राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणांनी देशाच्या सुरक्षेशी संबंधित गुन्ह्यांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे ! – सरन्यायाधीश

देशातील प्रमुख अन्वेषण यंत्रणांनी केवळ राष्ट्रीय सुरक्षा आणि देशाविरुद्धचे गुन्हे यांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असा सल्ला भारताचे सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांनी दिला.

काँग्रेसधार्जिण्या लामतिनथांग हाऊकिप याने भाजपला विरोध करतांना केले सीतामाताचे संतापजनक विडंबन !

कधी हाऊकिप अथवा त्याच्यासारख्या अन्य हिंदुद्वेष्टे काँग्रेसी इस्लाम अथवा ख्रिस्ती समाजाच्या धार्मिक भावना दुखावत नाहीत. हिंदूंमधील अतीसहिष्णुवृत्तीचा अपलाभ उठवला जात असेल, तर हिंदूंनी काय करावे ?, असा प्रश्‍न आता हिंदूंना पडला आहे !

Anil Vij Slams Kejriwal : केजरीवाल यांनी आधीच रामायण आणि भगवद्गीता वाचली असती, तर त्यांच्यावर कारागृहात जाण्याची वेळ उद्भवली नसती ! – अनिल विज, भाजप

देहलीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी कारागृहात वाचण्यासाठी रामायण आणि भगवद्गीता या धर्मग्रंथांची मागणी केली आहे. यावर हरियाणाचे माजी गृह आणि आरोग्य मंत्री अनिल विज यांनी असे वक्तव्य केले आहे !

अमेरिकेतील मंदिरांची तोडफोड आणि हिंदूंवरील द्वेषपूर्ण गुन्हे यांची आकडेवारी द्या ! – भारतीय वंशाचे अमेरिकेतील खासदार

भारतात हिंदूंच्या मंदिरांवर आणि हिंदूंवरील द्वेषपूर्ण गुन्हे यांची माहिती देशातील किती लोकप्रतिनिधी सरकारकडे मागतात ? आणि संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करतात ?

भाजपमध्ये या अन्यथा ईडीच्या कारवाईतून कारागृहात पाठवू !

भारतीय लोकशाही आणि तिच्या अन्वेषण यंत्रणा केंद्रशासनाच्या हातचे बाहुले झाले आहे, अशी ओरड आप, काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्ष करत असतात.

Quran Burner Salwan Momika : स्विडनमध्ये वारंवार कुराण जाळणार्‍या सलवान मोमिका यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त

अद्याप अधिकृत दुजोरा नाही !

बिजापूर (छत्तीसगड) येथे ९ नक्षलवादी ठार

बिजापूर येथे सुरक्षादल आणि नक्षलवादी यांच्यात चालू असलेल्या चकमकीत आतापर्यंत ९ नक्षलवाद्यांना ठार मारण्यात आले आहे. त्याच वेळी मध्यप्रदेशातील बालाघाट येथील चकमकीत २ नक्षलवादी ठार झाले.  

भारताने आमच्याकडे अद्याप कच्चाथिवू परत मागितलेले नाही !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे श्रीलंकेशी चांगले संबंध आहेत. आतापर्यंत कच्चाथिवू बेट परत करण्यासंदर्भात भारताने कोणतीही अधिकृत भूमिका आमच्याकडे मांडलेली नाही.

(म्हणे) ‘लोकसभा निवडणुकीनंतर भारताशी संबंध सुधारू शकतात !’ – ख्वाजा आसिफ, संरक्षणमंत्री, पाकिस्तान

पाकिस्तानने असे दिवास्वप्न पहाण्यापेक्षा भारतात घडवून आणण्यात येत असलेल्या आतंकवादी कारवाया प्रथम थांबवाव्यात, आतंकवादी निर्मितीचे कारखाने बंद करावेत, पाकमधील हिंदूंवर होणार अत्याचार थांबवून त्यांना संरक्षण द्यावे आणि पाकव्याप्त काश्मीर भारताला परत द्यावे.

आता प्रत्येक मतदान केंद्रातील ‘व्हीव्हीपीएटी’मधील सर्वच पावत्यांची मोजणी होणार !

सर्वोच्च न्यायालयाने मतमोजणीच्या वेळी ‘व्होटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल’मधील (व्हीव्हीपीएटीमधील) सर्वच पावत्यांची मोजणी करावी, असे निर्देश निवडणूक आयोगाला दिले आहेत.