या २ दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा अल्प झाल्याने पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीची वाढ अल्प गतीने होत आहे. ७ जुलै या दिवशी दुपारी १ वाजता राजाराम बंधारा येथे पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी ३२ फूट ४ इंच इतकी नोंदवली गेली.

‘फ्लेमिंगो’च्या १२ पैकी १० लोखंडी प्रतिकृतींची चोरी !

खाडीच्या किनारी ‘फ्लेमिंगो’ (पक्षी) आढळतात. त्यांचे शहरातील वास्तव्य लक्षात येण्यासाठी महापालिकेने ‘फ्लेमिंगो’च्या १२ लोखंडी प्रतिकृती सिद्ध केल्या होत्या; पण त्यातील १० प्रतिकृती चोरीला गेल्या आहेत.

बकरी ईदसाठी अधिकृत पशूवधगृहाचा वापर करा !

शंभरकर यांनी सांगितले की, ‘मुंबई उच्च न्यायालयाने अधिकृत पशूवधगृहांव्यतिरिक्त पशूंची हत्या करू नये’, असे निर्देश दिले आहेत. अवैध पशूवधगृहांना अभय दिल्यामुळेच असे आवाहन करावे लागते !

ठाणे येथील ६६ नगरसेवक शिंदे गटात सहभागी

ठाणे महानगरपालिकेतील शिवसेनेच्या ६७ नगरसेवकांपैकी तब्बल ६६ नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले आहेत. यामध्ये शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख आणि माजी महापौर नरेश म्हस्के यांचाही समावेश आहे.