राष्ट्रध्वज अवमानप्रकरणी नगराध्यक्षांसह मुख्याधिकार्‍यांवर गुन्हा !

राष्ट्रध्वज अवमानप्रकरणी येथील नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अशोक कुंभार आणि नगराध्यक्ष सुनंदा सोनटक्के यांच्यावर शिराळा पोलीस ठाण्यात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे.

न्यायालयाने अनुमती दिली, तरच बैलगाडी स्पर्धा घ्यावी ! – उच्च न्यायालय

बैलगाडी स्पर्धेमध्ये बैलांना इजा न होण्यासाठी शासन नियमावली सिद्ध करावी. ही नियमावली न्यायालयापुढे सादर करावी. यानंतर न्यायालयाने अनुमती दिली, तरच बैलगाडी स्पर्धा घ्याव्यात, अशी स्पष्ट सूचना उच्च न्यायालयाने राज्य शासनाला दिली आहे.

शिक्षणविवेक नियतकालिकांच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात धर्मशिक्षणाचा विसर !

शिक्षणविवेक नियतकालिकांचा ५ वा वर्धापनदिन मयूर कॉलनी येथील बालशिक्षण संस्थेच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता.

कायदा विभागाच्या अकार्यक्षमतेविषयी उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला खडसावले

महापालिकेच्या विरोधात न्यायालयात प्रविष्ट केल्या जाणार्‍या याचिकांवरील सुनावणीच्या वेळी पालिकेच्या कायदा विभागाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने उच्च न्यायालयाने महापालिकेची कानउघाडणी केली.

गिरगाव चौपाटी परिसराचे स्वराज्यभूमी नामकरण करा !

राज्य सरकारने गिरगाव चौपाटी परिसराचे स्वराज्यभूमी असे नामकरण करण्याचा निर्णय घेतला आहे; मात्र त्याची कार्यवाही झालेली नाही.

यवतमाळ येथील शांतता समिती सभेत हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री गणेशोत्सवाविषयी मार्गदर्शन

येथील नगर परिषद टाऊन हॉल, येथे यवतमाळ (वडगाव) पोलीस ठाण्याच्या वतीने आयोजित शांतता समिती सभेत श्री गणेशोत्सव या विषयावर मार्गदर्शनासाठी हिंदु जनजागृती समितीला बोलावण्यात आले होते.

लाच मागणार्‍या डहाणू पोलीस ठाण्यातील हवालदारांवर गुन्हा प्रविष्ट

न्यायालयात दोषारोपपत्र प्रविष्ट करतांना गुन्ह्याचे गांभीर्य न्यून करण्यासाठी तक्रारदाराकडे १० सहस्र रुपयांची लाच मागणारे डहाणू पोलीस ठाण्याचे हवालदार सुगंध नरसुळे आणि माणिक जाधव यांच्यावर गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे.

उद्योजक भावेश भाटिया यांना वासुदेव जीवन-दृष्टी गौरव पुरस्कार प्रदान

अंधत्वावर मात करून यशस्वी उद्योजक बनलेले सनराईज कॅन्डल्सचे प्रमुख आणि राष्ट्रपती पुरस्कार विजेते श्री. भावेश भाटिया यांना वेद वासुदेव प्रतिष्ठानच्या वतीने वासुदेव जीवन-दृष्टी गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

धावत्या रिक्शातून उडी मारून विद्यार्थिनीची अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटका

मुंबई – अपहरणकर्त्या तरुणांच्या तावडीतून सुटण्यासाठी घाटकोपर येथील इयत्ता ७ वी तील विद्यार्थिनीने रिक्शातून उडी मारली.

बोईसर येथे सामूहिक ध्वजारोहण सोहळ्यात संपूर्ण वन्दे मातरम्द्वारे जागृती !

बोईसर (जिल्हा पालघर), २० ऑगस्ट (वार्ता.) – येथील श्री वाघोबा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने येथे सामूहिक ध्वजारोहण सोहळा पार पडला. या वेळी प्रथमच हिंदु जनजागृती समितीला मार्गदर्शनासाठी बोलसण्यात आले होते.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now