जीवन मंगल करण्यासाठी धर्मग्रंथांचे महत्त्व

जीवन म्हणजे पाण्यावर ओढलेली रेघ आहे. ‘ती तर मिटवायचीच !’, असे पक्के जाणूनच आपल्याला जीवन जगायचे आहे. एकदा हे मनात रूजले की, मान-अपमान, सुख-दु:ख यांपलीकडे जाऊन धैर्याने त्या भगवंताच्या वाटेने आपल्याला जायचे आहे, हे समजते.

जम्मू-काश्मीरमधील प्राचीन मार्तंड सूर्यमंदिराच्या जीर्णाेद्धाराला ६०० वर्षे लागणे, हे भारतातील हिंदूंना लज्जास्पद !

‘जम्मू-काश्मीरमधील प्राचीन मार्तंड सूर्यमंदिराचा ६०० वर्षांनंतर जीर्णोद्धार करण्यात येणार आहे. यासंदर्भात संस्कृती विभागाच्या प्रधान सचिवांनी १ एप्रिल २०२४ या दिवशी जम्मू येथील नागरी सचिवालयात उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे.

युवा-जीवनाचे दायित्व

‘युवावस्था उत्साह, आशा, दृढता आणि ध्येयाप्रती विशेष प्रयत्न घेऊन येते. तिच्यासमवेतच जीवनात विविध प्रकारची दायित्वेही येतात …

स्वतः शेकडो जणांच्या हत्या करणारी अमेरिका भारताला ‘कायद्याच्या योग्य प्रक्रिये’चा अवलंब करण्यास सांगते हे हास्यास्पद !

अमेरिकेची निर्मितीच मुळात कायद्याच्या उल्लंघनातून आणि रक्तपातातून झाली. प्रारंभीला अमेरिकेतील मूळ निवासी ‘रेड इंडियन्स’च्या कत्तली करण्यात आल्या, त्यांच्या भूमी बळकावण्यात आल्या.

अभ्यास करून मिळवलेल्या ज्ञानापेक्षा साधना केल्यावर ईश्वराकडून मिळणारे ज्ञान श्रेष्ठ !

साधना केल्यामुळे आपण विश्वमन आणि विश्वबुद्धी यांच्याशी जोडल्यामुळे कोणत्याही विषयाचा अभ्यास करावा लागत नाही, विचार करावा लागत नाही, विचारलेल्या प्रश्नाच्या संदर्भातील ज्ञान आतून उत्स्फूर्तपणे मिळते, त्यामध्ये विषयाची मर्यादाही नसते.’

‘पाखंडाचे खंडण’ करण्यासाठी धर्मग्रंथांचा अभ्यास हाच एक रामबाण उपाय !

पाखंडच धर्माचे सोंग घेऊन सजले आहेत. त्याहूनही आश्चर्य असे की, पाखंडाच्या त्या सोंगामध्ये सगळ्यांना आकर्षून घेण्याची अदभुत शक्ती आहे.

चांगल्या गोष्टींचा उगम न पहाता त्या घ्याव्यात !

ॐ विषादप्यमृतं ग्राह्यममेध्यादपि काञ्चनम् ।
नीचादप्युत्तमां विद्यां स्त्रीरत्नं दुष्कुलादपि ॥