कोल्‍हापूर येथून सुटणार्‍या दोन पॅसेंजर रेल्‍वेगाड्या २ मार्चपर्यंत रहित

या गाड्या रहित झाल्‍याने आता प्रवाशांना महालक्ष्मी एक्‍सप्रेस, महाराष्‍ट्र एक्‍सप्रेस, तसेच कोल्‍हापूर-कलबुर्गी एक्‍सप्रेस याच गाड्या उपलब्‍ध आहेत. याचसमवेत कोल्‍हापूर-हरिप्रिया ही रेल्‍वेगाडी ५ फेब्रुवारीपासून पुढील ८ दिवस बेळगाव येथून सुटणार आहे. यामुळे प्रवाशांचे पुष्‍कळ हाल होणार आहेत.

आळंदी येथे ८ फेब्रुवारीला होणारा ‘ज्ञानोबा तुकाराम पुरस्‍कार’ सोहळा पुढे ढकलला !

पुरस्‍कारप्राप्‍त सन्‍माननीय बाबा महाराज सातारकर यांच्‍या पत्नीचे दुःखद निधन झाल्‍यामुळे ते कार्यक्रमाला उपस्‍थित राहू शकणार नाहीत..

देव आणि देश सेवेत मग्‍न रहा ! – श्री श्री रविशंकर

देवभक्‍ती आणि देशभक्‍ती या एकाच नाण्‍याच्‍या दोन बाजू आहेत. प्रत्‍येकात देवभक्‍ती आणि राष्‍ट्रभक्‍ती असलीच पाहिजे. तुम्‍ही सर्वजण देव आणि देश सेवेत मग्‍न रहा. तुमच्‍या जीवनात कशाचीही कमतरता रहाणार नाही, असे प्रतिपादन ‘आर्ट ऑफ लिव्‍हिंग’चे संस्‍थापक श्री श्री रविशंकर यांनी केले.

राज्‍यात सर्वाधिक अपघात नाशिक जिल्‍ह्यात !

जिल्‍ह्यात रस्‍ते अपघातांची संख्‍या वाढत असून गेल्‍या ६ मासांच्‍या कालावधीत नाशिक शहर आणि जिल्‍ह्यात ६०२ जणांचा अपघाती मृत्‍यू झाला आहे.

महाराष्‍ट्रात नसबंदीची आवश्‍यकता असणार्‍या ५ लाख पुरुषांपैकी केवळ ८ सहस्र ६९८ जणांनीच केली शस्‍त्रक्रिया !

महाराष्‍ट्रात अपसमज आणि पौरुषत्‍व यांच्‍या खुळामुळे नसबंदी शस्‍त्रक्रियेेत पुरुषांकडून महिलांनाच पुढे केले जात आहे. महाराष्‍ट्रात ५ लाख पुरुषांची नसबंदी शस्‍त्रक्रिया अपेक्षित असतांना ८ सहस्र ६९८ पुरुषांनीच ही शस्‍त्रक्रिया करून घेतली.

‘सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्‍सवा’च्‍या प्रचाराच्‍या गाडीचे उद़्‍घाटन !

‘सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्‍सवा’च्‍या प्रचाराच्‍या गाडीचे उद़्‍घाटन प.पू. अदृश्‍य काडसिद्धेश्‍वर स्‍वामीजी, शिवसेना खासदार (शिंदे गट) धैर्यशील माने, तसेच माजी आमदार मदनदादा भोसले यांच्‍या प्रमुख उपस्‍थितीत पार पडले.

गडहिंग्लज (जिल्हा कोल्हापूर) येथील वैकुंठभूमीची (स्मशानभूमी) तात्काळ दुरुस्ती करा ! – नागरिकांचे निवेदन

रस्ते, वीज, पाणी यांप्रमाणेच स्मशानभूमीत चांगली व्यवस्था मिळणे, हाही नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे. यासाठी निवेदन द्यावे लागणे आणि आंदोलनाची चेतावणी द्यावी लागणे, हे प्रशासनासाठी लज्जास्पद आहे !

संभाजीनगर येथील घोटाळ्‍यातील धर्मांधाला ४ वर्षांनंतर बेंगळुरू येथून अटक !

एकूण ७५ लोकांना २ कोटी रुपयांचा गंडा घालणार्‍या ‘रिदास इंडिया’ आस्‍थापनाच्‍या संचालकाला ४ वर्षांनंतर पोलिसांच्‍या आर्थिक गुन्‍हे शाखेने बेंगळुरू येथून अटक केली आहे.

‘पाणथळ वाचवा’ मोहिमेचा कुडचडे येथील नंदा तळे येथे शुभारंभ

गोव्याच्या नंदा तळ्यासह देशातील ७५ पाणथळ ठिकाणांना ‘रामसर साईट्स’ म्हणून घोषित करण्याची दृष्टी ठेवल्याबद्दल मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार आणि अभिनंदन.

केंद्रशासनाच्या अहवालानुसार ३११ प्रदूषित नद्यांच्या सूचीमध्ये गोव्यातील ६ नद्या

श्री गणेशमूर्ती विसर्जनामुळे जलप्रदूषण होत असल्याची आवई उठवणारे तथाकथित पर्यावरणवादी उद्योग आणि कारखाने यांच्याकडून टाकाऊ पदार्थ नद्यांमध्ये सोडले जात असतांना गप्प का ?