अकोला येथे महिला सरपंचाच्या लाचखोर पतीला अटक !

अकोट तालुक्यातील ग्राम जऊळखेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या बांधकामाचे देयक अदा करण्यासाठी ग्राम जऊळखेड येथील सरपंच महिलेचा पती आशिष निपाणे आणि ग्रामसेवक उत्तम तेलगोटे यांनी शासकीय कंत्राटदाराकडे ४६ सहस्र रुपयांची लाच मागितली.

सांगे येथील ७३ सरकारी भूखंड बळकावले

गेल्या ९ वर्षांत भूखंड बळकावले जात असल्याचा थांगपत्ता न लागणारे निद्रिस्त प्रशासन !

संसदीय स्थायी गटाने गोव्यातील समान नागरी कायद्याचे केले पुनरावलोकन !

गोव्यात लागू असलेला समान नागरी कायदा देशात लागू करण्याची मागणी जोर धरत आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ‘समान नागरी कायदा संपूर्ण देशात लागू झाला पाहिजे आणि यासाठी गोवा हे एक आदर्श राज्य आहे’, असे विधान यापूर्वी केले आहे.

संभाजीनगर येथे रात्री १० वाजल्यानंतर ध्वनीक्षेपकावरून भाषण केल्याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ३१ जुलैच्या रात्री १० वाजल्यानंतरही क्रांती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर ध्वनीक्षेपकावरून भाषण करून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात येथील क्रांती चौक पोलीस ठाण्यात सामाजिक कार्यकर्ते आनंद कस्तुरे यांनी तक्रार प्रविष्ट केली आहे

पत्राचाळ आर्थिक अपहाराप्रकरणी ईडीकडून मुंबईत २ ठिकाणी धाडी !

पत्राचाळ आर्थिक अपहाराच्या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने २ ऑगस्ट या दिवशी दादर आणि कांजूरमार्ग येथे धाडी टाकल्या. या प्रकरणी आणखी काही जणांची चौकशी चालू आहे. या प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत अटकेत आहेत.

राजभवनाकडे मोर्चा नेणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते ठाणे पोलिसांच्या कह्यात !

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एका कार्यक्रमात ‘राजस्थानी आणि गुजराती नसतील, तर मुंबईत पैसाच रहाणार नाही’, असे म्हटले होते. या विधानावरून राज्यात मोठा गदारोळ झाला.

बिबवेवाडीत (पुणे) ८ जुगार अड्ड्यांवर धाड !

बिबवेवाडी भागातील ८ जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी धाड टाकून ८४ सहस्र ९३० रुपये, ३२ भ्रमणभाष संच, २७ दुचाकी वाहने असा १९ लाख ५० सहस्र रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शहरात राजरोसपणे जुगार अड्डे चालू रहाणे, हे पोलीसयंत्रणेचे अपयश नव्हे का ?

राज्य सरकारकडून ‘स्वाईन फ्ल्यू’च्या १ लाख लसींची खरेदी

प्राधान्याने गर्भवती महिला, आरोग्य कर्मचारी अशा जोखमीच्या गटांसाठी ही लस जिल्ह्यांना पाठवण्यात येणार आहे, असे साथरोग सर्वेक्षण विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले.

दासबोध अभ्यास मंडळा’चे शाम साखरे यांच्या ८५ व्या वर्षपूर्तीनिमित्त ‘चालविसी हाती धरोनिया’, या जीवनगौरव अंकाचा प्रकाशन सोहळा पार पडला !

श्री. शाम साखरे सध्या नामजप आणि भक्ती करण्याकडेच अधिक भर देतात. कोणतीही सेवा निरपेक्षतेने केल्यास आपोआप त्याचे फळ मिळते, अशीच त्यांची श्रद्धा आहे. अभ्यासातून श्रद्धा वाढते.

मविआचे निर्णय रहित करण्याच्या भूमिकेला आव्हान

महाविकास आघाडी सरकारने घेतलेले निर्णय रहित करण्याच्या किंवा त्यांना स्थगिती देण्याच्या भूमिकेला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. माजी सनदी अधिकार्‍यांसह चार जणांनी या प्रकरणी याचिका प्रविष्ट केली आहे.