राजभवन परिसरातील वाहतूककोंडीमुळे शपथविधी समारंभास १३ मिनिटे विलंब !

राजभवन येथील मंत्र्यांच्या शपथविधीच्या कार्यक्रमामुळे गिरगाव चौपाटी ते राजभवन या मार्गात सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली. त्यात अडकल्यामुळे मंत्रीपदाची शपथ घेणारे शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांना सोहळ्याला येण्यास विलंब झाला.

सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांत हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विविध स्तरांवर देण्यात आले निवेदन !

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी कार्यवाही करा !

महाराष्ट्रात तातडीने धर्मांतरबंदी कायदा लागू करा ! – डॉ. उदय धुरी, हिंदु जनजागृती समिती

राज्यात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा असूनही अशा खोट्या चमत्कारांचा प्रसार मिशनर्‍यांनी उघडपणे चालवला आहे.

महाराष्ट्रात मंत्रीमंडळाचा विस्तार : १८ आमदारांना मंत्रीपदाची शपथ

महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळामध्ये आणखी १८ मंत्र्यांचा समावेश झाला आहे. ९ ऑगस्ट या दिवशी राजभवन येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नवीन सरकारमधील १८ आमदारांना मंत्रीपद आणि गोपनीयता यांची शपथ दिली.

श्रावणी पुत्रदा एकादशीनिमित्त लाखो भाविकांनी घेतले श्री विठ्ठलाचे दर्शन !

श्री विठ्ठलाच्या नामाचा गजर करत पंढरपूर येथे येऊन लाखो भाविकांनी पुत्रदा एकादशीनिमित्त श्री विठ्ठलाच्या चरणांवर भावपूर्ण माथा टेकला.

दौंड (पुणे) येथे ७०० किलो गोमांस जप्त, ३ धर्मांधांसह अन्य एकाविरुद्ध गुन्हा नोंद !

राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असूनही मोठ्या प्रमाणात त्याचे उल्लंघन होणे, हे चिंताजनक आहे. पोलीस प्रशासन यावर कायद्याची प्रभावी कार्यवाही कधी करणार ?

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी कार्यवाही करा ! – सांगली जिल्ह्यात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रशासन, शाळा-महाविद्यालय, पोलीस यांना निवेदन

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाची विटंबना रोखण्यासाठी प्रशासनाने योग्य ती पावले उचलावीत, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सांगली जिल्ह्यात प्रशासन, पोलीस आणि शाळा-महाविद्यालय यांना निवेदन सादर करण्यात आले.

आज होणार मंत्रीमंडळाचा विस्तार !

महाराष्ट्राच्या रखडलेल्या मंत्रीमंडळाचा विस्तार ९ ऑगस्ट या दिवशी होणार आहे. सकाळी ११ वाजता राजभवन येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी मंत्र्यांना पद आणि गोपनीयता यांची शपथ देणार आहेत.

तुमसर (जिल्हा भंडारा) येथे ढगफुटीसदृश पाऊस !

नागूपर येथे ८ ऑगस्ट या दिवशी बेसा रस्त्यावर भर पावसात एका शाळेची गाडी उलटली. त्यात १६ विद्यार्थी होते. यात ३ विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. नागरिकांच्या साहाय्याने विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत सोलापूर जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजन !

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अंतर्गत जिल्ह्यात १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत ‘हर घर तिरंगा’, तर ९ ते १७ ऑगस्ट या कालावधीत ‘स्वराज्य महोत्सव’ हा उपक्रम राबवला जात आहे. यामध्ये सर्व शासकीय विभागांचा सक्रीय सहभाग असणार आहे