‘मंदिर-मशीद दर्शन’ उपक्रमाच्या नावाखाली हिंदु विद्यार्थ्यांना मशिदीमध्ये नेणार्‍या पोद्दार शाळेतील संबंधितांवर कठोर कारवाई करा !

आषाढी एकादशीच्या दिवशी ‘बकरी ईद’ असल्याने येथील प्राथमिक पोद्दार शाळेत बहुसंख्य हिंदु विद्यार्थी असूनही त्यांना ‘मंदिर-मशीद दर्शन’ या उपक्रमाच्या नावाखाली मंदिर आणि मशीद येथे नेण्यात आले.

शिवसैनिकांच्या जिवाशी येत असेल, तर खपवून घेतले जाणार नाही ! – उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख

शिवसैनिकांच्या जिवाशी येत असेल, तर ते खपवून घेतले जाणार नाही, अशी चेतावणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भायखळा येथे दिली आहे. भायखळा येथील शिवसेना पदाधिकारी बबन गावकर आणि विजय कामतेकर यांच्या गाडीवर काही जणांनी आक्रमण केले होते.

असंसदीय शब्दाविषयी नेमके आदेश पडताळून पाहू ! – शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

लोकसभा आणि राज्यसभा येथे होणार्‍या चर्चेत कोणत्याही शब्दांवर बंदी घालण्यात आलेली नाही, असे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे याविषयी नेमकी परिस्थिती आणि आदेश पाहून निर्णय घेऊ, असे प्रतिपादन शरद पवार यांनी केले.

राज्यात पावसाचे ९९ बळी !

मुसळधार पावसामुळे राज्यात आतापर्यंत ९९ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ८ सहस्र नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. पालघर, रायगड, नाशिक, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांत अजूनही हवामान विभागाने दिलेली ‘रेड अलर्ट’ची चेतावणी तशीच आहे.

लातूर येथे हिंदु युवतीचे धर्मांतर करून बलात्कार !

हिंदु मुलींशी जवळीक करण्यामागे धर्मांधांचा हेतू कधीच शुद्ध नसतो, हे अनेक उदाहरणांतून सिद्ध होत आहे. हिंदु युवतींनो, धर्मांधांशी जवळीक साधणे धोकादायक आहे, हे लक्षात घ्या आणि त्यांच्यापासून दूर रहा !

ठाणे जिल्ह्यात भावपूर्ण वातावरणात गुरुपौर्णिमा महोत्सव पार पडला !

जिल्ह्यात ठाणे येथे २ ठिकाणी, तसेच डोंबिवली आणि अंबरनाथ येथे प्रत्येकी एक असे सनातन संस्थेच्या वतीने गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याचा लाभ ५०० हून अधिक जिज्ञासू आणि साधक यांनी घेतला.

सांगली जिल्ह्यात ३ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ भावपूर्ण वातावरणात साजरा !

येथे सकाळी झालेल्या उत्सवात पू. राजाराम नरुटे यांची वंदनीय उपस्थिती होती, तर सायंकाळी झालेल्या कार्यक्रमात भाजपचे नगरसेवक लक्ष्मण नवलाई उपस्थित होते. येथे १८० जिज्ञासू उपस्थित होते.

उमेश कोल्हे आणि कन्हैयालाल यांच्या हत्येच्या निषेधार्थ आयोजित केलेल्या आंदोलनाला पोलिसांनी अनुमती नाकारली !

अमरावती येथे घडलेल्या उमेश कोल्हे आणि राजस्थान येथील कन्हैयालाल यांच्या झालेल्या हत्येचा निषेध करण्यासाठी ‘शक्ती फाऊंडेशन’च्या वतीने परतवाडा येथील जयस्तंभ चौकात राष्ट्रपती आणि प्रधानमंत्री यांच्या नावाने मोठ्या संख्येने ‘पोस्टकार्ड’ पाठवण्याविषयी आंदोलन करण्यात येणार होते

पाच वर्षांनंतरही दोषींविरुद्ध गुन्हे का नोंद केले नाहीत ?

उच्च न्यायालयाकडून गृह विभाग आणि पोलीस यांना नोटिसीद्वारे विचारणा

‘हर घर तिरंगा’ या उपक्रमात सहभागी व्हा ! – शेखर सिंह, जिल्हाधिकारी, सातारा

भारताला स्वातंत्र्य प्राप्त होऊन ७५ वर्षे पूर्ण होणार आहेत. या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती जागृत व्हाव्यात यासाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.