हिंदु धर्मरक्षणासाठी प्रयत्न केल्याने साधना होईल ! – सूरज गुप्ता

सनातन धर्म अनंत आणि अविनाशी आहे; मात्र पाश्चात्त्यांच्या परंपरांचे अंधानुकरण केल्याने सनातन धर्माची हानी होत आहे. सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी एकत्रित येऊन कार्य केल्यास हिंदु राष्ट्राची स्थापना लवकर होऊ शकते.

गडचिरोलीत पूर परिस्थितीमुळे २० जुलैपर्यंत शाळा आणि इतर आस्थापने बंद !

मुसळधार पावसामुळे पर्लकोटा नदीला पूर आल्याने भामरागड, हेमलकसा येथे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. दक्षिण गडचिरोलीत पुरामुळे २ सहस्र ३४५ लोकांना सुरक्षितस्थळी हलवले आहे

ज्येष्ठ नागरिकांना एस्.टी. प्रवासासाठी ओळखपत्राऐवजी आता ‘स्मार्ट कार्ड’ बंधनकारक

कोरोना संसर्गाची दुसरी लाट, तसेच महामंडळातील कर्मचार्‍यांचा संप यांमुळे ज्येष्ठ नागरिकांना ‘स्मार्ट कार्ड’ प्राप्त करून घेण्यासाठी ३० जूनपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली होती; मात्र ज्येष्ठ नागरिकांच्या मागणीनुसार ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ करण्यात आली आहे.

राज्यात कोकणासह मराठवाडा आणि विदर्भ येथे जोरदार पावसाची शक्यता !

मुसळधार पावसामुळे मराठवाड्यातील बहुतांश जिल्हे, तसेच गडचिरोली, गोंदिया यांसह कोकण आणि मुंबई येथे १८ जुलै या दिवशी सकाळपासून संततधार चालू आहे. कोकणासह विदर्भ आणि मराठवाडा येथील बहुतांश जिल्ह्यांत पुढील ३ दिवस जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

हिंदु राष्ट्रासाठी योगदान देणे, ही श्री गुरूंच्या समष्टी रूपाची सेवा ! – पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार, सनातन संस्था

वासंती मंगल कार्यालय येथे झालेल्या महोत्सवाला निवृत्त जिल्हा न्यायाधीश पू. सुधाकर चपळगावकर यांची वंदनीय उपस्थिती लाभली होती. या महोत्सवाचा ४०० हून अधिक जिज्ञासूंनी लाभ घेतला.

बारामती येथील कामांना दिलेली स्थगिती उठवावी !

मुख्यमंत्र्यांनी बारामती येथील कामांना दिलेली स्थगिती उठवावी, तसेच सूडबुद्धीने कोणताही निर्णय घेऊ नये, या मागणीसाठी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळासह १८ जुलै या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.

अभिनेत्री केतकी माटेगावकर हिच्या भावाची आत्महत्या !

केतकी माटेगावकरचा चुलत भाऊ अक्षय माटेगावकरने मानसिक तणावातून २१ व्या वर्षीच पुण्यात रहात्या घरी आत्महत्या केली आहे. अक्षयने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी सापडली आहे. ज्यात त्याने नोकरी मिळत नसल्याने टोकाचे पाऊल उचलल्याचे लिहिले आहे.

गोव्यात ‘ॲप’वर आधारित ‘टॅक्सी सेवे’ला विधानसभेत मान्यता !

काँग्रेसच्या आमदार डिलायला लोबो यांनी ‘टॅक्सी मीटर’ संबंधी उपस्थित केलेल्या मूळ प्रश्नावर विधानसभेत ही चर्चा झाली. यामुळे राज्यात ‘ॲप’वर आधारित ‘टॅक्सीसेवा’ चालू करण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.  

गतवर्षी मातृभाषेतील ८ सरकारी प्राथमिक शाळा बंद पडल्या !

राज्यात वर्ष २०२०-२१ या शैक्षणिक वर्षामध्ये मराठी माध्यमातील ७ आणि कोकणी माध्यमातील १ सरकारी प्राथमिक शाळा बंद पडली, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत एका लेखी प्रश्नावर उत्तरादाखल दिली.

अफगाणिस्तानातून नवी मुंबईत आणलेले ३६३ कोटी रुपयांचे हेरॉइन पोलिसांच्या कह्यात !

अफगाणिस्तान येथून दुबईमार्गे हा अमली पदार्थ आणण्यात आल्याची शक्यता आहे. याचे वजन ७२ किलो ५१८ ग्रॅम इतके आहे. तस्करांचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे.