नीतीशिक्षणाची अत्यंत आवश्यकता !

‘अपराध करणार्‍यांना उग्र शिक्षा देणे, हे एक दुष्ट वृत्तींना आळा घालण्याचे तात्कालिक साधन झाले. तरी ती प्रवृत्तीच घालवून टाकण्याकरता त्याच्या अंत:करणाचे परिवर्तन करणारे ‘नीतीशिक्षण’ त्यांना देणे आवश्यक आहे.’

नीती आणि धर्म – धार्मिक राज्य पद्धत !

‘कठोर न्यायपद्धती आणि अमानुष देहदंड यांपेक्षा नीती अन् धर्म यांच्या शिक्षणपद्धतीने हृदय परिवर्तन करणे, ही शाश्‍वत टिकणारी ‘धार्मिक राज्य पद्धत’ होय.’

कोरोना लसीकरणाच्या नावाखाली कुणीही आधारकार्ड क्रमांक, ओटीपी यांसारखी गोपनीय माहिती मागितल्यास स्वतःची फसवणूक टाळण्यासाठी त्याकडे दुर्लक्ष करा !

भ्रमणभाषवर आधारकार्ड क्रमांक, ओटीपी मागितला जात नसल्याचे शासन-प्रशासन, इत्यादींनी वेळोवेळी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आर्थिक फसवणूक होऊ देऊ नका !

श्रीरामकृष्ण बोधामृत

ईश्‍वर असून सर्व कर्तृत्व त्याचेच आहे, हे सत्य जाणून संपूर्ण शरणागती पत्करावी, हेच मनुष्यास योग्य आणि हितकारक आहे; म्हणून हेच आचरणात आणावे. हाच मनुष्यजन्माचा उद्देश आहे.

आज मानवाला जग उद्ध्वस्त करणारी भौतिक प्रगती हवी कि जगाला चिरशांती देणारी वैदिक जीवनपद्धती हवी ?

‘खरे सुख हवे असल्यास तू वैदिक सिद्धांताकडे बघ. तो तुला शाश्‍वत सुखाचा लाभ करून देऊन, तुझा जीवनकलह पार मावळून टाकून केवळ सुखाच्या साम्राज्यामध्ये नित्य तृप्तीने नांदवील.

धर्माचरणाचे महत्त्व !

‘लँड जिहाद, फतवा जिहाद, फिल्म जिहाद यांसारखे १४ प्रकारचे जिहाद केले जात आहेत. मोगलांनाही लाजवणारे महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी युवतींनी स्वरक्षण प्रशिक्षण घेऊन सिद्ध व्हावे.’

राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी माहितीचा अधिकार कायदा हे प्रभावी शस्त्र !

माहिती कायद्याचा आधार घेऊन आपण राष्ट्र आणि धर्म या कार्यासाठी त्याचा योग्य प्रकारे वापर करू शकतो. त्याआधारे सरकारवर लक्ष ठेवण्याचे काम करू शकतो.

ज्या क्रोधामुळे आत्मसंरक्षण आणि अन्य सज्जनांचे संरक्षण होते, तोच ‘खरा क्रोध’ !

‘ज्या क्रोधामुळे आत्मसंरक्षण, धर्मपालन, सज्जन पोषण, दुष्ट निर्दालनद्वारा सत्साधन आणि सदाचाराचा प्रभावकारी जय विश्‍वविज्ञात होतो, तोच ‘खरा क्रोध’ होय.

प्रशासनाचा कारभार

एखादा भ्रष्टाचार, दंगल, तसेच अन्य घटनांच्या अन्वेषणासाठी समितीची स्थापना करणे आणि वारंवार मुदत वाढवून वेळकाढूपणा करणे, ही प्रशासनाची कामाची पद्धतच झाली आहे.

भस्माची शिकवण

मनुष्याने आपली आहुती देऊन भस्म होणे, म्हणजे आपल्या इच्छा-आकांक्षा, दोष, अज्ञान अन् अहं यांचा त्याग करणे आणि मनाची शुद्धता प्राप्त करणे.